राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो- istockphoto)
Maharashtra Weather: राज्यात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आज राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेले दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.
कोल्हापूर शहरात आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो. तळकोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD ने दिला ‘हा’ महत्वाचा अलर्ट
राज्यात गेले काही दिवस कडक उन्हाळा जाणवत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. उन्हाचा पारा चांगलाच काही ठिकाणी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान यंदाच्या पावसाच्या आगमनाबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजे आयएमडीने मान्सूनबाबत मोठी माहिती दिली आहे.
IMD Monsoon Update: देशभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार; मात्र ‘या’ राज्यांसाठी चिंता वाढली
जून महिन्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. देशभरात मान्सूनचे प्रमाण १०३ ते १०५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेला हा अंदाज खरा ठरल्यास देशातील बळीराजसाठी दिलासा असणार आहे.
पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान
कर्जत तालुक्यात अजूनही गावकरी भाताची शेती करतात. भाताच्या शेतीचे उत्पन्न मिळण्याची वेळ आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे दुबार शेती वाया गेली आहे. दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान भाताचं पीक पाण्यात भिजल्याने झाले . अशा या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करुन शासन दरबारी नुकसान भरपाई दिली जाते.
Karjat News : पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान; पंचनामे होत नसल्याने बळीराजा संकटात
मात्र नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामे होताना दिसत नाहीत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर मे अखेरपर्यंत अवकाळी पाऊस सुरु होता आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील भाताची सर्व शेत पाण्याने भरली असून अजूनही त्या भाताची लागवड करायच्या शेतात पाणी आणि गवत असल्याने बियाण्याची पेरणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यात दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात राजनाला कालव्याचे पाण्यावर यावर्षी एक हजार हितकर जमिनीवर भाताची शेती केली होती. तालुक्यातील सहा पाझर तलाव आणि दोन लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्या कालव्याच्या पाण्यावर देखील तालुक्याच्या विविध भागात दुबार शेती केली होती.