लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर
Ganesh Chaturthi 2025 साठी अवघे काही दिवस उरले आहे. गणोशोत्सव म्हंटलं की आपसूकच एका मंडळाची चर्चा होत असते. हे मंडळ म्हणजे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ. दरवर्षी लालबागच्या राजाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून देशभरातून कोट्यावधी भाविक लालबाग परिसरात दाखल होत असतात. नुकतेच 2025 मधील लालबागच्या राजाची झलक पाहायला मिळाली आहे. मंडळाच्या अधिकृत सोशल मीडियावर पेजवर Lalbaugcha Raja 2025 ची झलक पाहायला मिळेल.