मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Meeting) बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत (Maharashtra Song) असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राज्य शासनाने घेतलेले निर्णय कोणते?
राज्यात दुभती जनावरांचे गट वाटप करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमधील प्रति दुभत्या जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये.
उद्योग विभाग
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, २०१२ या विधेयक मसुदा सादर करण्यास मान्यता. परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होणार. यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार आहे.
जलसंपदा विभाग
पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करणार.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय. त्याकरिता अटींचीं पूर्तता करणे आवश्यक.