Maharashtra Breaking News Updates Today:
28 Mar 2026 09:05 AM (IST)
पिंपरी-चिंचवड: औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे एका २२ वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, असुरक्षित गर्भपाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
28 Mar 2026 09:00 AM (IST)
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि अत्यंत थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पोलीस पित्याचा काटा काढण्यासाठी, स्वतःच्या पोलीस मुलीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांना विष देऊन ठार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही हत्या तीन वर्षांपूर्वी झाली होती, मात्र रामनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आता आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
१३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि पित्याचा विरोध मृत जयंत बाल्लावार (वय ४५) हे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची मुलगी आर्या बाल्लावार (वय २२) हिचे पोलीस कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके (वय ३०) याच्याशी गेल्या १३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना जयंत बाल्लावार यांचा तीव्र विरोध होता. याच विरोधातून संतापलेल्या आर्या आणि आशिष यांनी वडिलांना संपवण्याचा कट रचला.
28 Mar 2026 08:55 AM (IST)
मुंबई: राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांचे कनेक्शन समोर येत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशोक खरातच्या अटकेपूर्वी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन आयएएस अधिकाऱ्यांसोबत त्याची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने पहिल्यांदाच एका उपजिल्हाधिकाऱ्याची (अभिजीत भांडे पाटील) तडकाफडकी बदली केली आहे.
28 Mar 2026 08:50 AM (IST)
बीड (परळी): परळी बसस्थानक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याला, म्हणजेच अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन एक निर्दयी माता तिथून पसार झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
"बाथरूमला जाऊन येते" सांगून काढता पाय मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बसस्थानकात दोन प्रवासी महिलांजवळ आली. "मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत माझ्या मुलीला जरा सांभाळा," असे विश्वासाने सांगून तिने त्या चिमुकलीला त्यांच्या स्वाधीन केले. मात्र, बराच वेळ उलटूनही ती महिला परत आली नाही. त्या प्रवासी महिलांनी बसस्थानक परिसर आणि आजूबाजूला तिचा शोध घेतला, मात्र त्या मातेचा कुठेही पत्ता लागला नाही.
28 Mar 2026 08:45 AM (IST)
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा आता अधिकृतपणे वाचला जाऊ लागला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी खरातविरोधात दोन गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एका महिलेवर केलेला लैंगिक अत्याचार (Sexual Assault) आणि आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. या धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संसारातील विघ्न दूर करण्याच्या बहाण्याने अत्याचार मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचे पती २०१३ मध्ये विवाहबद्ध झाले होते, परंतु त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने ते एकत्र राहत नव्हते. आपला संसार पुन्हा सुरळीत व्हावा, या आशेने हे दाम्पत्य एका व्यक्तीच्या सल्ल्यानुसार २०२२ मध्ये पहिल्यांदा अशोक खरातकडे गेले होते. त्यानंतर २०२४ मध्ये ते पुन्हा त्याच्या संपर्कात आले. याच भेटीदरम्यान खरातने आपल्या क्रूर हेतूने पीडितेच्या पतीला केबिनबाहेर जाण्यास सांगितले.
28 Mar 2026 08:40 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 27 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,472 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,266 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,854 रुपये आहे. भारतात 27 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,660 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,720 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,540 रुपये आहे. भारतात 27 मार्च रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 239.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,39,900 रुपये आहे.
28 Mar 2026 08:40 AM (IST)
प्रवासाचा आनंद तेव्हा वाढतो जेव्हा त्यात कंफर्ट ॲड होतो. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान प्रवास सर्वात वेगवान पर्याय मानला जातो. पण यात सीट्सवर अधिक काळ बसून आपला कंफर्ट कुठेतरी हरवतो. विमानाच्या सीट्सवर फार काळ बसल्याने आपल्या हाता-पायांंमध्ये वेदना होऊ लागतात तसाच आपला प्रवास अनुभव अधिक थकवणारा बनतो. यामुळे मळमळ, चक्कर येणे, थकवा अशा बऱ्याच समस्या जाणवू लागतात. पण आता या सर्व समस्याांना दूर करता येणार आहे कारण युनायटेड एअरलाइन्स अलिकडे एक नवा उपक्रम घेऊन आली आहे ज्यानुसार लांब पल्ल्याच्या विमानांमधील इकॉनॉमी सीट्सचे आता सोफ्यांमध्ये रुपांतर केले जाईल. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. वाचा सविस्तर-
28 Mar 2026 08:36 AM (IST)
US-Israel Iran War News: मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या जुन्या आणि विश्वासू मित्रांसोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यास सुरुवात केली आहे. एका मोठ्या राजनैतिक विजयामध्ये, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच रशिया भारताला थेट ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ (LNG) विक्री पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.
‘रॉयटर्स’ने दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, भारत या करारावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहे. जरी या व्यवहारामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होण्याचा धोका असला, तरी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भारत ही चर्चा काही आठवड्यांतच पूर्ण करू शकतो. रशियाकडून थेट गॅस पुरवठा सुरू होणे हा भारतासाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Rupali Chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. खरात यांना ‘गुरू’ मानणाऱ्या चाकणकर यांच्यावर या प्रकरणामुळे पक्षांतर्गत आणि राजकीय स्तरातून मोठा दबाव निर्माण झाला होता.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, आता त्यांनी पक्षीय संघटनेतील महत्त्वाच्या पदाचाही त्याग केला आहे. खरात यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे झालेल्या आरोपांनंतर, पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात हे पद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






