घोडे ही माथेरानची संस्कृती आणि त्यामुळे अश्वपालक यांना वाऱ्यावर सोडणार नाही, आमदार महेंद्र थोरवे यांचे आश्वासन
माथेरान : माथेरान शहरातील पर्यटनामध्ये घोडे हे प्रमुख आकर्षण असून माथेरानचे संस्कृती म्हणून घोड्यांची ओळख आहे. त्यामुळे अश्वपालक यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.माथेरान येथे बैठकीसाठी निघालेले आमदार महेंद्र थोरवे यांना दस्तुरी नाका येथे घोड्यांचे मालक यांना अडवून आपली भूमिका मांडली.
माथेरान येथे सुरू असलेल्या आंदोलनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत येथून माथेरान साठी निघाले होते.याची माहिती असल्याने माथेरान मधील आणि माथेरानचे डोंगरातील आदिवासी तसेच धनगर समाजातील लोकांनी गर्दी दस्तुरी नाका येथे केली होती. आमदार महेंद्र थोरवे,तसेच प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ तसेच पोलिस उप अधीक्षक डी डी टेले यांच्या गाड्या घोडेचालक यांनी अडविले.त्या ठिकाणी अश्वपालक यांच्या सर्व भूमिका समजून घेत सर्व घोडेवाले यांच्या व्यवसायावर गदा येणार नाही आणि कोणत्याही स्वरूपात अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले.
माथेरानचे पर्यटन हे आपल्या सर्वांच्या एकत्र राहिल्याने वाढणार आहे.त्यामुळे माथेरान आणि आजुबाजूच्या भागातील कुटुंब यांचे उदरनिर्वाह अवलंबून आहे याची जाणीव आम्हाला आहे.त्यावेळी घोडेवाले यांनी आमचे घोडे हे लाख रुपये किमतीचे असतात,त्यात एखादा घोडा मरून गेल्यावर ते संपूर्ण घोडेपालक कुटुंब उध्वस्त होत असतो.त्यावेळी माथेरान मधील आमच्या घोड्यांबाबत कधी अश्रू काढत नाही.हा प्रत्येक घोडेवाला हा माथेरानचे डोंगरातील मुलवासी आहे,आणि त्यामुळे मुलवासी म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करायचा नाही काय? असा प्रश्न मांडला. या सर्व प्रश्नावर आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान मधील अश्वपाल हा जिवंत राहिला पाहिजे आणि आम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडायचे नाही.अश्वपालक जगला पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या पाठीशी आपण असल्याचे आश्वासन दस्तुरी येथे अश्वपालक आणि त्यांचे कुटुंबीय यांना दिले.