मुंबई : 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रा.डॉ. मेधा सोमय्या 18 मे रोजी शिवडी कोर्ट, मुंबई येथे करणार असल्याची माहिती किरीट सोमय्यायांनी दिली आहे(Kirit Somaiya’s wife will file a defamation suit against Sanjay Raut).
राऊत यांनी आयएनएस विक्रांत नंतर किरीट सोमैया यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. राऊत यांचे सर्व आरोप सोमय्यांनी फेटाळले होते.
यापूर्वीही मी तक्रार केली होती. बदनामीची नोटीस दिली होती. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. एक रुपयाचाही घोटाळा झाला नाही आहे. घोटाळ्याचे कागदपत्र नाहीत तर हा फक्त दहशतवाद असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मिरा भाईंदर शहरामध्ये जवळपास 154 सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी 16 शैचालये बांधण्याचे कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्या एका संस्थेला मिळाले. युवा प्रतिष्ठान असे या संस्थेचे नाव आहे. कामात बोगस कागदपत्रे तयार करून मिरा भाईंदर महापालिकेची दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आली. तसेच, या कागदपत्रांच्या आधारे जवळपास साडेतीन कोटींपेक्षाही अधिक रकमेची बिले घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”क महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]