मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क
राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayats) मुदत संपल्या असून या ग्रामपंचायतीवर प्रशासक (Administrators) नेमण्याची कार्यवाही सुरु करण्यात यावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाने दिले आहेत (orders have been given by State Election Commission, Rural Development Department).
राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींची मुदत (Terms) ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात संपत (Expiring) आहे. यात ७६४९ ग्रामपंचायती, नवनिर्मित ८ ग्रामपंचायती तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ ग्रामपंचायती यांचा समावेश आहे.
[read_also content=”राष्ट्रवादीचे नोव्हेंबरमध्ये दोन दिवसाचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डी येथे होणार – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/two-day-state-level-camp-of-ncp-will-be-held-in-shirdi-in-november-says-jayant-patil-331153.html”]
ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहेत तिथे निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. परंतु, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे ते प्रत्यक्ष निवडणूक यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जशा संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाला दिले आहेत.