जालन्यात मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामने, नेमकं घडलं काय?
वडीगोद्री येथे जालनामध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले आहेत. गुरुवारीही वडीगोद्रीत मराठा-ओबीसी आंदोलने आमनेसामने आली होते. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
मनोज जरंगे पाटील अंतरावाली सराटी येथे आंदोलनाला बसल आहेत. अंतरवली सराटीला जाण्याचा रस्ता वडीगोद्री येथूनच आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही वडीगोद्री येथे आंदोलन करत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूचे आंदोलक समोरासमोर उभे ठाकले आहेत.
गुरुवारी रात्री मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्या वडीगोद्री येथून जात होत्या. मात्र तेथे मराठा आंदोलकांच्या गाड्या पोलिसांना अडवल्या. तसेच ओबीसी आंदोलकांनी देखील गाड्या सोडण्याबाबत पोलिसांना जाब विचारला. याच मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा बांधव अंतरवली सराटी येथे जात आहे. आज पुन्हा पोलिसांनी वडीगोद्री येथे मराठा बांधवांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी लक्ष्मण हाके यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
मराठा बांधवांच्या गाड्या अडवल्या तर इथेच आंदोलनाला बसू असा इशाराही त्यांना दिला. याशिवाय मराठा बांधवं अंतरवाली सराटी येथे जात असताना ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर मराठा बांधवांनी देखील जोरदार घोषणाबाजी सुरु केली. आमच्या सोबत असा अत्याचार का? मनोज जरांगे यांना भेटण्यापासून आम्हाला का रोखलं जातंय? असा सवालही मराठा बांधवांनी उपस्थित विचारला.