नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघरमध्ये वीस ते पंचवीस लाख अनुयायी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या पुरस्कारावेळी शाल, मानपत्र, 25 लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह तसेच 10 फुटांचा गुलाबाचा हार, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसेवकांच्या वतीनं देण्यात आला. दरम्यान, व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM), मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे आदी नेते व मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार व जय्यत तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी खारघरमध्ये दाखल झालेत.
गर्दी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नाही…
दरम्यान, आपल्या भाषणाता बोलताना सुरुवातील अमित शहा म्हणाले की, कोणत्याही प्रसिद्धीची आकांक्षा नसणारे, अशा अप्पासाहेबांच्या कौतुकासाठी आलेली ही प्रचंड गर्दी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नाही. 42 अंश तापमानात बसलेले श्री सदस्य, हे पाहिल्यावर अप्पासाहेबांच्या बाबत तुमच्या मनात काय प्रेम आहे हे लक्षात येतंय. असं शहा म्हणाले. असा भक्तिभाव केवळ त्याग, समर्पण यातूनच निर्माण होतं. हे अप्पासाहेबांचं गुणवैशिष्ठ्य आहे. हा त्यांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा आजचा सन्मान असल्याचं अमित शहा म्हणाले. गर्दीचं अनुसरण करु नका, असं काही तरी करा जे गर्दी तुमचं अनुसरण करेल, हे अप्पासाहेबांनी करुन दाखवलं आहे. मी 12 व्या वर्षापासून सार्वजनिक जीवणात आहे. इतिहासाचा अभ्यासक आहे. लक्ष्मीची कृपा एखाद्या परिवाराला एखाद्या कुटुंबावर असते. एखाद्या परिवारात अनेकजण वीर असतात, सरस्वतीची कृपाही काही कुटुंबांवर पिढ्यात असते. मात्र समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्या असणं हे पहिल्यांदाच बघतोय, असं अमित शहा म्हणाले.
आप्पासाहेबांमुळे लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा…
पुढे बोलताना शहा म्हणाले की, आप्पासाहेबांना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन केवळ तुमचा सन्मान केला नाही. लाखो लाखो जनतेला या प्रकारे जगण्याची प्रेरणा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यभूमी आहे. राष्ट्रासाठी वीरता, सावरकर, चाफेकर, टिळक, फडके यांच्यासारख्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं. भक्तीच्या विचारधारेत रामदास, नामदेव, तुकाराम यांनी देशाचं नेतृत्व केलंय. सामाजिक चेतनेची धारा, महात्मा फुले, सावित्री फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारखे अनेक सामाजिक चेतनेचे जनक राज्यात राहिले. नानासाहेब आणि अप्पासाहेबांनी हेच काम पुढं चालवलंय.
भक्ती, शक्ती आणि सामजिक कार्य
महाराष्ट्र राज्याने राष्ट्रसेवा, शक्ती, भक्ती व सामाजिक अशा तिन्ही कार्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, असं क्वचित कुठल्या राज्यात पाहयला मिळते, असं शहा म्हणाले. सर्वे संत मडळी येथे झाली. समाजातल्या एका मोठ्या वर्गाला दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी उभं करण्याची शिकवण दिलीय. धर्मानं, मंत्रानं दिलेली शिकवण कमी पडते. जी कर्तुत्वानं शिकवण दिली जाते ती निरंतर असते. अप्पासाहेबांनी नेमकी हीच प्रेरणा दिली आहे.
देशाला गरज असताना अशी मोठी फौज उभी केली आहे. म्हणूनच अप्पासाहेबांना पद्मश्रीनं पुरस्कार दिला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात शिवसेना-भाजपानं केली. पु. ल. देशपांडेपांसून अनेकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पहिल्यांदाच एकाच घरात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण देण्यात आलाय. यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी आलोय. विविध क्षेत्रात मोठी उदाहरणे तुम्ही काम केलंय. आपल्याला दीर्घायू मिळो आणि काम विस्तारत राहो, अशी प्रार्थना करतो असं शहांनी आपल्या भाषणात म्हटले.