डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात याअगोदरही सोशल मीडियामुळे अनेक अनुचित प्रकार घडले आहेत. संपूर्ण देशात गाजलेल्या डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातही सोशल मिडिया हा मुख्य घटक होता. आता पुन्हा डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतही सोशल मीडिया हा प्रमुख घटक असून, या माध्यमातूनचं हा गंभीर प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या नराधमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे.
इंस्टाग्रामवर आजकाल शाळकरी तरुणाई ऍक्टिव्ह असतात. याचं माध्यमातून पीडीत मुलीची आरोपी सोबत ओळख झाली. 29 वर्षीय आरोपीने मुलीला फुस लावून तिला पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीच्या नातेवाईकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी याप्रकरणी काशिनाथ पाटील या आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.