कल्याण : राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा गौप्य स्फोट केला आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवार यांचा तर्क असू शकतो. रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील त्यातून त्यांनाही टीप मिळाली असेल. माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे. कल्याण लोकसभा भाजपला जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सध्या वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे. भाजपचे मोठे नेते अनुराग ठाकूर यांच्या सहभागाचे पदाधिकारी या लोकसभा मतदारसंघात बैठका घेतात त्यामुळे या ठिकाणची उमेदवारी कोणता पक्ष घेईल याबाबत संभ्रम आहे असे सांगितले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ही लोकसभा निवडणूक मनसे लढवेल स्वबळावर असे देखील सांगितले.
कल्याण पूर्व येथील अमोल गव्हाणे या तरुणाने आपल्या घरात मनसेला एक हाती सत्ता द्या असा देखावा साकारला आहे या देखावा बघण्यासाठी आज मनसे आमदार राजू पाटील अमोल गव्हाणे यांच्या घरी भेट दिली. कल्याण डोंबिवली शहरातील रक्तांवरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय . मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष केले . प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झालेत, वन विंडो स्कीम सुरू आहे, या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत.. अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यात सत्ताधारी देखील सहभागी असतात त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही त्यामुळे जसे गणपती खड्ड्यातून गेले तसे येत्या निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल अशी अशी सडेतोड टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासनावर केली.
कल्याण डोंबिवली शहरातील रक्तांवरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय . मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष केले . प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झालेत, वन विंडो स्कीम सुरू आहे, या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यात सत्ताधारी देखील सहभागी असतात त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही त्यामुळे जसे गणपती खड्ड्यातून गेले तसे येत्या निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल अशी अशी सडेतोड टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासनावर केली.
कल्याणमध्ये अमोल गव्हाणे या मनसे कार्यकर्त्याने घरगुती गणेशोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा देखावा सादर केलाय.. या देखाव्यात राज ठाकरे हे भाषण करताना दिसतायत तर त्यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील ,नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मनसे नेते त्यांच्या पाठीमागे बसलेले दिसून येतायत. अमोल ने साकारलेला राज ठाकरे यांच्या सभेचा देखावा शहरात चर्चेचा विषय ठरलाय . मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या देखाव्याला भेट देत गव्हाणे यांचे कौतुक केले. याबाबत बोलताना अमोल गव्हाणे यांनी सांगितले की राज ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी केलेला काम घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ,जेव्हा जेव्हा मराठी माणूस व मराठी सणांना त्रास झाला त्या त्या वेळेला राज ठाकरे मराठी माणसाच्या मागे खंबीर उभे राहिले… सध्याचे राजकारण खूप खराब झाले त्या अनुषंगाने एकदा तरी साहेबांच्या पाठीमागे उभे रहा ..राज साहेबांना स्वीकारा असे आवाहन या देखावाच्या माध्यमातून केले . राज ठाकरे यांना मुख्यमंत्री होताना बघायचंय असे साकडं गणरायाला घातल्याचे देखील अमोल गव्हाणे यांनी सांगितले.