Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: हे कसले नवीन संकट! मोठा पाऊस येणार की नाही? वाचा सविस्तर…

पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता. ८) कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिले आणि दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 08:18 PM
Maharashtra Rain Alert: हे कसले नवीन संकट! मोठा पाऊस येणार की नाही? वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:

मोसमी वाऱ्यांची गती मंदावली
मोठ्या पावसासाठी पुढील आठवड्याची प्रतीक्षा
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग किंचित मंदावला

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग किंचित मंदावल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांची आगेकूच तळकोकणात स्थिरावली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची स्थिती पुढील आठवड्यानंतर निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रविवारी मोसमी वाऱ्यांनी ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकत मिझोराम, मणिपूर, नागालँड तसेच त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांपर्यंत प्रगती केली. महाराष्ट्रात मात्र मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत अद्याप बदल झालेला नाही. सध्या मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील सीमा देवगडमधून जात आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी वारे राज्यातील इतर भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्याच्या अंतर्गत भागांत तुरळक ठिकाणी, तर किनारी भागांत अनेक ठिकाणी पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. ८ ते १० जूनदरम्यान किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री; मुंबई-ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कधी धडकणार?

पुणे शहर आणि परिसरात सोमवारी (ता. ८) कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिले आणि दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण दिसून आले. दरम्यान, विदर्भ, उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुढील दोन दिवस रात्रीचे किमान तापमान २६ ते ३२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. ९) कमाल तापमान स्थिर राहण्याची तर किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…

केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री

केरळमध्ये अखेर मान्सून दाखल झाला असून यावर्षी तो नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिरा दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या आगमनासाठी सध्या परिस्थिती अनुकूल होत आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांत तो दक्षिण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. विदर्भात मान्सून १५ जूननंतरच दाखल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Imd rain alert conditions for heavy rainfall across maharashtra develop after next week latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • maharashtra weather update
  • Rain News

संबंधित बातम्या

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश
1

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
2

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…
3

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…

Baramati Rain : बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली
4

Baramati Rain : बारामती परिसरात वादळी पावसाने मोठे नुकसान; शहरासह तालुक्यातील अनेक झाडे कोसळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.