कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
KDMC News : कल्याण पूर्वेतील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी शहर प्रमुख निलेश शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ठाण्यात भेट घेतली. विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचीशी चर्चा केली. या समस्या सोडविण्यासाठी सरकार सरकारात्मक असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे. या भेटीच्या वेळी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी,प्रमोद पिंगळे, राजाराम पावशे, संदीप माने आदी उपस्थित होते.
शहर प्रमुख शिंदे यांनी सांगितले की, कल्याण पूर्वेत पाण्याची समस्या आहे. नागरीकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरीक पाणी समस्येमुळ त्रस्त आहेत. ही पाणी समस्या सोडविण्यासाठी काही दिवसापूर्वी समस्त सदस्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत चर्चाही केली होती. त्यातून काही एक तोडगा निघालेला नाही. कल्याण शहराची पाण्याची भविष्यातील गरज पाहता महापालिकेस एक स्वतंत्र धरण हवे. धरणाची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे.
धरणाच्या मागणीचा विचार करण्यात यावा या विषयावर या बैठकीत चर्चात करण्यात आली. त्याचबरोबर कल्याण पूर्वेत कल्याण तळोजा मेट्रोचे काम सुरु आहे. त्याठिकाणी यापूर्वी ४५ मीटरचा रस्ता होता. तो ३० मीटरचा करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्धवते आहे. ही वाहतूक कोंडीची समस्या साेडविण्यासाठी जो ४५ मीटरचा रस्ता होता. तो ४५ मीटरचाच रस्ता करण्यात यावा. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबराेबर ग्रामसेवकांच्या मानधनाचा विषय आहे. तो मार्गी लावण्यात यावा याकडे लक्ष वेधण्यात आले. या सगळ्या समस्यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडण्यात आल्या. त्यावर उपमुख्यमंत्री शिंद यांनी सर्व समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले आहे.
तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये १५ ऑगस्ट रोजी मटण आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने वाद वाढला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) स्वातंत्र्यदिनी महानगरपालिका क्षेत्रात मटण आणि चिकन विकले जाणार नाही असा आदेश जारी केला आहे.
नागरिक, व्यापारी संघटना आणि कसाई समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, या आदेशाचा त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होईल. जर हा आदेश मागे घेतला नाही तर १५ ऑगस्ट रोजी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर मटण आणि चिकन विकून निषेध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे विरोधी पक्ष आणि समाजातील लोकांच्या आक्षेपानंतरही केडीएमसी आपल्या निर्णयावर ठाम आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या बंदीला पाठिंबा देत म्हटले आहे की, एक दिवसही मटण आणि चिकन न खाल्याने सामान्यांवर, विशेषतः सावन महिन्यात कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी याला अन्याय्य म्हटले आहे आणि अन्नाची निवड ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे असे म्हटले आहे.