मुलीच्या जन्मापूर्वी भारतीय जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यात अपघाती मृत्यू झाला (फोटो - सोशल मीडिया)
हे देखील वाचा : मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! दारूची विक्री दुकानं राहणार बंद, काय आहे नेमकं कारण?
जवान प्रमोद जाधव यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण दरे गावामध्ये शोक व्यक्त करण्यात आला. मात्र प्रमोद यांच्यावर काळाने घाला घातला. शनिवारी सकाळी जेव्हा प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जात होते, त्याच सुमारास त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीला जग बघायच्या आधीच पित्याचं छत्र हरवलं. अंत्यदर्शनावेळी तिला आपल्या वडिलांच्या जवळ नेण्यात आलं. यावेळी भावनिक भेटीने सर्वांचेच डोळे पाणावले.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
शनिवारी दुपारच्या सुमारास जवान प्रमोद जाधव यांच्यावर दरे गावात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यविधीच्या ठिकाणी जेव्हा प्रमोद यांची पत्नी देखील स्ट्रेचरवर आल्या होत्या. त्याचबरोबर नुकत्याच जन्मलेल्या नवजात बालिकेला आणण्यात आले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. हा क्षण अत्यंत भावूक होता. प्रमोद जाधव यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.






