ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाची उभारणी होणार
या प्रकल्पासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून, दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या महत्त्वाच्या मार्गाला आता गती मिळणार आहे. यासाठी खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकारातून कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते काँक्रीटीकरण, कल्याण-शिळफाटा मार्ग, पलावा उड्डाणपूल, मुंब्रा वाय-जंक्शन, कल्याण रिंग रोड, मोठागाव-मानकोली उड्डाणपूल यांसह अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होत असून, नागरिकांच्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर सुलभता निर्माण झाली आहे.
ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यान उन्नत मार्ग (फ्लायओव्हर) आणि १५ मीटर रुंद जोडरस्ते विकसित केले जातील. परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला वाहतूक ताण, वारंवार होणारा विलंब आणि अपघाताचा धोका कमी करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. ठाकुर्ली, मानपाडा, डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ वाहतूक मिळण्यास मोठी मदत होईल.
उन्नत मार्ग:
लांबी – 360 मीटर
रुंदी – 7.5 मीटर
जोडरस्ता:
लांबी – 1050 मीटर
रुंदी – 7.5 / 8.5 मीटर
प्रकल्पाचे फायदे






