Photo Credit- Social Media पुणे विमानतळावर तपासणी कधी सुरू होणार?
पुणे: कोविड -19 नंतर चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घालायला सुरूवात केली. काल भारतातही या विषाणूचे चार-पाच रूग्ण आढळून आले. महाराष्ट्राती नागपूर जिल्ह्यात आज सकाळी दोन एचएमपीव्ही व्हायरसची लागण झालेल्या दोन रूग्णांची नोंद करण्यात आली. पण त्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. कोरोना महामारीच्या दरम्यान, राज्यभराच्या तुलनेत पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रूग्ण होते. आताही महाराष्ट्रात एचएमपीव्हीचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळावर देश विदेातून अनेक नागरिक ये-जा करत असतात. पण अद्यापही त्या ठिकाणी तपासणी करण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे.
दुसरीकडे पुणे महानगरपालिकेने मात्र या व्हायरसशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने 50 बेडचे विलगीकरण कक्ष तयार कऱण्यात आला आहे. पण पुणे विमानतळ प्रशासनाला अद्याप कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नसून या कोणत्याही प्रकारची तपासणीही केली जात नाहीये. या संदर्भात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक झाली आहे. पण याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असंही महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Fastag : मोठी बातमी! 1 एप्रिलपासून फास्ट टॅगसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचा निर्णय
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोरोडे म्हणाल्या की, महापालिकेने अद्याप लोहगाव विमानतळावर स्क्रीनिंग किंवा तपासणी सुरु केलेली नाही. राज्य सरकारची नियमावली जाहीर झाल्यानंतर विमानतळावर स्क्रीनिंग सुरु केली जाईल. कोरोना व्हायरसची लागण हान मुलांना सहजासहजी होत नव्हती. पण या विषाणूची लागण लहान मुलांनाही होताना दिसत आहे. 2001 मध्येच हा विषाणून पहिल्यांदा नेदरलँडमध्ये आढळून आला होता.
डॉ. बोरोडे पुढे म्हणाल्या की, एचएमपीव्ही हा साधा विषाणू असल्याने त्याने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. या व्हायरसची लागण झाली तरी रूग्णाला ॲडमिट होण्याची गरज भासत नाही. पण तरीही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेने नायडू संसर्गजन्य रुग्णालयात आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयात 350 बेड तयार ठेवले आहेत. तसेच या सर्व बेड्ससाठी व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे.
एचएमपीव्ही व्हायरस हा इतर व्हायरसप्रणाने नाही. तो इतर व्हायरससारखा असून तो कोरोना व्हायरसप्रमाणे नाही. या व्हायरसची उपचारपद्धती माहिती आहे. पण हा व्हायरल श्वसन संस्थेच्या वरील भागाला इजा करतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा व्हायरस जास्त प्रमाणात आढळून येतो. फुफ्फुसांपर्यंतही जाऊ शकतो. नागरिकांनी साधव राहणे गरजेचे आहे.
ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या विजयावर लागली मोहर; उपराष्ट्रपती हॅरिस यांनी केले
दरम्यान, साथीच्या आजारांचे तज्ञ डॉ. रवी गोडसे यांनीदेखील या व्हायरला घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. एचएमपीव्ही रोगाचा भारताला फारसा धोका नसल्याचे डॉ. गोडसे यांनी म्हटले आहे. भारतातील नागरिकांना फारशी काळजी करण्याचे कारण नाही. चीनमध्ये सध्या नागरिक मास्क घालूनच फिरत आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र चीनमध्ये प्रदूषणाची समस्या मोठी असल्याने तेथील नागरिक कायमच मास्क घालून फिरत असतात. हा व्हायरस हा अत्यंत साधा आहे. कमी किंवा जास्त वय असलेल्या लोकांना हा व्हायरस होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. रवी गोडसे म्हणाले.
लहान मुलांना हा एचएमपीव्ही व्हायरस होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता फारच दुर्मिळ आहे. भारतात कोरोना काळात चीनसारखा कडक लॉकडाउन नव्हता. त्यामुळे आपल्याकडील लहान मुलांची रोगप्रतिकरक शक्ती चांगली राहिली आहे. त्यामुळे भारतात हा व्हायरस फार पसरेल असे वाटत नाही. यावर कोणताही उपाय किंवा लस उपलब्ध नाही, असे रवी गोडसे म्हणाले.
मुख्य प्रशिक्षकाची संघाने केली हकालपट्टी! लिंक्डइनवर शोधतोय नोकरी
HMPV विषाणूने भारतातही थैमान घातले आहे. भारतात आठ महिन्यांच्या मुलीला HMPV व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, कर्नाटकमध्ये HMPV ची 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतासह अनेक देशांमध्ये HMPV संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही सतर्क आहे. आरोग्य विभागाने एचएमपीव्ही संदर्भात लोकांना एक सूचना जारी केली आहे. लोकांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगण्यात आले आहे.
HMPV टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये…
1. शिंकताना किंवा खोकताना रुमाल आणि कापडाचा वापर करा.
2. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरणे सुरू करा.
3. खोकला आणि सर्दी झालेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.
4. इतरांशी हस्तांदोलन थांबवावे लागेल.
5.एकच टिश्यू पेपर किंवा रुमाल पुन्हा पुन्हा वापरू नका.
6.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद करावे.
7. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास, स्वतःहून औषध सुरू करू नका.
8. वारंवार डोळे, नाक आणि कानाला स्पर्श करणे टाळा.
9. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा