बांगलादेशात खळबळ! 'मी फक्त नावाचा राष्ट्रपती...' मुहम्मद युनूस यांच्यावर थेट 'अपमानाचे' आरोप; अध्यक्ष शहाबुद्दीन राजीनामा देण्याच्या विचारात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Bangladesh President Shahabuddin Accusations : बांगलादेशमध्ये (Bangladesh) सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच, देशाचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी थेट अंतरिम सरकारचे प्रमुख (Interim Government Head) मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय बंड केले आहे. या अप्रत्याशित हल्ल्यामुळे बांगलादेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, युनूस लोकशाही तत्त्वांचे पालन करत नाहीत आणि ते राष्ट्रपतींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. शहाबुद्दीन यांच्या मते, युनूस यांच्या अपमानामुळे ते इतके दुःखी झाले आहेत की, आपला २०२८ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण न करता ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : EU Future : अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी प्लॅन’ची कागदपत्रे लीक! जगाला मोठा धक्का; भारत, चीन, रशियाचा ‘Core-5’ सुपरगट बनवणार?
शहाबुद्दीन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना अंतरिम सरकारकडून होणाऱ्या अपमानाबद्दल तीन मोठे आणि धक्कादायक खुलासे केले:
we cannot stay silent while Muhammad Yunus opens the door to groups like ISI, whose violent actions are tearing our country apart. Bangladeshis are watching their neighborhoods burn, their voices suppressed, and their safety shattered — all because this regime has allowed chaos… pic.twitter.com/sJaUgbNRxC — Sheikh Sana 🇧🇩 (@SanaSheikhBD) December 11, 2025
credit : social media and twitter
शहाबुद्दीन यांनी यावर जोर दिला की, बांगलादेशात राष्ट्रपतींना लष्करी कामकाजाचा प्रमुख (Head of Military Affairs) मानले जाते, पण युनूस सरकार त्यांना ही भूमिका निभावू देत नाहीये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : ‘युद्ध आपल्या दाराशी आहे!’ रशियन हल्ल्यांनी युरोप स्तब्ध; NATO प्रमुखांचा इशारा, पुतिन करणार ‘या’ देशांना लक्ष्य
७६ वर्षीय मोहम्मद शहाबुद्दीन हे माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे जवळचे मानले जातात. मुजीब वाहिनीचे सदस्य आणि न्यायव्यवस्थेतील कामाचा अनुभव असलेले शहाबुद्दीन, २०२३ मध्ये शेख हसीनांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपती बनले. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीनांच्या बंडानंतर, शहाबुद्दीनवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्यात आला, पण त्यांनी स्वेच्छेने राजीनामा देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर, युनूस यांच्या निवडीमध्ये आणि शपथविधीमध्येही शहाबुद्दीन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि बांगलादेशात लष्करी राजवट (Military Rule) लागू न होण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. राष्ट्रपतींचे हे बंडखोरीचे पाऊल सध्या महत्त्वाचे आहे, कारण बांगलादेशचे अंतरिम सरकार लोकशाही पुनर्संचयित (Restoration of Democracy) करण्याबद्दल बोलत आहे. अशा वेळी, राष्ट्रपतींचे आरोप युनूस सरकारला अडचणीत आणू शकतात. शहाबुद्दीन यांनी लष्करप्रमुखांशी नियमितपणे बोलत असल्याचे सांगितल्यामुळे, लष्करप्रमुखही या राजकीय बंडाच्या मागणीशी सहमत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना असा संदेश मिळाला आहे की, ते कोणत्याही पदावर असले तरी आपला आवाज उठवू शकतात.
Ans: २०२८ पर्यंत.
Ans: अपमान केल्याचा आणि भेटण्यास नकार दिल्याचा.
Ans: शेख हसीना (Sheikh Hasina).






