कोल्हापुरात पाण्यासाठी लोकांचे हाल (फोटो istockphoto)
कोल्हापूर: गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरातील विविध ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले अखेर जिल्हा अभियंता आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र आणि गणेश उत्सव सोहळ्याच्या सणात पाणी पाणी करण्याची वेळ शहरातील नागरिकांच्या वर आली आहे.
मिरजकर तिकटी येथे दोन तास महिलांनी पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन छेडले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत गरज असलेले पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. अखेर जल अभियंता आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. काल मध्यरात्री परिसरातील महिलांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज सकाळी मंगळवार पेठ टिंबर मार्केट परिसरातील महिला रस्त्यावर उतरल्या आणि मिरजकर तिकटी येथे मोठा रस्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामुळे मंगळवार पेठ, खरी कॉर्नर व टिंबर मार्केट परिसरात वाहतुकीची मोठी गैरसोय झाली.
नेमके काय घडले?
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइनमध्ये काहीसा बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. महानगरपालिकेने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरातील विविध ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले असल्याचे पाहायला मिळाले.
मंत्री मुश्रीफ यांची नाराजी