सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे (Loksabha Election २०२४) वातावरण आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. भारतीय जनता पार्टीकडून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. ३० एप्रिलला धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये जाणार आहेत. तर आज भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) सांगलीमधील कडेगावमध्ये सभेला उपस्थित होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोविड काळात नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या लस भेटली. आपण सगळे जिवंत राहू शकलो. १०० देश सांगतात मोदींमुळे आमचा देश जिवंत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देश पुढे नेऊ शकेल याची निवडणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. भाजपकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. सांगलीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या लोकसभेची ही निवडणूक असून कोण देशाचा विचार करेल, देश पुढे नेऊ शकेल याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये दोन ते तीन उमेदवार आहेत. यामध्ये आपला एक उमेदवार नरेंद्र मोदी यांचा आहे तर इतर दोन राहुल गांधी यांचे आहेत. राहुल गांधी यांच्या इंजिन बोगीमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी बसू शकतात. तर शरद पवार यांच्या बोगीमध्ये सुप्रिया सुळे बसू शकतात. द्धव ठाकरेंच्या बोगीत फक्त आदित्य ठाकरेंच बसू शकतात. सर्वसामान्यांना यामध्ये प्रवेश नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींनी दिलेल्या निधीमुळे दुष्काळी भागात पाणी आले – देवेंद्र फडणवीस
मी मुख्यमंत्री झाल्यावर फक्त निधी विदर्भात जाईल असा आरोप करण्यात आला होता. पण मी मुख्यमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक योजनांना सर्वाधिक निधी देत योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला होता. दुष्काळी भागात सिंचन योजनेला नरेंद्र मोदी यांनी निधी दिल्याने आज दुष्काळी भागामध्ये पाणी आले आहे. नरेंद्र मोदींना ऊसातील आणि साखरेतील कारखानदारी कळते. हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केले हे विचारले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देश आर्थिकदृष्ट्या मजबूत केला – देवेंद्र फडणवीस
८० महिलांचे बचत गट तयार करून महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. दिव्यांगासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही भरीव काम करत असून लवकरचं ते प्रवाहात येईल. जगातील ५ देश हे दिवाळखोरीमध्ये जाणार आहेत. ज्यामध्ये भारत देश देखील असणार आहे. नरेंद्र मोदींना देश आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचा आहे. त्यांनी अर्थ व्यवस्थेमधील भ्रष्टाचार कमी केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.