मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, नाशिकमध्ये जे ड्रग्ज सापडले याबाबत बोलताना म्हणाले की, सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून, महाराष्ट्रात व नाशिकमध्ये उडता नाशिक अशी परिस्थिती आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत, संजय राऊतांवर निशाणा साधला. आमचे महायुतीचे सरकार आल्यानंतर संजय राऊतला उडता महाराष्ट्र आठवला आहे, आणि उडता नाशिक आठवला. यांच्या काळात सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्सबाबत कडक भूमिका घेतली असाच हा बोलत होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर हे ड्रग्स माफीया वाढले असे हा म्हणाला. पण तुझ्यासारखे 420 जे कामगाराकडून खिचडी चोरतात, अशी बोचरी टिका राणेंनी केली.
स्वतःचे कार्यकर्ते यांच्याकडून हल्ला करून घेतला
पुढे बोलताना राणे म्हणाले की, तुझ्या मालकाचा मुलगा जो अलमी पदार्थाचा बादशहा आहे, त्याला गृहमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी वठणीवर आणलं. रश्मी शुक्ला यांचे नाव ऐकल्यावर याच्या मालकावर झोपेची गोळी घ्यायची वेळ आली. तुला जर ड्रग्स विरोधात मोर्चा काढायचा असेल तर मातोश्री आणि दिनो मोरयाच्या घरी काढ. तुझ्या मालकाचा मुलगा त्यावेळी रोज संध्याकाळी काय फराळ घ्यायचा. ड्रग्स आणि अमली पदार्थात तुझ्या मालकाच्या मुलाने पीएचडी केली असेल. कर्जतच्या फार्म हाऊसच्या फ्रीजमध्ये आयुष्यभर पुरेल असा साठा सापडेल. संजय राऊतच्या कुटूंबाने स्वतःचे संरक्षण वाढावे म्हणून स्वतःच्या कार्यकर्ते यांच्याकडून हल्ला करून घेतला, असा आरोप नितेश राणेंंनी राऊतांवर केला.
नारायण राणेंना मारण्याची सुपारी दिली होती
श्रीधर पाटणकर यांच्या घरी रेड पडली होती. हे कधी हिंदुत्वासाठी पंतप्रधान यांना भेटले नाही. स्वतःच्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी मी भाजपात येतो हे सांगणारे उद्धव ठाकरे होते. सुनील तटकरे म्हणाले होते, उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये यायचे होते ते बोलले ते खरं बोलले. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री झाल्यानंतर कँव्हीक्शन रेट कमी झाला आहे.जे नागपूर मॉडेल आहे ते महाराष्ट्राने शिकावं. मुंबईत आमची सत्ता आली तर आम्ही मुंबईत देखील नागपूर मॉडेल आणू, दरम्यान, पुढे बोलताना राणे म्हणाले की, नारायण राणे यांच्याबाबत काही गॅंगस्टार यांना मारण्याची सुपारी दिली होती, असा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला. याबाबत उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी याचा खुलासा करावा, असं आव्हान राणेंनी ठाकरेंना दिलं.