महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत जळगावमधील 48 अंगणवाड्यांचे रिनोव्हेशन केले जाणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Anganwadi Renovation News: जळगाव : जिल्ह्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाडी बांधकामासाठी डीपीडीसीकडून निधी मंजुर करण्यात आलेला आहे. या निधीतून ४८ अंगणवाडींचे बांधकाम केले जाणार आहे. या अंगणवाड्या ‘बाला’ या संकल्पेतून स्मार्ट केल्या जाणार आहे. दरम्यान या अंगणवाड्यांच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे ४८ अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार आहे. जिल्ह्यात अंगणवाड्या आहेत. त्यात ३ हजार ५० अंगणवाड्यांना हक्काचे छत आहे. तर मात्र उर्वरीत अंगणवाड्या अजून ही शाळा, ग्रामपंचायतीच्या जागा किंवा भाड्याच्या घरात भरविल्या जात आहे. त्यामुळे यंदा ४८ अंगणवाड्या डीपीडीसीच्या निधीतून प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील ४८ अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या कामांचा लवकरच ‘श्री गणेशा’ होणार आहे. त्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून नियोजन केले जात आहे. अंगणवाडीच्या एका बांधकामासाठी ११ लाख २५ हजारांपर्यंत निधी दिला जात आहे. तर आदिवासी भागातील अंगणवाडीसाठी १२.३० लाख रूपये निधी मिळतो. या आधी ८ लाख ५० हजार निधी मिळत होता. यंदा निधीची कमतरता असल्याने ४८ ठिकाणी अंगणवाड्या करता येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंगणवाडी केंद्राला आता बाला अंतर्गत नविन लुक दिला जात आहे. यात थ्रीडी पेन्टिंग केले जाणार असून हॉल, किचन ऑणि टॉयलेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतच्या ११ बाबींचा अंदाजपत्रकात समावेश आहे. विद्याथ्यांच्या स्वच्छतेसाठी हँडवॉश सेंटर उभारले जाईल. त्या ठिकाणी सोपकेस, साबन, आरसा, कंगवा हे साहित्य असेल, अंगणवाडी केंद्रात लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी फळे, फुले, कार्टुन, प्राणी, शैक्षणिक तक्ते तसेच आतुन आणि बाहेरून थ्रीडी पेन्टिंग केली जाईल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘या’ अंगणवाड्यांचा असणार समावेश
महिला व बालकल्याण विभागातील बाला संकल्पनेतून 48 अंगणवाड्यांचा कायापालट केला जाणार आहे. यामध्ये अमळनेरमधील सारबेटे खु, खापरखेडा, बिलखेडा, फापोरे खु. भडगाव वाडे (२), भुसावळ खडके, मोढाळा चाळीसगाव रहिपुरा, शिरसगाव, ओझर, गोरखपूर, गणपुर तांडा, चोपडा चहार्डी, अडावद, धरणगाव भवरखेडा, तारखेडा, पाळधी बु.(२) एरंडोल रिंगणगाव, कासोदा जळगाव धानवड तोडा, ममुराबाद, भादली बु. जामनेर तौडापूर, वाकडी, पहुर पेठ, शेरी, लाखोली, बिलगाव, भिलखेडा, मुक्ताईनगर वढोदा, राजुरा सुकळी, ईच्छापूर, तरोडा, पाचोरा निभोरी खु, लोहटार, नगरदेवळा, पारोळा पळासखेडा सिम, वाधरी रावेर अहिरवाडी, विवरे बु. यावल बामणोद, विरोदा, साकळी, डांभुर्णी या ठिकाणी अंगणवाडीची काम मंजुर करण्यात आली आहे.






