किरीट सोमय्या : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी आज पत्रकार परिषद (press conference) घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खिचडी घोटाळा उघडकीस आणला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांचा मित्र आणि परिवाराच्या खात्यामध्ये खिचडी घोटाळ्याचे पैसे जमा झाले आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी राऊतांवर केला आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याबरोबर आता अमोल कीर्तीकर यांचे देखील नाव खिचडी घोटाळ्यामध्ये येण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणांमध्ये अमोल कीर्तिकर यांच्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे जमा झाले असल्याची शंका व्यक्त केली आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेत म्हणाले, खिचडी घोटाळ्यामध्ये ठाकरे आणि त्याचे नेते हे अधिकाऱ्यांना फोन करून याला कॉन्ट्रॅक्ट द्या त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या. सुरज चव्हाणच्या खात्यामध्ये गेले आहेत की सुजित पाटकरांच्या खात्यात गेले आहेत. संजय राऊतांच्या परिवाराच्या खात्यात पैसे गेले आहेत. माहिती अशीही मिळाली आहे की आदित्य ठाकरे यांचे आणखी एक सहयोगी अमोल कीर्तिकर यांच्या खात्यामध्ये सुद्धा खिचडीचे पैसे गेले आहेत का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, आमच्याकडे जी माहिती येते ती माहिती आम्ही ईडी ला देतो. चौकशी ते करतात कोणाला बोलवायचं केव्हा बोलवायचं त्यावेळचे पालकमंत्री यांच्या निकटवर्ती याला देखील खिचडी घोटाळ्याच कॉन्ट्रॅक्ट मिळाल होत. ती जबाबदारी आणि अधिकार मुंबई पोलिसांचा आहे. आमच्याकडे असलेले कागदपत्र यांचे पुरावे आम्ही इन्कम टॅक्स आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे दिले आहेत. आता त्यांचं काम आहे, त्यांनी कोणाला आणि कधी बोलवायचं, हे ते ठरवतील अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.