मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आरक्षणाबाबत भाष्य (फोटो- ani )
मराठा आरक्षणाचा जीआर काढताच ओबीसी संघटना आक्रमक
पुण्यात ओबीसी नेत्यांनी फाडला जीआर
मंत्री भुजबळांच्या नाराजीवार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Chagan Bhujbal: महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मण्या करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबादचे गॅझेट सरकारने मान्य केले आहे. मात्र आता या आरक्षणच्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून छगन भुजबळ उठून गेल्याचे म्हटले जात होते. दरम्यान आता या सर्व विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
छगन भुजबळ कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. हा जो जीआर आपण काढलेला आहे, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मी त्यांना आश्वस्त केले आहे. हा सरसकट जीआर नसून हा पुराव्याचा जीआर आहे. मराठवाड्यात इंग्रजांचे नव्हे तर निजामाचे राज्य होते. मराठवाड्यातील पुरावे हे हैदराबादच्या गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथे पुरावे आम्ही ग्राह्य धरलेले आहेत. पुराव्यांमध्ये जे कुणबी आहेत त्यांनाच हे मिळणार आहे.
'जेएन पोर्ट – पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2'चे उदघाटन व विविध विषयांवर माध्यमांशी संवाद…
(जेएनपीए, उरण | 4-9-2025)#Maharashtra #JNPA pic.twitter.com/qcyXULRf7V
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 4, 2025
अनेक ओबीसी संघटनांनी याचे स्वागत केले आहे. आम्हाला शंका नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुजबळ यांच्या मनातील शंका देखील आम्ही दूर करू. जोपर्यंत हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ शकत नाही. जोवर हे राज्य आहे तोवर एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला द्यायच असे होऊ देणार नाही. आम्ही मराठा समाजाचे त्यांना आणि ओबीसी समाजाचे त्यांना देणार. दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही.