सौजन्य - नवराष्ट्र टीम
माळशिरस : महाराष्ट्र राज्यातील लक्षवेधी ठरलेला पुणे -मिरज मार्गांवरील पुरंदर तालुक्याच्या जयाद्री खोऱ्यातील पुणे- कोल्हापूर -मिरज दुहेरी रेल्वे मार्ग आता कार्यन्वित झाला असून, शिंदवणे घाट माथ्यावरून केंद्रीय रेल्वे विभागाच्या परिश्रमातून उभारलेल्या दुहेरी मार्ग आणि दुहेरी बोगद्यातून आता दुहेरी रेल्वे धावू लागल्याचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळू लागले आहे. याच पुणे सातारा १४५ कि.मी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
मध्य रेल्वे विभागाला आव्हात्मक ठरलेला जयाद्री खोऱ्यातील शिंदवने घाट माथ्यावरील कठीण काम पूर्ण करण्यात यश मिळाले असून, हे काम भौगोलिक दृष्टीने कठीण होते; परंतु प्रगतीशील भारतीय उत्तम रेल्वे तंत्र आणि कौशल्य यामुळे हा मार्ग उभारला गेल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराजे कुंजीर यांनी सांगितले. १७ जून २०२५ रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तानी तपासणी केल्यानंतर दुहेरी मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली.
शिंदवने- आंबळे दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी १४० मीटर लांबीचा एक बोगदा बांधला, तीव्र उतार असल्याने अचूक योजना आखण्यात आल्या.१३ भागात विभागलेला पूल बांधण्यात आला. हा पूल एक वर्षात पूर्ण करण्यात आला.१६ तीव्र वळणे आणि १३ छोटे पूल उभारण्यात आले. या दुहेरी कारणामुळे रेल्वे गाड्या वेळेवर धावणार असून, या मार्गांवरील जेजुरी- लोणंद मार्गांवरील वाढते आउद्योगिककरणं परिसरातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे पाहता मालगाड्याची संख्याही वाढविण्यात येत असल्याचे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन नगरी जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायपालट होत असून, लवकरच या स्थानकात सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याना थांबा आणि एखाद्या एक्स्सप्रेस गाडीला जयाद्री अथवा मल्हार एक्सप्रेस नाव मिळणार आहे. याबाबत जेजुरी रेल्वे प्रवासी संघटना, श्री मार्तंड देवसंस्थान, ग्रामस्थ भाविक पर्यटक उद्योजक आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी निवेदनही दाखल केले असल्याचे जेजुरी भाजपा मंडल अध्यक्ष सचिन पेशवे यांनी सांगितले.
जयाद्री खोऱ्याच्या शिंदवणे घाट माथ्यावरील परिसरात ढवळेश्वर, तर शिल्प सौंदर्याने नटलेले केंद्रीय पुरातत्व खात्याने विकसित केलेले सर्वत्तम भुलेश्वर मंदिर ऐतिहासिक किल्ले पुरंदर, नारायणेश्वर, प्रति बालाजी सासवड नगरी येथील संगमेशवर चांगवटेश्वर, पुरंदरे वाडा, तर जेजुरी मंदिरासह होळकर पेशवे तलाव, कडेपठार नजिकच मोरगाव सोमेश्वर, वीर. मल्हारसागर डॅम अशी विविध पर्यटनासह तीर्थस्थळे असून, या जयाद्री, पुरंदर पंचक्रोशी परिसराला धार्मिक ऐतिहासिक अध्यात्मिक, औद्योगिक कृषी, आर्थिकदृष्ट्या महत्व आहे.
हे सुद्धा वाचा : कॅन्टोन्मेंट महापालिकेत? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता