कोकणात मान्सूनने दणक्यात आगमन केले आहे. कोकणात दाखल झालेला मान्सून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाच्या काही भागात जोरदार बरसलाय. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट देखील झाला. मान्सूनचे आगमन अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे गणित देखील बिघडलं आहे. परंतु, मान्सूनने जोरदार सलामी दिल्याने आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
[read_also content=”तेलंगणा भाजपच्या नेत्याला वक्तव्य भोवले https://www.navarashtra.com/latest-news/telangana-bjp-leader-arrested-nrgm-291050.html”]
राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या 48 तासात मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
औरंगाबाद, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्या पावसानं हजेरी लावली. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र ताराबंळ उडाली.
[read_also content=”महिमा कॅन्सरशी लढा देणारी हिरो! अनुपम खेर यांच ट्विट चर्चेत https://www.navarashtra.com/movies/glory-to-the-hero-fighting-cancer-anupam-kher-tweet-in-discussion-nrps-290864.html”]