Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- इराणनेही चर्चेत आपल्या अटी ठेवल्या आहेत. इराणी माध्यमांनुसार, इराणने अमेरिका आणि इस्रायलला सर्वप्रथम इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 27, 2026 | 06:02 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच डोनाल्ड ट्रम्पचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिकेसह इस्त्रायलकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणचे अनेक नेते मारले गेले आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. असे असताना अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयाने इराणला मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि वातावरण अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले की, हा निर्णय इराणच्या विनंतीवरून घेण्यात आला आहे आणि वाटाघाटी चांगल्या प्रकारे पुढे जात आहेत.

The liveblog has ended.
  • 27 Mar 2026 05:57 PM (IST)

    27 Mar 2026 05:57 PM (IST)

    झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी आता महायुतीतूनच

    शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनीही आता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून आधीपासून व्हिडीओप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

  • 27 Mar 2026 05:49 PM (IST)

    27 Mar 2026 05:49 PM (IST)

    खरातला शक्तिवर्धक औषधांचं अतिसेवन भोवलं

    दीड वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती... शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती. डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले होते.

  • 27 Mar 2026 05:39 PM (IST)

    27 Mar 2026 05:39 PM (IST)

    ठाण्यातील खोपट परिसरातील पेट्रोल पंप वरती वाहनांच्या लांबच लांब रांगा

    पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याच्या अफवामुळे पेट्रोल पंपा वरती वाहनांची पेट्रोल डिझेल भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. भर उन्हामध्ये गेल्या अर्धा ते पाऊण तास वाहनधारक इंधनासाठी ताटकाळत रांगेत उभे. पेट्रोल पंपाच्या बाहेर पर्यंत वाहनधारकाच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी.

  • 27 Mar 2026 05:30 PM (IST)

    27 Mar 2026 05:30 PM (IST)

    ऋषी वैद्य यांच्यावर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाईची हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुण्यातील मांजरी पोलीस स्टेशनला पत्र देऊन ऋषी वैद्यवर जादूटोणा कायद्याचे कलम लावण्याची मागणी केली आहे. ऋषी वैद्यने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगून एका महिलेवर अत्याचार केले आहेत. लोकांची फसवणूक करणे आणि अवतारी बाबा असल्याचे सांगून महिलांचे शोषण करणे हे जादूटोणा कायद्याखाली गुन्हा आहे.

  • 27 Mar 2026 05:18 PM (IST)

    27 Mar 2026 05:18 PM (IST)

    उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

    जुन्नर-आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक यांना ५० हजार रुपयांची लाच प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आलीय प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिकाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन लाच कुठल्या कारणासाठी स्विकारली याबाबत अद्याप स्पष्ट नसुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे

  • 27 Mar 2026 05:10 PM (IST)

    27 Mar 2026 05:10 PM (IST)

    संभाजीनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

    संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून ठाकरेसेनेच्या ६ नगरसेवकांना बाहेर काढण्यात आलं. पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जात होता. यावेळी या योजनेसाठी उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मागणी करत महापौरांसमोर ६ नगरसेवकांनी गोंधळ घातला. यावरुन ठाकरे सेनेच्या ६ नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. तर केवळ ठाकरेंचे नाव घेतल्यानेच ही कारवाई केल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय.

  • 27 Mar 2026 05:01 PM (IST)

    27 Mar 2026 05:01 PM (IST)

    लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविल्या किंवा पोस्ट फॉरवर्ड केल्या तर फौजदारी कारवाई होईल : मुख्यमंत्री

    लॉकडाऊन होणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे, त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारची खोटी माहिती सोशल मीडियात टाकणे किंवा अशा पोस्ट फॉरवर्ड केल्या तरी त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. अफवांच्या आधारावर लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. अधिकच पेट्रोल-डिझेल साठवून ठेवलं तर कृत्रिम टंचाई निर्माण होते, त्यामुळे ग्राहकांनी आवश्यक तेवढंच पेट्रोल डिझेल भरावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

  • 27 Mar 2026 04:50 PM (IST)

    27 Mar 2026 04:50 PM (IST)

    वसईतील बाबावर कथित लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

    भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर वसई परिसरात स्वयंघोषित धर्मगुरूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुक ओळखीतून महिलेची फसवणूक करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे. या आणि अशा घटनांसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदीप घोलप यांच्याकडून याबाबत जाणून घेतले आहे

  • 27 Mar 2026 04:45 PM (IST)

    27 Mar 2026 04:45 PM (IST)

    आता हवाई मार्गाने आंबा निर्यात

    सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा नसून भावनिक होऊन लोकांच्या रांगा लागत असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईत वाढ झाल्याचा दावा करत त्यांनी शेतकरी राजू शेट्टी यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जिल्ह्यात कुठेही इंधनाची टंचाई होऊ देणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 27 Mar 2026 04:40 PM (IST)

    27 Mar 2026 04:40 PM (IST)

    आंबा-काजू शेतकऱ्यांना २२ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई

    सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा नसून भावनिक होऊन लोकांच्या रांगा लागत असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईत वाढ झाल्याचा दावा करत त्यांनी शेतकरी राजू शेट्टी यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जिल्ह्यात कुठेही इंधनाची टंचाई होऊ देणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 27 Mar 2026 04:35 PM (IST)

    27 Mar 2026 04:35 PM (IST)

    गॅस टंचाईमुळे इंडक्शन आणि इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर

    गॅस टंचाईमुळे लोकांनी इंडक्शन आणि इलेक्ट्रिक ओव्हन सारख्या उपकरणांचा वापर सुरू केला आहे.पण, या उपकरणांच्या वापरामुळे वीजेचा भार वाढला असून रोहित्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार समोर येत आहे.त्यामुळे आता इंडक्शन वापरासाठी नागरिकांना महावितरणकडून वाढीव भार मंजूर करून घ्यावा लागणार आहे.ऐन उन्हाळ्यात शहरातील वीज मागणीत कमालीची वाढ झाली आहे. वसई विरार शहरात घरगुती वसाहतीतील सिंगल फेज कनेक्शनसाठी १० व्हॅट भाराची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, गॅस टंचाईच्या भीतीने नागरिकांनी सुरू केलेल्या इंडक्शनच्या वापरामुळे विजेच्या भारात वाढ झाली आहे.

  • 27 Mar 2026 04:30 PM (IST)

    27 Mar 2026 04:30 PM (IST)

    धारूर घाट मृत्यूचा सापळा, प्रवासी वाहनचालक उभारणार जनआंदोलन

    बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे धारूर घाटातील काम रखडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. अरुंद रस्ता,तीव्र उतार, वळण यामुळे गेल्या दोन वर्षात तब्बल 65 अपघात घडले असून 21 जणांचा बळी गेला आहे. तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.आणखी किती बळी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला घ्यायचे आहेत असा संतप्त सवाल प्रवासी आणि वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे. मालवाहतूक अवजड वाहने ऊस वाहतूक करणारे वाहने आणि प्रवासी वाहने यामुळे घाटात अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

  • 27 Mar 2026 04:25 PM (IST)

    27 Mar 2026 04:25 PM (IST)

    कोकणातील बागायतदारांवर सरकारचा अन्याय -आ. भास्कर जाधव

    सरकारने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप आ. भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

  • 27 Mar 2026 04:20 PM (IST)

    27 Mar 2026 04:20 PM (IST)

    ऊर्जा संकटामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

    आखाती तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहचले आहेत. मिरची मसाल्याच्या पदार्थाचे दर वाढल्यामुळे महिला उद्योजिका अडचणीत आल्या आहेत.

  • 27 Mar 2026 04:15 PM (IST)

    27 Mar 2026 04:15 PM (IST)

    आखाती देशातील युद्धाचा परिणाम मसाल्यांच्या दरांवर

    आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवू लागला आहे आणि त्याचा थेट फटका बसतोय तो सर्वसामान्य नागरिकांना. इंधनाच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे वाहतूक खर्च वाढला आहे आणि त्याचा परिणाम आता अन्नधान्य आणि विशेषतः मसाल्यांच्या दरांवर स्पष्टपणे दिसत आहे. सध्या मिरची आणि मसाल्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे. इंधनाची कमतरता असल्यामुळे शेतीपासून बाजारपेठेपर्यंतचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बसतोय तो महिला उद्योजकांना. कारण घरगुती आणि लघुउद्योगांमध्ये मसाले तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात महिलांकडून केलं जातं. कच्चा माल महाग झालाय,उत्पादन खर्च वाढलाय, आणि विक्री कमी झाली आहे त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.

  • 27 Mar 2026 04:10 PM (IST)

    27 Mar 2026 04:10 PM (IST)

    भारतात EV चा वेग वाढणार?

    JSW Motors ने फ्रेंच टेक्नोलॉजी कंपनी Dassault Systems भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. देशातील इलेक्ट्रिक आणि प्रगत तंत्रज्ञान वाहनांसाठी, एक मजबूत डिजिटल सिस्टीम तयार करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. आजच्या काळात वाहन केवळ ट्रान्सपोटेशनचं साधन न राहता काळाची गरज झाली आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेत JSW Motors ऑटोमोबाईल क्षेत्रात सॉफ्टवेअर आणि डिजिटल सिस्टीम कसं विकसित करता येईल याकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे Dassault Systems कंपनीशी इलेक्ट्रिक वाहनांसीठीची भागीदारी येणाऱ्या काही काळात देशातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • 27 Mar 2026 04:05 PM (IST)

    27 Mar 2026 04:05 PM (IST)

    कर्जतमधील ठेकेदारांची बिले अदा होण्यासाठी मंत्र्यांचे आश्वासन

    कर्जत तालुक्यातील ठेकेदार संघटनेने आपल्या थकीत असलेली देयके यांच्यासाठी उपोषण सुरू केले होते.उपोषणाच्या दुसरी दिवशी रात्री कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी ठेकेदारांची थकीत बिले देण्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी आश्वासन दिले आहे,तर मार्च अखेर होई पर्यंत अन्य खात्याची बिले अदा करण्याची कार्यवाही शासन करणार आहे असे आश्वासन राज्याचे प्रमुखांनी दिले आहे. आमदारांचे आश्वासनानंतर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान,एप्रिल महिन्यात पुन्हा उपोषण करायला लावू नका असा इशारा उपोषणकर्ते राहुल डाळींबकर यांनी दिला आहे.

  • 27 Mar 2026 03:50 PM (IST)

    27 Mar 2026 03:50 PM (IST)

    उज्ज्वला योजनेचा बोजवारा! गृहिणींवर पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ

    देशात इंधन टंचाई नसल्याचा सरकार कितीही दावा करत असले तरी राज्याच्या विविध भागात स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) साठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उज्ज्वला योजनेचा पुरता बोजवारा उडला असून गृहिणींवर रॉकेलवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठीही पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनचालकांना मर्यादित स्वरूपात पेट्रोल आणि डिझेल देण्यात येत आहे. काही पंपावर तर इंधन संपल्याचे बोर्ड झळकल्याचे दिसत आहेत.

  • 27 Mar 2026 03:45 PM (IST)

    27 Mar 2026 03:45 PM (IST)

    रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर; भीषण अपघाताने कराड हादरलं

    रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि त्यातच भराधाव वाहनांमुळे अपघाताच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या घडीला दयनीय झालेले रस्ते मृत्यूचा सापळा ठरत आहेत. याची प्रचिती भीषण अपघाताने झाली. कराडकरांसाठी बुधवार हा अक्षरशः घातवार ठरला. अवघ्या काही तासांच्या अंतरात शहर व परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये प्राध्यापिका, भाजी विक्रेती महिला आणि अ‍ॅपरिक्षा चालक अशा तिघांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनांचा बेदरकार वेग, निष्काळजीपणा आणि रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे हे अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • 27 Mar 2026 03:40 PM (IST)

    27 Mar 2026 03:40 PM (IST)

    सरकारी नोकरीची मोठी संधी! MPSC मार्फत 571 रिक्त पदांची भरती, पगार २ लाखापर्यंत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

    सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी संधी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तब्बल ५७१ रिक्त पदांची घोषणा केल्याचे समोर आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील आरोग्य, गृह आणि प्रशासन विभागातील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पगार, पात्रता, पद आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय जाणून घ्या.

  • 27 Mar 2026 03:30 PM (IST)

    27 Mar 2026 03:30 PM (IST)

    CTET उत्तीर्ण झाला नाहीत? तरीही तुम्ही शिक्षक बनू शकता, ‘हे’ आहेत पर्याय जाणून घ्या सविस्तर

    लाखो तरुण शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतात पण फक्त स्वप्न पाहून उपोय नाही त्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं. पण अशीच मेहनत करुनही CTET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर असे अनेक विद्यार्थी निराश होतात. त्यांना वाटते की त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. पण खरंच असं आहेत का? CTET हा केवळ एकच मार्ग आहे का? जर तुम्ही योग्य दिशेने विचार आणि नियोजन केले, तर तुम्ही CTET शिवायसुद्धा तुम्ही शिक्षक म्हणून यशस्वी करिअर घडवू शकता पण कसं समजून घेऊयात.

  • 27 Mar 2026 03:25 PM (IST)

    27 Mar 2026 03:25 PM (IST)

    ‘Thank you people of India’ एक संदेश आणि गेम ओव्हर; इराणनच्या इस्रायलवर हल्ल्याचा ‘हा’ VIDEO तुफान VIRAL

    मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आज एक अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ ची सकाळ इस्रायलसाठी काळ बनून आली. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने (IRGC) इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. मात्र, या लष्करी कारवाईपेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती इराणने वापरलेल्या एका अनोख्या ‘मेसेजिंग’ची. इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर जगातील काही देशांचे आभार मानले आहेत, ज्यात भारताचे नाव प्रामुख्याने दिसून येत आहे.

  • 27 Mar 2026 03:20 PM (IST)

    27 Mar 2026 03:20 PM (IST)

    केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

    Ola Electric ने ‘एंडआईसएज’ (EndICEAge) नावाची एक मोहिम सुरु केली आहे. या मोहिमअंतर्गत कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसाईकलच्या किंमती कमी करत आहे. कंपनीने जाहीर केलेली ही ऑफर 31 मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या ऑफरअंतर्गत, आता सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 49,999 रुपये झाली आहे. अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे संकट अधिक भीषण झाले आहे. याच कारणामुळे आता ओला इलेक्ट्रिक त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. ओला आता त्यांच्या गाड्यांवर 8 वर्षांची अपघात वॉरंटी देखील देत आहे.

  • 27 Mar 2026 03:15 PM (IST)

    27 Mar 2026 03:15 PM (IST)

    अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई

    सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने शहरातील अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील झेड.पी. कॉलनी परिसरात मोठी धडक कारवाई केली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या साहाय्याने रस्ता व सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत 7 कंपाउंड भिंती, 2 तारेचे कुंपण, 4 दुकानांवरील लोखंडी व सिमेंटच्या छपऱ्या, तसेच एक बांधीव खोली आणि इमारतीची वाढीव भिंत हटवण्यात आली.

  • 27 Mar 2026 03:10 PM (IST)

    27 Mar 2026 03:10 PM (IST)

    पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील नियोजनात मोठा बदल

    हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

  • 27 Mar 2026 03:07 PM (IST)

    27 Mar 2026 03:07 PM (IST)

    तुटलेल्या नात्यांना जोडेल का प्रेमाची ताकद? ‘दीपज्योती’ लवकरच झी मराठीवर!

    झी मराठी नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘दीपज्योती’. ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली.

  • 27 Mar 2026 02:45 PM (IST)

    27 Mar 2026 02:45 PM (IST)

    मरियम नवाझ शरीफ लॉर्ड्सची राणी आहे का?

    पाकिस्तान सुपर लीग सुरू झाले आहे पण या लीगच्या सामन्यांची कमी आणि त्याच्या संबंधित होणाऱ्या वादाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. पाकिस्तान सुपर लीग सुरू होऊन केवळ एक दिवस झाला आहे, पण त्यामुळे आधीच अनेक वाद निर्माण झाले आहेत. प्रथम, ही लीग बंद दाराआड आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या प्रमुख खेळाडूंना धमक्या देण्यात आल्या. सामना सुरू होताच चेंडूचा रंग पांढऱ्यावरून गुलाबी झाला आणि आता एका पाकिस्तानी खेळाडूची वादग्रस्त पोस्ट समोर आली आहे.

  • 27 Mar 2026 02:40 PM (IST)

    27 Mar 2026 02:40 PM (IST)

    उमेश कामत आणि प्रिया बापटची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस

    मराठी मनोरंजनविश्वात कायम चर्चेत राहणारे जोडपे उमेश कामत आणि प्रिया बापट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हे काय नवीन?’ या आगामी वेब सीरिजमधून हे दोघेही एक वेगळ्या टप्प्यावर पोहोचलेल्या नात्याची गोष्ट उलगडताना दिसणार आहे. हलक्याफुलक्या रोमँसपासून वास्तवाच्या छटांपर्यंतचा प्रवास दाखवणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण करत आहे.

  • 27 Mar 2026 02:35 PM (IST)

    27 Mar 2026 02:35 PM (IST)

    रस्त्यांची दुरवस्था आणि भरधाव वाहनांचा कहर

    रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि त्यातच भराधाव वाहनांमुळे अपघाताच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या घडीला दयनीय झालेले रस्ते मृत्यूचा सापळा ठरत आहेत. याची प्रचिती भीषण अपघाताने झाली. कराडकरांसाठी बुधवार हा अक्षरशः घातवार ठरला. अवघ्या काही तासांच्या अंतरात शहर व परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये प्राध्यापिका, भाजी विक्रेती महिला आणि अ‍ॅपरिक्षा चालक अशा तिघांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनांचा बेदरकार वेग, निष्काळजीपणा आणि रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे हे अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • 27 Mar 2026 02:30 PM (IST)

    27 Mar 2026 02:30 PM (IST)

    पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील नियोजनात मोठा बदल

    हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

  • 27 Mar 2026 02:25 PM (IST)

    27 Mar 2026 02:25 PM (IST)

    केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर!

    Ola Electric ने ‘एंडआईसएज’ (EndICEAge) नावाची एक मोहिम सुरु केली आहे. या मोहिमअंतर्गत कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसाईकलच्या किंमती कमी करत आहे. कंपनीने जाहीर केलेली ही ऑफर 31 मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या ऑफरअंतर्गत, आता सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 49,999 रुपये झाली आहे.

  • 27 Mar 2026 02:20 PM (IST)

    27 Mar 2026 02:20 PM (IST)

    अनधिकृत बांधकामावर हातोडा; झेडपी कॉलनीत अतिक्रमणावर कारवाई

    सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने शहरातील अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील झेड.पी. कॉलनी परिसरात मोठी धडक कारवाई केली. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या साहाय्याने रस्ता व सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत 7 कंपाउंड भिंती, 2 तारेचे कुंपण, 4 दुकानांवरील लोखंडी व सिमेंटच्या छपऱ्या, तसेच एक बांधीव खोली आणि इमारतीची वाढीव भिंत हटवण्यात आली.

  • 27 Mar 2026 02:15 PM (IST)

    27 Mar 2026 02:15 PM (IST)

    ‘Thank you people of India’ एक संदेश आणि गेम ओव्हर

    मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आज एक अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ ची सकाळ इस्रायलसाठी काळ बनून आली. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने (IRGC) इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. मात्र, या लष्करी कारवाईपेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती इराणने वापरलेल्या एका अनोख्या ‘मेसेजिंग’ची. इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर जगातील काही देशांचे आभार मानले आहेत, ज्यात भारताचे नाव प्रामुख्याने दिसून येत आहे.

  • 27 Mar 2026 02:10 PM (IST)

    27 Mar 2026 02:10 PM (IST)

    CTET उत्तीर्ण झाला नाहीत? तरीही तुम्ही शिक्षक बनू शकता

    लाखो तरुण शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतात पण फक्त स्वप्न पाहून उपोय नाही त्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं. पण अशीच मेहनत करुनही CTET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर असे अनेक विद्यार्थी निराश होतात. त्यांना वाटते की त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. पण खरंच असं आहेत का? CTET हा केवळ एकच मार्ग आहे का? जर तुम्ही योग्य दिशेने विचार आणि नियोजन केले, तर तुम्ही CTET शिवायसुद्धा तुम्ही शिक्षक म्हणून यशस्वी करिअर घडवू शकता पण कसं समजून घेऊयात.

  • 27 Mar 2026 02:02 PM (IST)

    27 Mar 2026 02:02 PM (IST)

    कोविडसारखा कोणताही लॉकडाऊन आता नक्कीच होणार नाही. - निर्मला सीतारमन

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशामध्ये असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, "काही नेते असा दावा करत आहेत की लॉकडाऊन लागू होईल आणि इंधनाचा तुटवडा निर्माण होईल; हे पाहून मला आश्चर्य वाटते. हे दावे पूर्णपणे निराधार आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून अशा प्रकारची विधाने केली जाणे चिंताजनक आहे. कोविड काळात आपण अनुभवला होता, तशा प्रकारचा कोणताही लॉकडाऊन आता लागू होणार नाही. मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, कोविड काळात आपण पाहिला होता, तसा कोणताही लॉकडाऊन आता नक्कीच होणार नाही." अशी स्पष्ट भूमिका निर्मला सीतारमन यांनी घेतली.

  • 27 Mar 2026 01:57 PM (IST)

    27 Mar 2026 01:57 PM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा वाढता पूर

    भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT कडून सुरू केलेल्या हेल्पलाईनवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. अनेक पीडितांनी पुढे येत धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. या तक्रारींमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपास यंत्रणा वेगाने कारवाई करत आहे. लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 27 Mar 2026 01:52 PM (IST)

    27 Mar 2026 01:52 PM (IST)

    PM मोदींनी घेतले रामलल्लांचे ऑनलाईन दर्शन

    श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे रामनवमी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने भगवान रामांना सूर्यतिलक देखील करण्यात आला. या मोहक रुपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतले आहे.

    #WATCH | On Ram Navami, PM Narendra Modi prays to Bhagwan Ram Lalla and observes the Surya Tilak ceremony at Ayodhya Ram Mandir. pic.twitter.com/paHj9LdFRY

    — ANI (@ANI) March 27, 2026

  • 27 Mar 2026 01:48 PM (IST)

    27 Mar 2026 01:48 PM (IST)

    सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे नाशिकमध्ये

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. अशोक खरात प्रकरणात त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

  • 27 Mar 2026 01:42 PM (IST)

    27 Mar 2026 01:42 PM (IST)

    शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल देण्यासाठी रोहित पवारांची पोस्ट

    आमदार रोहित पवार यांनी पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीवर सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी शेतकऱ्यांसाठी खास आवाहन केले. रोहित पवारांनी लिहिले की, पेट्रोल पंपावर कॅन/ड्रममध्ये डिझेल मिळणार नसल्याचे आदेश अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून काढण्यात आले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दक्षता घेणं गरजेचं असलं तरी यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसताना दिसतोय. स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्रे शेतातच असल्यामुळे शेतकरी सहसा कॅन/ड्रममध्येच डिझेल घेऊन जातात. कामं थांबवून 10-15 किमीवर असलेल्या पंपावर ही यंत्रं न्यायला शेतकऱ्याला वेळेच्या आणि पैशांच्या दृष्टीनेही परवडत नाही. त्यामुळं सरकारने शेतकऱ्यांसाठीही काहीतरी मध्यम मार्ग काढावा, ही विनंती, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

    पेट्रोल पंपावर कॅन/ड्रममध्ये डिझेल मिळणार नसल्याचे आदेश अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून काढण्यात आले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दक्षता घेणं गरजेचं असलं तरी यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसताना दिसतोय.

    स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्रे… pic.twitter.com/QKocj4txMb

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 27, 2026

  • 27 Mar 2026 01:37 PM (IST)

    27 Mar 2026 01:37 PM (IST)

    रुपाली चाकणकरांना अटक करा...

    अशोक खरातप्रकरणी एसआयटी पथकाची भेट घेणार असल्याची माहिती रुपाली ठोंबरे यांनी दिली. प्रश्नांची उत्तरे त्यांना भेटल्यानंतर मिळतील. रुपाली चाकणकर यांची आतापर्यंत चौकशी का केली नाही, असा सवाल एसआयटीला केला जाणार आहे. त्यांना अटक करण्याची मागणीही केली जाणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

  • 27 Mar 2026 01:34 PM (IST)

    27 Mar 2026 01:34 PM (IST)

    अयोध्येमध्ये रामलल्लाचा सुर्यतिलक; तेजस्वी रुपाने भक्तगण भारावले

    रामनवमीचा सण पार पडला असून श्री राम जन्म भूमी असलेल्या अयोध्येमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रामनवमीनंतर आता अयोध्येतील रामांच्या मूर्तीवर सुर्यतिलक करण्यात आले. सुर्यांच्या किरणांमी प्रभू रामांचे तेजस्वी रुप मनमोहित करत होते.

    Surya Tilak Lights Up Ram Lalla's Forehead at Ayodhya's Ram Mandir!#RamNavami #RamMandir pic.twitter.com/QZZAQXFoea

    — RB. (@rahul4bisht) March 27, 2026

  • 27 Mar 2026 01:32 PM (IST)

    27 Mar 2026 01:32 PM (IST)

    झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी आता महायुतीतूनच

    शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनीही आता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून आधीपासून व्हिडीओप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

  • 27 Mar 2026 01:32 PM (IST)

    27 Mar 2026 01:32 PM (IST)

    PM मोदींनी आम्हाला पुन्हा 50 वर्षे मागे नेले - खासदार राऊत

    खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच सध्या देशावर झालेल्या आखाती युद्धांच्या परिणामांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. परिस्थिती प्रधानमंत्री यांच्या हातातून बाहेर जाताना दिसत आहे. लोकांना आता रॉकेलच्या रांगेत उभे राहावे लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला पुन्हा 50 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत नेले आहे. त्या काळात धान्य आणि रॉकेलच्या रांगा लागत असत, आणि आज पुन्हा जनतेला त्याच रांगेत उभे राहावे लागत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणार,” असे मत खासदार संजय राऊतांनी व्यक्त केले.

  • 27 Mar 2026 01:00 PM (IST)

    27 Mar 2026 01:00 PM (IST)

    RCB vs SRH Live Streaming: IPL 2026 ची सलामी मॅच किती वाजता सुरू होणार, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

    इंडियन प्रीमियर लीग 2026 चा नवा सिझन सुरू व्हायला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. क्रिकेट चाहते या नव्या सिझनसाठी प्रचंड उत्सुक आहेत, या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये रजत पाटीदार आणि इशान किशन आमनेसामने येणार आहेत. पॅट कमिन्सच्या अनुपस्थित इशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मागील सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादची खराब कामगिरी राहिली होती तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या संघाने पहिल्यांदा जेतेपद नावावर केले होते.

  • 27 Mar 2026 12:50 PM (IST)

    27 Mar 2026 12:50 PM (IST)

    महिलांसोबत जे केलं तो विधीचाच भाग, जबरदस्ती नाही: पोलीस कोठडीत भोंदूबाबा खरातने उधळली मुक्ताफळं

    अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणारा भोंदूबाबा अशोक खरातचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. त्याने महिलांना धमकी देऊन त्यांच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच मधविक्री, जादूटोणामधून त्याने अनेक गैरप्रकार (Crime News) केले आहेत. याची तपासणी SIT मार्फत केली जात आहे. या तपासामधून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मी महिलांवर अत्याचार केले नाही तर सहमतीने सर्व केले असल्याचे वक्तव्य अशोक खरातने (Ashok Kharat) केले आहे.

  • 27 Mar 2026 12:40 PM (IST)

    27 Mar 2026 12:40 PM (IST)

    “मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका…”, वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला

    वावी येथे असलेल्या सुमारे इसवी सन १२१७ सालात बांधलेल्या यादवकालीन पुरातन वैजेश्वर मंदिराबाबत भोंदू बाबा कॅप्टन अशोककुमार खरात यांनी दिलेला अजब सल्ला आता पुन्हा चर्चेत आला आहे. मंदिरातील शिवलिंग क्षीण झाले असून त्यात कोणतीही ‘ऊर्जा’ उरलेली नाही, गावासाठी हे मंदिर अरिष्ट आहे. त्यामुळे हे मंदिर रातोरात पाडून टाकून नव्याने मंदिर उभारावे, असा सल्ला त्यांनी ग्रामस्थांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • 27 Mar 2026 12:40 PM (IST)

    27 Mar 2026 12:40 PM (IST)

    इस्रायलवर 100 रॉकेटचा काळजाचा थरकाप उडवणारा पाऊस; हिजबुल्लाच्या हल्ल्यात नाहारिया हादरलं

    मध्य-पूर्वेतील युद्धाची (US-Israel Iran War) धग आता दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आधीच जगाची झोप उडवली असताना, आता लेबनॉन सीमेवर हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्य यांच्यात ‘आर-पार’ची लढाई सुरू झाली आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी हिजबुल्लाने उत्तर इस्रायलच्या दिशेने तब्बल १०० रॉकेट डागून संपूर्ण प्रदेशात घबराट निर्माण केली आहे. या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजत असून नागरिक जीव मुठीत धरून बंकरमध्ये आश्रय घेत आहेत.

  • 27 Mar 2026 12:30 PM (IST)

    27 Mar 2026 12:30 PM (IST)

    शिंदे-महाडिक यांना मिळाला भाजपचा पहिला सभापती व उपसभापती होण्याचा मान

    नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुडाळ गणातून जावली पंचायत समितीला निवडून आलेले प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सभापतिपदाचा तर खर्शी बारामुरे गणातून विजयी झालेले गोरख महाडिक यांनी उपसभापतिपदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. यावेळी नूतन सभापती व उपसभापतींना भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

  • 27 Mar 2026 12:25 PM (IST)

    27 Mar 2026 12:25 PM (IST)

    नेपाळमध्ये रॅपर राज! PM बालेन शहांचा माईक ड्रॉप; शपथविधीपूर्वी ‘जय महाकाली’ गाण्याला 2 तासांत लाखो Views

    नेपाळच्या (Nepal Politics) राजकारणात आज एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. हिमालयीन राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक रॅपर देशाची धुरा सांभाळणार आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (RSP) धडाडीचे नेते बालेन शाह आज २७ मार्च २०२६ रोजी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. पण त्यांच्या या ऐतिहासिक शपथविधीपेक्षा सध्या चर्चा आहे ती त्यांच्या एका जुन्या गाण्याची. ‘जय महाकाली’ या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली असून, नेपाळच्या तरुणाईमध्ये बालेन शाह यांची क्रेझ शिगेला पोहोचली आहे.

  • 27 Mar 2026 12:20 PM (IST)

    27 Mar 2026 12:20 PM (IST)

    Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

    चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी विवोने भारतात त्यांच्या Y सीरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीने हे स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमधील चिपसेट समान आहे.

Web Title: Maharashtra breaking news 26th march live updates maharashtra politics national international politics crime viral video ipl 2026 breaking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत
1

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

सानपाडा रेल्वेस्टेशन फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम; बीएमसीच्या कारवाईनंतरही पुन्हा उभे राहतात अनधिकृत हॉटेल्स आणि दुकाने
2

सानपाडा रेल्वेस्टेशन फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम; बीएमसीच्या कारवाईनंतरही पुन्हा उभे राहतात अनधिकृत हॉटेल्स आणि दुकाने

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला
3

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा
4

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.