संग्रहित फोटो
मुंबई : सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. मुंबईत ठिकठिकाणी या पाणी साचले असून पावसाने जराही उसंत न घेतल्याने येथील रस्ते जलमय झाले आहेत. पूर्व-पश्चिम द्रुतगती महानार्गावर (East And Western Highway Traffic Jam) या पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
[blurb content=””]वाहनांच्या लांबच रांगा लागल्या असून सकाळी कामवर जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूप हाल झाले आहेत. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने त्यांना पाण्यातून वाहने नेताना तारेवरची कसरतच करावी लागली आहे. आजच्या पावसामुळे कर्मचारी नेहमीच्या वेळेपेक्षा कामावर उशिराने रूजू झाले आहेत.
परतीच्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) मोठा फटका बसला आहे. त्यातच हवामान विभागाने (Meteorology Department) मुंबईसह (Mumbai) ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये (Raigad) पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क (Rain Alert) राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागातदेखील हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः घाटमाथ्यावर सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरातही सकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या जोरदार सरी कोसळत आहे.
#MumbaiRains #Mumbaikars, #Thanekars take care while commuting to office today. Possibility of mod to intense spells of rains next 3,4 hrs as seen frm latest radar obs at 9 am
Mumbai & around received mod to heavy rains in past 24 hrs.
Next 48 hrs, possibility of heavy rains pl pic.twitter.com/FftkGz3UXy— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 16, 2022
आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागातदेखील हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.