देशभरात पावसाचा जोर वाढला (फोटो- ani)
IMD Rain Alert India: गेले दोन ते तीन दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये अत्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. उत्तराखंड, महाराष्ट्र, दक्षिण भारत अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. आज भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मध्ये पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पर्वतीय राज्यांमध्ये सलग सुरु असलेल्या पावसाने अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये खूप पाऊस सूयु सुरु आहे. उतरराखंडमध्ये नैनिताल, रुद्रप्रयाग, डेहराडून आणि चंपावत भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा, चंबा, शिमला जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश व बिहार
आज व पुढील काही दिवस उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये देखील १६ ते २० ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
India Monsoon Alert: काही दिवस फक्त पावसाचेच! उतरराखंड आणि ‘या’ राज्यांमध्ये, IMD ने वाढवली चिंता
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला
गेले एक ते दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. वाशिष्ठी नदी इशारा पातळीच्या जवळून वाहत आहे, कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी न झाल्यास शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे.
#WATCH उज्जैन (मध्य प्रदेश): भारी बारिश के कारण उज्जैन शहर के कई हिस्सों में जलभराव देखने को मिला। pic.twitter.com/mNilve3EMi
— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2025
दक्षिण भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी एनडीआरएफचे पथके तैनात करण्यात आली आहेत. पूर्व भारतात देखील ओडिशा, त्रिपुरा, आसाममध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार
मध्य प्रदेश, पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू राज्यात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.