लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election २०२४) तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. सर्वच पक्षांकडून महाराष्ट्रात जोरदार प्रचार सुरु आहे. अनेक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अश्यातच उत्तमराव जानकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. उत्तमराव जानकर म्हणाले, मी सध्या अजित पवार यांच्या पक्षात आहे. मात्र बारामतीमधून अजित पवार यांना पाडून मी पक्ष सोडणार असल्याचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी सांगितले आहे. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील (Mohite Patil) कुटुंबिय ३० वर्षांचे वैर संपवून पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
खासदारकी मोहिते पाटलांना तर आमदारकी उत्तम जानकारांना
काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे ३० वर्षांचे वाद संपवून पुन्हा एकत्र आले आहेत. जानकर आणि मोहिते पाटील एक समीकरण ठरले आहे. खासदारकी मोहिते पाटलांना तर आमदारकी उत्तम जानकरांना असा सौदा करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांपासून मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर ३०२ नुसार जुना गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तम जानकर यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले, असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे.
या मतदार संघाचा आमदार आमच्या पक्षाचा असेल
जयंत पाटील म्हणाले, लढायचं असेल तर सरळ लढा. केस दाखल करून आचारसंहिता भंग करत आहात. तुमचे राज्यात फिरणे अवघड करू. राज्यात जानकर आणि मोहिते पाटील यांनी वेगळी दिशा देण्याचे काम केलं आहे. शरद पवार साहेबांनी चांगले काम केले आहे. तसेच येथील उमेदवार घोषित करायला काही हरकत नाही. ७ उमेदवार आमचे उमेदवार चांगल्या फरकाने येतील, असे जयंत पाटील म्हणाले.