मालमत्ता कर थकविल्याने महेक सोसायटीतील 17 गाळे सील; कारवाईस नागरीकांचा विरोध
कल्याण- कल्य़ाण पूर्व परिसरात मनपाने रहिवासी सोसायटीवर कायदेशीक कारवाई केली आहे. मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी सोसायटीतील गाळे सील करण्यात आले आहेत. कल्याण मलंग रोड परिसरातील नांदिवली भागात असलेल्या महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेच्या 9 आय प्रभागाच्या कारवाई पथकाने सोसायटीतील17 व्यापारी गाळे सील करण्याची धडक कारवाई केली. या कारवाईस इमारतीच्या मालकाने कडाडून विरोध केला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
नांदिवली परिसरातील महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकविला आहे. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या 9 आय प्रभाग कार्यालयाने सदनिकाधारक आणि गाळेधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेने बजावलेल्या नोटिसा सदनिकाधारक घेत नाहीत. तसेच गाळेधारकांच्या दुकानावर नोटिसा लावण्यात आल्या होत्या. महापालिकेने लावलेल्या कारवाईच्या नोटिसा गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी फाडून टाकल्या होत्या. अखेरीस आज महापालिकेच्या 9 आय प्रभागाचे सहाय्यक भारत पवार यांच्या आदेशानुसार अधीक्षक भास्कर रेरा, सुधीर पालणकर, गणेश वायले यांचे कारवाई पथक महेक सोसायटीत पोहचले. कारवाई दरम्यान पाेलिस ही उपस्थित होते. यावेळी कारवाईस सदनिकाधारकांनी विरोध केला. मात्र महापालिकेच्या कारवाई 17 गाळे सील करण्याची कारवाई केली आहे.
सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले की, 2025 साली महापालिकेत 27 गावे समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 27 गावात 1 7गाळे इतक्या मोठ्या मालमत्ता कराच्या थकबाकी रक्कमेपोटी सील करण्याची ही पहिली मोठी कारवाई कारवाई आहे. या संदर्भात इमारतीचे मालक द्वारकादास वाधवा यांनी सांगितले की, आमचा या कारवाईस तीव्र विरोध आहे. मनपाच्या कारावाईस रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटिसानुसार आमच्या मालमत्तांना 50 टक्के व्याज आकारले आहे.27गावात आमची इमारतीत घरे सेल करण्याची परवानगी दिली नाही. शेजारच्या इमारतीली घरे सेल केली जात आहे. हा दुजाभाव आहे. घरे सेल झाली तर त्यातून आलेलेल्या पैशातून आम्ही मालमत्ता कर भर शकतो.