Maharashtra Breaking News, Marathi News Live Updates
29 Dec 2025 10:55 AM (IST)
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 128 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे केवळ दोनच दिवस शिल्लक असतानाही भाजपकडून अद्याप संपूर्ण उमेदवार यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून ही रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
नील सोमय्या – वॉर्ड क्रमांक 107
तेजिंदर सिंग तिवाना – वॉर्ड क्रमांक 47
नवनाथ बन – वॉर्ड क्रमांक 135
संतोष ढाले – वॉर्ड क्रमांक 215
शिवानंद शेट्टी – वॉर्ड क्रमांक 9
स्नेहल तेंडुलकर – वॉर्ड क्रमांक 218
अजय पाटील – वॉर्ड क्रमांक 214
सन्नी सानप – वॉर्ड क्रमांक 219
तेजस्वी घोसाळकर – वॉर्ड क्रमांक 2
29 Dec 2025 10:54 AM (IST)
हरयाणा सिटी गॅसला (एचसीजी) ८ वर्षांत नागपूर जिल्ह्यात शुद्ध नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्क वाढवायचे उद्दिष्ट आहे. कंपनीला हा प्रकल्प २ वर्षांत जिल्ह्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यामुळे उद्योगांना २४ तास नैसर्गिक वायूचा पुरवठा सुनिश्चित होईल, तसेच नागपूर सिलिंडरमुक्त होईल. यासाठी सर्व मान्यता लवकरच मिळतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले.
29 Dec 2025 10:49 AM (IST)
येत्या दोन दिवसांत 2025 हे वर्ष संपणार आहे. यावर्षी टेक विश्वात अनेक मोठे बदल झाले. काही बदल चांगले होते तर काही बदल वाईट होते. टेक जायंट कंपनी अॅपलने नवीन आयफोन सिरीज, स्मार्टवॉच, मॅकबुकसह नवीन अपडेट देखील लाँच केले. ज्यामुळे यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलला. कंपनीने यावर्षी अनेक डिव्हाईस तर लाँच केलेच पण त्यासोबतच काही प्रोडक्ट्स बंद करण्याचा देखील निर्णय घेतला. तसेच काही प्रोडक्ट्सना नवीन प्रोडक्ट्ससोबत रिप्लेस देखील करण्यात आलं.
29 Dec 2025 10:41 AM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना रविवार, २८ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात विक्रम मोडत भारताने ३० धावांनी विजय मिळवला आणि सलग चौथा मालिका विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात भारताचे वर्चस्व राहिले, परंतु सामना संपताच चाहत्यांनी हरमनप्रीत कौरचा मैदानावर राग पाहिला. भारतीय कर्णधार इतकी संतापली की ती मैदानाच्या मध्यभागी तिच्याच खेळाडूंवर ओरडताना दिसली.
We are back ☠️ pic.twitter.com/sW6c0jfDuG
— Pluto 😎 (@cbnforvictory) December 28, 2025
29 Dec 2025 10:33 AM (IST)
गेल्या आठवड्यात शेअर बाजारासाठी निराशाजनक दिवस होता. सुट्ट्यांमुळे कमी ट्रेडिंग सत्रे झाली, ज्यामुळे बाजारात मंदी आली. देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांवरही याचा परिणाम दिसून आला. टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे ३५,४३९ कोटींनी घसरले. या घसरणीत सरकारी मालकीची बँकिंग कंपनी असलेल्या स्टेट बैंक ऑफ इंडियाला सर्वांत मोठा तोटा सहन करावा लागला. जरी बीएसई सेन्सेक्स आठवड्यात किंचित वाढीसह बंद झाला, तरी सर्व प्रमुख कंपन्यांना फायदा झाला नाही.
29 Dec 2025 10:24 AM (IST)
मेक्सिको सिटी : मेक्सिकोत (Mexico) भीषण अपघात घडला आहे. रविवारी (२८ डिसेंबर) दक्षिण मेक्सिन राज्यात ओक्साका रेल्वे अपघात (Train Accident) घडला. प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या अपघाताचा भयावह व्हिडिओ देखील समोर आला आहे.
29 Dec 2025 10:16 AM (IST)
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ चा तिसरा फेरीचा सामना आज खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणारे दोन स्टार खेळाडू – रोहित शर्मा आणि विराट कोहली – आज खेळताना दिसणार नाहीत. हो, कोहली आणि रोहित मैदानावर खेळत नसल्याबद्दल चाहते नक्कीच निराश होतील, परंतु आमच्याकडे तुमच्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माशी संबंधित एक मोठी अपडेट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहली विजय हजारेचा आणखी एक सामना खेळणार आहे. त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आता, हिटमॅन थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसणार आहे.
29 Dec 2025 10:08 AM (IST)
फ्री फायर मॅक्स हा आजच्या काळात खेळला जाणारा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. उत्तम ग्राफिक्स, स्मूद गेमप्ले आणि नवीन फीचर्स यासारख्या अनेक कारणांमुळे या गेममधील प्रत्येक लेव्हल प्लेयर्सना प्रचंड आवडते. प्रत्येक प्लेअर आपला गेमप्ले अधिक चांगला व्हावा यासाठी सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येक प्लेअरची इच्छा असते की त्याने देखील प्रो प्लेअर सारखे खेळावे, यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आणि हॅक्सचा वापर केला जातो. तुम्हाला देखील तुमचा गेमप्ले अधिक चांगला करायचा असेल आणि प्रो प्लेअर बनायचे असेल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा गेम्प्ले सुधारू शकता. या खास टिप्स तुम्हाला गेममध्ये प्रत्येक टप्प्यावर कामी येणार आहेत.
29 Dec 2025 09:40 AM (IST)
खोपोली येथील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणात नवे आणि धक्कादायक आरोप समोर आले आहेत. मंगेश काळोखे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील एक गुन्हेगार या हत्येमध्ये थेट सहभागी असून, तो बीडमध्ये वॉन्टेड असतानाही रवी देवकरने त्याला खास मंगेश काळोखे यांची हत्या करण्यासाठी खोपोलीत आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या हत्येच्या कटात सहभागी असलेला संबंधित बॉडीगार्डही बीड जिल्ह्यातीलच असून, मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये त्याचा सर्वात मोठा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, तपासाची दिशा आता बीड जिल्ह्याकडे वळण्याची शक्यता आहे.
29 Dec 2025 09:35 AM (IST)
Ramdas Aathavle News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून रिपब्लिकन पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा सोडाव्यात, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
वांद्रे येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली.
29 Dec 2025 09:25 AM (IST)
Tuljapur MD Drugs Racket: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणातील गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेला आणि संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल श्याम अग्रवाल याला अटक करण्यात तामलवाडी पोलिसांना मोठे यश आले आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरातून तपास पथकाने शिताफीने कारवाई करत अग्रवालला ताब्यात घेतले.
या प्रकरणात आतापर्यंत 39 आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधाराच्या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीचे विस्तृत जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आता या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांवर आणि इतर संपर्कांवर सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
अतुल अग्रवाल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, गेल्या 20 वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास आहे. मीरा-भाईंदर परिसरात एका लाँड्रीच्या दुकानाच्या आडून तो एमडी ड्रग्जचा काळा बाजार चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
29 Dec 2025 09:25 AM (IST)
BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून, या पार्श्वभूमीवर पक्षाकडून नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. यामध्ये अवघ्या 21 वर्षांच्या रचना गवस या तरुणीचे नाव विशेष लक्ष वेधून घेत आहे. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या रचना गवस या मुंबई महापालिका निवडणुकीत आपले भविष्य आजमावणार आहेत. रविवारी आमदार सना मलिक यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी अर्ज प्रदान केला. रचना गवस या वॉर्ड क्रमांक 143 मधून निवडणूक लढवणार आहेत.
29 Dec 2025 09:05 AM (IST)
India vs New Zealand ODI Series: नव्या वर्षात टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार असून भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. मात्र या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वनडे संघ जाहीर होण्याची शक्यता असून, त्याआधीच संघरचनेबाबत मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला वनडे संघातून वगळले जाऊ शकते, अशा चर्चांना आधीच वेग आला आहे. त्यातच आता आणखी दोन दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनाही या मालिकेतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
29 Dec 2025 09:00 AM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीसाठी पक्षीय तयारीला वेग आला आहे. आगामी काळात इतर पक्षांच्या उमेदवार याद्यांकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
29 Dec 2025 08:55 AM (IST)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटपाची प्रक्रिया रविवारी रात्रीपासून सुरू झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीवर अनेक उमेदवारांना बोलावून त्यांच्या हाताने एबी फॉर्म दिले. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, अशा उमेदवारांना रविवारी रात्री मातोश्री येथे बोलावण्यात आले होते. काही उमेदवारांना काल रात्रीच एबी फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी ११ वाजल्यानंतर एबी फॉर्म दिले जाणार आहेत.
29 Dec 2025 08:50 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 29 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,121 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,591 रुपये आहे. भारतात 28 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,29,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,210 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,05,910 रुपये आहे. भारतात 29 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 250.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,50,900 रुपये आहे.
29 Dec 2025 08:15 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर बोलबाला राहिला. टॅरिफमुळे अमेरिकेचा महसूल वाढल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र समोर येत आहे. अमेरिकेत 2025 मध्ये दिवाळखोरीत जाणाऱ्या कंपन्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, गेल्या 15 वर्षांतील हा उच्चांक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. अनेक उद्योगसंस्थांनी ट्रम्प टॅरिफला या संकटामागील प्रमुख कारण ठरवले आहे. आयात शुल्कात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्च वाढला असून, त्याचा थेट परिणाम नफ्यावर होत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
Maharashtra to World Breaking News Live: पुणे महापालिकेच्या निवडणुका केवळ दुरंगी न होता त्या काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी होतील, असे आता दिसू लागले आहे. पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाल्यावर काही प्रभागात बंडखोरी देखील होईल. मोठ्या शहरांमध्ये विविध विचारांचे समुदाय असतात. त्यामुळे शहरांचे राजकारण विविध रंगी असते. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष ठळकपणे लढतीत असतातच. याखेरीज प्रादेशिक पातळीवर बस्तान बसविलेले पक्ष सुद्धा निवडणुकीत उतरतात. अशा पक्षांशी युती अथवा आघाडी करायची वेळ राष्ट्रीय पक्षांवर येते.






