मुंबई : म्हाडाच्या (MHADA) पुणे (Pune) मंडळातील ५२११ घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीद्वारे सोडतीचा कार्यक्रम पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार (Mhada Pune Lottery) ५२११ घरांसाठी सुमारे ७१ हजार ७४२ अर्ज आले होते.
[read_also content=”‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकणार मधुराज रेसिपी फेम मधुरा बाचल https://www.navarashtra.com/movies/madhuras-reciepes-fame-madhura-bachals-entry-in-sukh-mhanje-nakki-kay-asta-nrsr-317249.html”]
पुणे मंडळाकडून अर्जविक्री-स्वीकृती आणि सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून आज सोडत काढण्यात आली. ही सोडत खरंतर २९ जुलैला काढण्यात येणार होती. मात्र राज्य सरकारकडून म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल करण्यात आला. त्यामुळे नवीन उत्पन्न मर्यादेसह अर्ज भरून घ्यावे लागले. संगणकीय प्रणालीत तसे बदल करून पुणे मंडळाने जुलैमध्ये अर्जस्वीकृती सुरू केली. या पार्श्वभूमीवर साहजिकच सोडत पूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देऊन सोडत २९ जुलैऐवजी १८ ऑगस्टला निश्चित करण्यात आली होती.
या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे. यात २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील १७०, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील २६७५ आणि म्हाडाच्या विविध योजनेतील २७९ घरांचा समावेश आहे. या सोडतीद्वारे ५२११ अर्जदार विजेते ठरले असून आता पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करून त्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते सागर खैरनार ठरले आहेत.