कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या प्रभाग कार्यालया शेजारी उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदार श्रीकांत शिंदे स्मारक समितीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले माझ्याकडे शब्द अपूर्ण आहेत, कल्याणच्या जनतेचे स्वप्न या स्मारकाच्या निमित्ताने पूर्ण झाले आहे. लोकांना जितका आनंद झाला आहे. त्याहीपेक्षा मला त्याचा आनंद झाला आहे. एका पुतळ्यापासून सुरू झालेली कथा एका स्मारकापर्यंत जाऊन पोहोचली. कल्याणकरांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यातूनच हे स्मारक उभे राहिले.
लोकांचे इच्छा मी लोकसभेत जावे, मी शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागितला आहे. हा मतदारसंघ मिळाला तर मी लडेल नाहीतर दिल्लीकडे कूच करेल असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलताना म्हणाले. श्रीकांत शिंदेंना उद्देशून आपल्या शैलीत आम्ही श्रीकांत तुझ्या पाठीशी आहोत तू लोकसभेत खासदार बनणारच आहेस, तू लोकसभेत खासदार बनल्याशिवाय मला मंत्री होता येणार नाही, श्रीकांतला चांगल्या मतांनी निवडून आणायचा आहे. दोन वेळेला तो निवडून आला आहे, तिसऱ्या वेळेला देखील निवडून आणायचा आहे, मी राज्यसभेवर आहे मी सुद्धा आरपीआयला एक जागा मागितली आहे. देशातल्या लोकांचे म्हणणं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ मी मागितला आहे जर मला मिळाला तर मी तिथून लढणार आहे नाहीतर मी दिल्लीकडे कुच करणार आहे.