निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिक कराड चालतात अन् आता...; लक्ष्मण हाके सत्ताधाऱ्यांवर कडाडले
सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून स्वत:च्या फायद्याचं राजकारण करू पाहत आहेत. ते एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम करत आहेत. मोर्चे काढत असून जाणीवपूर्व धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेवेळी बोलत होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करत नाही. पण आम्हाला मंत्री होता येत नाही, खासदार-आमदार होता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी माणसं तिकडे हवी आहेत. तुम्ही त्यांनाच गुन्हेगार ठरवत आहात. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असलं जात आहे. वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध होते. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत.
तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिक अण्णा चालतो, वाल्मिक अण्णांची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ करायला चालतात. निवडणूक जिंकायला सगळ्यांना वाल्मिक अण्णा चालतात, या गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. निवडणुकीत त्यांच्या स्कीलचा उपयोग करुन घेतला जातो आणि आता लक्ष्य करण्यासाठी तुम्हाला फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दिसतात. या माणसांना अडकवलं जात आहे. या गोष्टी ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचं वातावरण तापलं आहे. त्यात ओबीसी समाजाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभा घेतली. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगें पाटील यांच्यावर हल्ला चढवला. शिवाय वाल्मिक कराडचा संबंध शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सुरेश धस यांनी बीडला गँग ऑफ बीड म्हटलं. निवडणूक होईपर्यंत या माणसाची भाषा एक होती. मात्र निवडून आल्यानंतर यांची भाषा बदलली. ज्यावेळी आतंरवाली सराटीमध्ये अत्याचार झाला. ओबीसींची घरे जाळण्यात आली. त्यावेळी गँग्स ऑफ बीड म्हणणाऱ्या सुरेश धसांना हे दिसलं नाही का? त्यावेळी किती शस्त्र परवावाने दिले होते याची माहिती सुरेश धस यांना नव्हती का. सुरेश धस या माणसाने संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण चालवलं आहे.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी, त्यांचा खून झाला त्यावेळी सांगितलं होतं की, ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नव्हती. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जातात. प्रत्येक ठिकाणी खून होतात, त्या प्रत्येक खूनामागे जात शोधत बसायची का? ओबीसी समाज आज दहशतीखाली आहे.
क्षिरसागर, साळुंखे यांची घर जाळण्यात आली होती. त्यांच्या मतदतीली ओबीसी समाज धावून आला होता. मात्र आज त्याच ओबीसींविरोधात राजकारण केलं जात आहे. हत्येला गुन्ह्याला कोणतीही जात नसते. कोणत्याही गुन्हेगारीची कोणताच समाज समर्थन करत नसतो. सीआयडी, एसआयची आहे.
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायंच आहे की आम्ही सर्व ओबीसी समाजाने तुमच्याकडे बघून महायुतीला मतदान केलं आहे. पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे यांच्या आडून गृहविभागावर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि त्या गृह विभागाचे प्रमुख स्वत: देवेंद्र फडणवीस आहेत. तुमचा पक्ष प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन राजकारण करतो आणि तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्रांची जमीन सुद्धा हडप करतात.
आमदार खासदार झाल्यानंतर तुम्ही सर्वाचं प्रतिनिधी असतात मग जातीचे मोर्च कसले काढता, असा सवाल त्यांनी केला. तर वाल्मिक कराड यांचे फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे, सुरेश धस यांच्यासोबत आहेत. निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिक कराड चालतात. मात्र आता त्यांना अडकवलं जात आहे. त्यामुळे कुठेतही दहशत माजवण्याचं काम केलं जात आहे.
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना माझा प्रश्न आहे. पुण्यात रोज कोयता गँगची दहशत असते. कित्येक खून होतात. मात्र ते आंतरवाली सराटीत भेटायला गेले. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी का गेले.