कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chatrapati Shivaji Maharaj) कर्तृत्व विचार आणि वागणूक याचे कौतुक सारा महाराष्ट्र करत असताना कल्याणमध्ये (Kalyan) मात्र महाराजांच्या विचारांना मुजरा करण्यासाठी एक अनोखी कल्पना (Unique Idea) राबविण्यात आली आहे.
कल्याण पूर्व शिवजयंती उत्सव समितीच्या (Kalyan East Shiv Jayanti Celebration Committee) विद्यमाने तिसाई देवी मंदिराच्या पटांगणात (Tesai Devi Temple Ground) शिवजयंती निमित्त ‘जय शिवराय’ या शब्दांची ४ फुट बाय ४० फुटाची पुस्तक मांडणी तयार करण्यात आली असून या मांडणीत जनतेकडून मिळालेली ३ हजार पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
[read_also content=”कल्याणकरांची ‘ही’ मागणी पूर्ण होणार का? वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रवाशांची पसंती, वेटिंग लिस्ट फुल्ल – रेल्वे प्रशासनाची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/demand-of-kalyankars-be-fulfilled-vande-bharat-express-halt-at-kalyan-preferred-by-railway-passengers-waiting-list-full-says-central-railway-nrvb-370731.html”]
एका लाकडावर महाराजांचे नाव कोरून त्यात पुस्तके ठेवण्यासाठी मांडणी तयार करण्यात आली असून अनोख्या कलाकृतीचा आविष्कार पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘जय शिवराय’ या ब्रीद वाक्याबरोबरच पुस्तकांचे महत्त्वही या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे.
या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची जागतिक पातळीवर नोंद होण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजू अंकुश, विश्वस्त नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
[read_also content=”नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या अडचणी थांबेनात, आता ट्विटरनेही घेतलाय असा निर्णय, केलंय ‘हे’ काम; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/shocking-blue-tick-removed-from-shiv-sena-uddhav-balasaheb-thackerays-camp-twitter-account-nrvb-370723.html”]