जालना : लतादीदी गॉड गिफ्टेड व्यक्तिमत्त्व होत्या, त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी स्वरांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात राहतील अशी प्रतिक्रीया देत राजेश टोपे यांच्याकडून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
[read_also content=”https://www.navarashtra.com/beed/marathwada/beed/pankaja-munde-reaction-on-lata-mangeshkar-demise-nrps-233509.html पंकजा मुंडेंकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा”]
लता मंगेशकर या गॉड गिफ्टेड व्यक्तिमत्त्व होत्या.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे अवघ्या जगाला दुःख झालं आहे, त्या जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्वरांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यासोबत राहतील अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली.गेल्या महिनाभरापासून मी त्यांच्या तब्बेतीची नियमित विचारपूस करत होतो. त्या कोरोना आजारातून बऱ्या झाल्या होत्या. मात्र इतर आजारांमुळे त्यांची तब्बेत खालावत गेल्यानं त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. त्यांना चिरशांती लाभो अशा शब्दांत टोपे यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनामुळं मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.