मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधल्या (MVA) अनेक मंत्र्यांसह शिवसेना (Shivsena) नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) रडारवर आहेत. अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ते करत होते. त्यातच सोमय्या यांच्यामुळे अनेक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. आता संजय राऊतांची (Sanjay Raut) पाळी आहे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
मुंबई ईडी कार्यालयात (ED Office) आज संजय राऊत यांना हजर राहण्याचे समन्स (Summons) आले आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स आहे. मात्र, पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू असल्यामुळे राऊत यांचे वकील वेळ मागून घेणार आहेत.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
Ab #SanjayRaut ki Bari Hai
_ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अब संजय राऊत की बारी है @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 20, 2022
गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याविषयी (Goregaon Patrachal Land Scam) किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला. याआधीही सोमय्या यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik), अनिल परब (Anil Parab) यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे आणि आता संजय राऊत यांनादेखील चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसते.