पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा
या संदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सहकार्य करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, अशी आम्ही मागणी केली होती. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जर पर्यटक येथे चहा, नाष्टा, पर्यटन, मुक्काम या कामांसाठी येत असतील तर येथे स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे, असे अामदार भाेसले यांनी म्हटले अाहे.
पर्यटकांना सुविधा मिळणार
हॉटेल व्यवसाय जर येथे वाढला तरच पर्यटकांना सुविधा मिळणार आहेत, हे समाजसेवकांनी लक्षात ठेवावे. ज्या स्थानिक भूमिपुत्रांचा व्यवसाय वैध आहे, त्यांनी आपली बांधकामे प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. अशा स्थानिक भूमिपुत्रांच्या बांधकामांना अजिबात हात लावू देणार नाही, असा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.