अहमदनगर : राज्यसेभच्या उमेदवारीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून मदतीची अपेक्षा होती. परंतु शिवसेनेनं संभाजीराजेंना डावलत राज्यसभेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीनं संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या जागेसाठी मदत केली नाही, म्हणून संभाजीराजे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेलार नेमकं काय म्हणाले?
‘शिवसेनेनं कोणाला उमेदवारी द्यावी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. मुद्दा आहे की संभाजीराजे छत्रपती यांना जेव्हा सन्मानाने देण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेचा हात आखडता का होतो.स्वपक्षाच्या विचारांसाठी संकुचित का होतो, तसंच हात आखडता घेतला, त्यांनी संकुचितता दाखवली हा काही छत्रपतींचा आदर केलाय असं मी मानत नाही’. असं आशिष शेलार म्हणाले.
[read_also content=”मराठा आरक्षणाप्रकरणी विश्वासघात झाल्याने संभाजीराजेंनी भाजपची साथ सोडली; अतुल लोंढेंचा आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/sambhaji-raje-left-bjp-due-to-betrayal-in-maratha-reservation-issue-allegation-of-atul-londhe-nrdm-284769.html”]
आशिष शेलार यांनी यावेळी राज्यातील ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली. ‘ओबीसी आरक्षण मिळूच नये हीच भावना महविकास आघाडीची आहे.मध्य प्रदेशने पाठपुरावा केला,कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. मध्य प्रदेशने जे केलं ते करताना ठाकरे सरकारचे हात शिवले होते का ?, असा सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केला. ओबीसी आरक्षणावरून आमचा मोर्चा हा जन आक्रोश आहे.या आक्रोशाचा प्रतिबिंब म्हणजे हा मोर्चा होता.आम्ही हा संघर्ष दुप्पट करू, असंही आशिष शेलार म्हणाले.