मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील गुलाम शाह इस्टेट मधील काही गोदामांना पहाटे भीषण आग लागली होती. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून ही आग नियंत्रणात साठी आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र दहा ते पंधरा बंबांच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न करूनही आग नियंत्रणात येत नंतर तब्बल तीन तास अथक प्रयन्त केल्यानंतर कुर्ला येथील आग वीजवण्यात आली. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक इत्यादी साहित्यांच्या गोदामाला भीषण आग लागली असून यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.