Highway Widening Operation In Jejuri Affected Shops Houses Removed Nrdm
जेजुरीत महामार्ग रुंदीकरणाची कारवाई, बाधित दुकाने, घरे हटवली; प्रशासनाचा मोठा बंदोबस्त
पुणे- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जेजुरी शहरांतर्गत रुंदीकरणाच्या मार्गात बाधित होणारी घरे दुकाने हटवण्याचे काम बुधवारी (दि. २२) केले. यासाठी पोलीस प्रशासन, महसूल, नगर विकास, महावितरण तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी वर्गासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जेजुरी : पुणे- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जेजुरी शहरांतर्गत रुंदीकरणाच्या मार्गात बाधित होणारी घरे दुकाने हटवण्याचे काम बुधवारी (दि. २२) केले. यासाठी पोलीस प्रशासन, महसूल, नगर विकास, महावितरण तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी वर्गासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गेली वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून पुणे ते पंढरपूर पालखी महामार्गाचे रुंदी करण्याचे काम सुरू आहे. जेजुरी शहरांतर्गत उत्तर दिशेला असणाऱ्या नागरिकांची घरी दुकाने अधिग्रहण संपादित करण्यात आली आहेत. २०१५ मध्ये राज्य महामार्गाचे रुंदीकरण करताना उत्तर दिशेकडील व्यवसायिक व रहिवासी यांची घरे दुकाने आठवण रुंदीकरण करण्यात आले होते. त्याकाळी संपादित केलेल्या जागेचा व तोडण्यात आलेली दुकाने यांची कोणतेही नुकसान भरपाई बाधितांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उत्तर दिशेला जास्त जागा संपादित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष होता.
पोलिसांचा बंदोबस्त
उत्तर व दक्षिण दिशेला समसमान रुंदीकरण व संपादन व्हावी, अशी मागणी यासाठी गतवर्षी २५ नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मार्च २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढल्यामुळे जागा संपादनाचा मार्ग मोकळा झाला. या कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अभियंता प्रसाद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रमसिंह राजपूत, पालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे, यांच्यासह सुमारे १०० पोलीस कर्मचारी तैनात होते.
जेजुरीतूनच बाह्यवळण का नाही?
राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना सासवड येथे झेंडेवाडी ते बोरावके मळा मार्ग तर, निरेच्या बाहेरून पिसुर्टी ते लोणंद असा बाह्य वळण मार्ग काढण्यात आला आहे. मात्र गेले अनेक वर्ष ग्रामस्थ मागणी करत असतानाही जेजुरीतच बाह्यवळण का नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.
Web Title: Highway widening operation in jejuri affected shops houses removed nrdm