मुंबई: पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chawl Scam Case) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक झाली. आता संजय राऊत यांना ८ दिवसांच्या ईडी (ED) कोठडीनंतर २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात आलं होतं. सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं संजय राऊत यांना पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.
[read_also content=”जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून सुरुवात, ‘या’ खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा https://www.navarashtra.com/sports/badminton-world-championship-starts-from-tomorrow-india-expect-medals-from-this-players-318487.html”]
पत्राचाळ प्रकरणात ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक केली होती. त्यानंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आज पुन्हा संजय राऊत यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.