कोणाला धक्का, कोण ठरलं किंगमेकर; महाराष्ट्रातील पहिले १० निकाल वाचा नवराष्ट्रवर
राज्यात यावेळी विधानसभा निवडणुकीचा निकालने अनेकांना धक्का दिला आहे. बड्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महायुतीने जवळपास २२९ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीला मात्र मविआला जोरदार धक्का बसलाय. मविआला फक्त ५४ जागांवर आघाडी मिळाली आहे. निवडणुकीच्या काही जागांवर राज्यात धक्कादायक निकाल लागले आहे. पाहूयात आतापर्यंत कोणाचा विजय झालं. कोणाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
श्रीवर्धन मतदारसंघ
श्रीवर्धवन मतदारसंघातून आदिती तटकरे यांनी ८२ हजार ७९८ मतांनी विजय मिळवलाय. आदिती तटकरे यांना 116050 मते मिळाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल नावगाने यांचा पराभव केला.
बाळासाहेब थोरात पराभूत
विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचाच्या शर्यतीत असलेले बाळासाहेब थोरात संगमनेरमधून पराभूत झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ विजयी झाले आहेत. संगमनेर मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र महायुतीच्या लाटेत बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
बचू कडू पराभूत
महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
माढा मतदारसंघ
माढ्यामध्ये शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. माढ्यात तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये पाटील यांनी बाजी मारली. अपक्ष रणजीत शिंदे यांचा 30621 मतांनी पराभव झाला. अभिजित पाटील यांना 136559 इतकी मते मिळाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मिनलताई साठे यांना फक्त 13381 इतकी मते मिळाली.
भिवंडी ग्रामीण
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शांताराम मोरे यांनी विजय मिळवला आहे. मोरे यांनी ठाकरेंच्या गहतोल अंबो यांचा ५७ हजार ९६२ मतांनी पराभव केला. मोरे यांना 127205 मते मिळाली तर अंबे यांना 69243 मते मिळाली.
सातारा मतदारसंघ
साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठा विजय मिळवलाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल १ लाख ४२ हजार १२४ मतांनी विजय मिळवलय. ठाकरेंच्या अमित कदम यांना फक्त ३४ हजार ७२५ मते मिळाली आहेत.
कणकवली
कणकवलीमधून नितेश राणे पुन्हा एकदा आमदार झाले आहेत. नितेश राणे यांनी 57601 मतांनी विजय मिळवला आहे. नितेश राणे यांना १ लाख ७ हजार १७४ मते मिळाली आहेत. संदेश पारकर यांना 49573 मते मिळाली.
पालघर मतदारसंघ
पालघरमध्ये राजेंद्र गावित यांनी ४० हजार ३३७ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरेंच्या जयंद्र दुबळा यांचा पराभव केला. गावित यांना 112894 इतकी मते मिळाली.
निफाड
निफाडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला आहे. अनिल कदम यांचा २९ हजार २३९ मतांनी पराभव झाला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिलीपराव बनकर यांचा विजय झाला, त्यांना १२०२५३ मते मिळाली.
घाटकोपर-पूर्व
घाटकोपर-पूर्व मतदारसंघात भाजपच्या पराग शाह यांनी ३४ हजार ९९९ मतांनी विजय मिळवलाय. त्यांनी काँग्रेसच्या राखी जाधव यांचा पराभव केला. राखी जाधव यांना ५०३८९ मते मिळाली.
वडाळा मतदारसंघ W
भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी नवव्यादा विजयी गुलला उधळला. कोळंबकर यांनी २४ हजार ९७३ मतांनी विजय मिळवला. ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांचा त्यांनी पराभव केला. श्रद्धा जाधव यांना ४१ हजार ८२७ मते मिळाली.
महाड विधानसभा मतदारसंघ
महाडचा गड राखण्यात भरत गोगावले यांना यश आले आहे. भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा २६ हजार २१० मतांनी पराभव केला. भरत गोगावले यांना 117442 मते मिळाली.