Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: लवकरच खरेदी करा रेनकोट अन् छत्री; पाऊस कोकण किनारपट्टीवर थेट…

यंदा केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेला मान्सून ६ जूनला तळकोकणात पोहोचला. त्यानंतर ८ जूनला दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत त्याने मजल मारली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 07:23 PM
Maharashtra Rain Alert: लवकरच खरेदी करा रेनकोट अन् छत्री; पाऊस कोकण किनारपट्टीवर थेट…
Follow Us
Follow Us:

मान्सूनच्या प्रगतीसाठी अखेर अनुकूल परिस्थिती
नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा पुढे सरकण्याची शक्यता
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

पुणे: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून ठप्प झालेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी अखेर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, २३ जूनपासून नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २४ आणि २५ जून रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

यंदा केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेला मान्सून ६ जूनला तळकोकणात पोहोचला. त्यानंतर ८ जूनला दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत त्याने मजल मारली. मात्र, पुढील वाटचालीसाठी आवश्यक वातावरणीय स्थिती अनुकूल नसल्याने मान्सूनची उत्तर सीमा एकाच ठिकाणी स्थिर राहिली. परिणामी राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. काही शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्याही निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील काही भागांत २३ जूनच्या आसपास मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील अधिक भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…

पुण्यात पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नाही. अधून मधून ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नाही. पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (ता.२०) ३५ अंश सेल्सिअस इतके किमान तर २३.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले.तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. रविवारी (ता. २१) शहरात किमान तापमान स्थिर तर कमाल मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.३५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर २४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले पण…; यंदा पाऊस रूसला? मान्सूनची प्रतीक्षा कायम
राज्यात मान्सूनच्या प्रगतीला अद्याप गती मिळालेली नसतानाच अनेक भागांत उष्णतेची लाट, उष्ण व दमट हवामान तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १८) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी सीमा बुधवारी (ता. १७) कायम होती. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारी किंवा संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवण्याबरोबरच दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Web Title: Imd gave heavy rain alert to konkan and latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
2

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.