माथेरान बंद राहणार की नाही? आमदार महेंद्र थोरवे यांची काय आहे भूमिका? (फोटो सौजन्य-X)
माथेरान, संतोष पेरणे : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान हिल स्टेशन गेल्या काही दिवसांपासून बंदची हाक पुकारली होती. याचदरम्यान आता आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान बंद ही हानिकारक असून त्यातून वेगळा आणि चुकीचा संदेश राज्यात देशात गेला आहे.माझी ओळख माथेरान भागाचे आमदार अशीच वरिष्ठ पातळीवर होत असते. माथेरान बंद हा माझ्यासाठी चुकीचा मेसेज देणारा असल्याने विधिमंडळ अधिवेशन सोडून या ठिकाणी आलो आहे.आम्ही निर्णय घेऊ परंतु आम्ही निर्णय घेऊन जाणार असून माथेरान शहरातील नागरिक,व्यावसायिक यांना पुढाकार घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे.त्यामुळे माथेरान वैयतिक दादागिरी करू नये आणि त्यातून निर्माण झालेला रोष बाजूला करावा असे माझे आवाहन असून अतिथी देवो भवो या प्रमाणे पर्यटन वाढीसाठी तुम्ही सहकाऱ्यांची भूमिका घ्यायला हवी.
प्रशासन मधील अधिकारी आणि दोन दोन प्रतिनिधी यांच्या मध्ये दर महिन्याला सरकारी पातळीवरील बैठक व्हावी.त्यातून माथेरान हे जगातील पातळीवरील पर्यटन स्थळ आहे त्याचा दर्जा अधिक वाढावा यासाठी माझे प्रयत्न आहेत.जगातील दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटक दोन चार दिवस राहून आनंद घेतला पाहिजे.मुख्याधिकारी तुम्ही दोन वाजता येणार हे चालणार नाही निवास स्थानी राहायला हवे अशा माजी पूर्ण सूचना असून प्रशासक म्हणून तुम्हीच असल्याने तुम्ही जबाबदारीने वागावे आणि भान असावे अशी सूचना केली.आजचे आलेले सर्व प्रश्न हे नगरपरिषद संबंधी सर्वाधिक आहेत आणि त्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडून कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे.
माथेरान शहराचे एन्ट्री पॉईंट हे एकच असले पाहिजे आणि माहिती केंद्र यामध्ये दरपत्रक निश्चित करावे यासाठी तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी. घोडे हे माथेरानची संस्कृती असून घोड्याचे पाण्याचा व्यवस्था करण्याची जबाबदारी देखील पालिकेची आहे. घोडेस्वार,किलो,सरकारी कर्मचारी,प्रवासी संकलक यांना सर्वांना आयकार्ड देण्यात यावे.पोलिसांनी पर्यटकांच्या गर्दीच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवायला हवा आणि पोलिसांनी जबाबदारी पार पाडावी नाहीतर कारवाई करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही असे कठोर वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.
प्रेक्षणीय स्थळी आणि सर्व महत्वाच्या ठिकाणी दरपत्रक सूचनाफलक असले पाहिजेत याची तत्काळ कार्यवाही व्हावी.प्रवासी माहिती केंद्र तत्काळ सुरू करावे,टॅक्सी चालक यांनी देखील प्रत्येक पर्यटक यांना मुख्य प्रवेशद्वार येथूनच गेले पाहिजे.घोडे आणि इ रिक्षा यांचा स्टँड हे समोरासमोर असला पाहिजे आणि त्यामुळे दोघांना व्यवसाय मिळेल. मालवाहतूक करणारे घोडे यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावे आणि मालवाहतूक करणारे घोडे हे पर्यटक जातात त्या रस्त्याने जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
दरपत्रक घोडे,हातरिक्षा, कुली यांचे दरपत्रक हे ते व्यवसाय करणाऱ्या सर्वांकडे असले पाहिजेत.सोशल मीडिया वर सुरू असलेली बदनामी या प्रामुख्याने एजंट ही कारणीभूत आहेत.पर्यटकांना चुकीचे माहिती देऊ नका आणि एजंट लोकांचे काम माथेरान पालिकेने दरपत्रक निश्चित करावे आणि बाराही महिने माथेरान चालले पाहिजे आणि ते दर लॉजिंग धारक यांनी दर निश्चित करावेत आणि त्यामुळे एजंटगिरी बंद होऊन बदनामी कमी होण्यास मदत होईल.आपल्याला कोणावरही अन्याय करायचा नाही आणि त्यामुळे घोडेवाले,हॉटेल,लॉजिंग या सर्वांचे दरपत्रक यात वाढ करून ते निश्चित करावेत अशी सूचना करावी.माथेरान फुललेले पाहिजे यासाठी वेगवगेळे प्रकाराचे व्यवसाय करणारे यांनी ड्रेस कोड निश्चित करावेत असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.