Maharashtra Breaking News Updates Today:
पुणे/नाशिक: नाशिकचा वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरापर्यंत पोहोचले आहेत. खरातचा सीए प्रकाश पोफळे याने २०२४ मध्ये कोरेगाव पार्कमध्ये ८ रो-हाऊसेस आणि ४९ गुंठे जागा खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कागदोपत्री या व्यवहाराची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. कोरेगाव पार्क हा पुण्यातील अत्यंत महागडा भाग असल्याने, या मालमत्तेची खरी किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. सीएकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली? खरात आपल्या सीएच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होता का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
31 Mar 2026 04:50 PM (IST)
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.
31 Mar 2026 04:45 PM (IST)
आयुक्त एम. एम. सूर्यवंशी आज सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या जागी पृथ्वीराज बी.पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, आयुक्त एम. एम. सूर्यवंशी यांनी ३१ मार्च २०२६ रोजी वयोमानानुसार आपल्या पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली.त्यांच्या जागी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले पृथ्वीराज बी.पी. आता वसई-विरार महापालिकेची धुरा सांभाळणार आहेत.शासनाच्या निर्देशानुसार, सूर्यवंशी यांनी आपला पदभार तात्काळ पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे सुपूर्द केला आहे.सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.दरम्यान, वाढत्या शहरातील नागरी समस्या आणि विकासकामांची गती वाढवण्याचे आव्हान नव्या आयुक्तांसमोर असणार आहे.
31 Mar 2026 04:40 PM (IST)
व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप स्पष्ट केलं नसलं किंवा याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी यातील दृष्यांनी मात्र इंचरनेट यूजर्सना हादरवून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात आपल्याला एक तरुणी विजेच्या खांब्यावर अगदी टोकावर जाऊन बसल्याचे दिसून येते. तिने चेहऱ्यावर स्कार्फ लावला असल्याने तिचा चेहरा तर स्पष्ट दिसून येत नाही. परंतु प्रियकरासोबत तिचं लग्न करण्यात यावं यासाठी तरुणीने हे धोकादायक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, पोलिसांनी तरुणीची समजूत काढून बऱ्याच वेळानंतर तिला खांब्यावरुन खाली उतरवण्यात यश मिळवले.
31 Mar 2026 04:40 PM (IST)
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास कागदावर तरी पंजाब किंग्ज संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. मागील वर्षी पंजाबचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. ओपनिंग जोडी, मिडल ऑर्डर आणि गोलंदाजीमध्ये देखील पंजाबचा संघ मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे गुजरात टायटन्सबद्दल बोलायचे झाल्यास, मागील वर्षी प्रमाणे कर्णधार शुभमन गिल अन् साई सुदर्शन सलामीवीर म्हणून खेळण्यास येऊ शकतात. मिडल ऑर्डरमध्ये बटलर, फिलिप्स, जेसन होल्डर असे चांगले खेळाडू गुजरातकडे आहेत. गोलंदाजीबाबत विचार केल्यास कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा असे तंगडी गोलंदाजी गुजरातकडे आहे.
31 Mar 2026 04:35 PM (IST)
भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये याबाबत उत्सुकता तर आहेच पण येत असलेल्या वेगवेगळ्या डिझाईन याचं वेगळंच वेड पाहायला मिळत आहे. त्यात अलीकडेच GST मध्ये झालेल्या कपातीनंतर आता कंपन्यांमध्ये या सेगमेंटमध्ये आपली पकड आणखीनच मजबूत करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. या सगळ्यात आता कोरियन दिग्गज कंपनी Hyundai भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय Venue सोबतच आता आणखी एक धाकड कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार आहे. त्याची तयारीही झाली आहे. ही नवीन गाडी हुंडईच्या ग्लोबल मॉडेल Bayon चं सेकंड-जनरेशन मॉडेल असणार आहे जे भारतात पहिल्यांदाच लाँच केलं जाणार आहे.
31 Mar 2026 04:30 PM (IST)
२०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या काळात पार पडेल. तर स्व-गणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम १६ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच डिजिटल पद्धतीने केली जात आहे. प्रथमच स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्व-गणना ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा आहे, ज्याद्वारे प्रतिसादक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यापूर्वी १६ भाषांमध्ये आपली माहिती ऑनलाइन भरू शकतात.
31 Mar 2026 04:25 PM (IST)
कल्याण ग्रामणमधील निळजे गावात रेल्वे फाटक होते. ते फाटक बंद करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून टनेल तयार करण्यात आले आहे. तो टनेल लांब आहे. त्यामुळे रेल्वेकडून गावकऱ्यांसाठी पर्याची व्यवस्था म्हणून उड्डाण पूल किंवा पर्याची मार्ग तयार करण्यात यावा यासाठी मागणी केली गेली होती. गावकरीत बेमुदत उपोषणाला बसले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाने या संदर्भात तोडगा काढला जाईल असे आश्वासन गावकऱ्यांना दिलयानंतर गावकऱ्यांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण स्थगित घेतले आहे.
31 Mar 2026 04:20 PM (IST)
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी ८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्ती घेतली. ३३ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी प्रशासनातून निरोप घेतला असून शहराला लवकरच नवे आयुक्त मिळणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात विविध विकास प्रकल्प आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना गती मिळाली. निवृत्तीनंतर ते कुटुंब आणि साहित्याला वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
31 Mar 2026 04:15 PM (IST)
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून विकासकामांची टेंडर घेणारे ठेकेदार आर्थिक संकटात आले आहेत. ठेकेदारांची मागील पाच वर्षांपासून बिले थकलेली जात आहेत. ठेकेदारांनी बांधकाम खात्याच्या कर्जत येथील कार्यालयाबाहेर उपोषण केले,त्यानंतर आंद्रणाचे मध्यस्थीने उपोषण सोडले पण कोणतेही देयक अदा होत नसल्याने अखेर कर्जत तालुक्यातील ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या केबिनमध्ये ठिया आंदोलन केले. दरम्यान 204कोटींची थकीत बिले कधी मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला असून कर्जत तालुक्यातील ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेंगा दाखवला आहे.
31 Mar 2026 04:10 PM (IST)
कल्याण ग्रामणमधील निळजे गावात रेल्वे फाटक होते. ते फाटक बंद करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून टनेल तयार करण्यात आले आहे. तो टनेल लांब आहे. त्यामुळे रेल्वेकडून गावकऱ्यांसाठी पर्याची व्यवस्था म्हणून उड्डाण पूल किंवा पर्याची मार्ग तयार करण्यात यावा यासाठी मागणी केली गेली होती. गावकरीत बेमुदत उपोषणाला बसले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाने या संदर्भात तोडगा काढला जाईल असे आश्वासन गावकऱ्यांना दिलयानंतर गावकऱ्यांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण स्थगित घेतले आहे.
31 Mar 2026 04:05 PM (IST)
गेल्या काही वर्षांपासून लहरी वातावरणामुळे रत्नागिरीतील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकार कडुन मिळणारी मदतहि तुटपुंजी असून शेतकरी कर्ज बाजरी झाले आहेत सरकार दरबारी गाऱ्हाने घालून देखील मागण्या पूर्ण होत नाहीत अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा व शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला असून आज त्यांनी रत्नागिरीतील शेतकऱ्यांची भेट घेतली.
31 Mar 2026 04:01 PM (IST)
शहराच्या दळणवळण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारी बहुप्रतिक्षित मेट्रो सेवा अखेर 3 एप्रिल रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. काशिगाव ते दहिसर या मार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पार पडणार असून, यामुळे मिरा-भाईंदरकरांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उद्घाटना आधीच शहरात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले असून, विविध राजकीय पक्षांमध्ये ‘मेट्रो मॅन’ कोण यावरून वाद निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. भाजपाकडून आमदार नरेंद्र मेहता यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून दर्शवणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये मेट्रो प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे ‘मेट्रो मॅन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर बॅनर्स झळकत आहेत. सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पाला गती मिळाल्याचा दावा शिवसेनेच्या बॅनर्समधून करण्यात येत आहे.
31 Mar 2026 03:50 PM (IST)
सोळाव्या शतकाच्या ज्या कालखंडात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात जाणतेपणी शस्त्र धरले, एकेक गाव – एकेक मावळा जोडत महाराष्ट्रधर्म वाढविला, त्याच कालखंडात समर्थ गावोगावच्या तरुणांना शक्ती-बुद्धी-युक्तीची उपासना हनुमंताच्या माध्यमातून शिकवीत होते. हा केवळ योगायोग नव्हता. महाराजांमध्ये समर्थांना श्रीराम दिसत होते, तर त्यांच्या जिवाला जीव देणारे मावळे प्रत्यक्ष मारुतीचे रूप. शिवाज्ञा शिरोधार्य मानून अन्यायाविरुद्ध तुटून पडणारे सारे मावळे हे हनुमंतस्वरूप होते.
31 Mar 2026 03:45 PM (IST)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे दररोज असंख्य व्हिडिओज व्हायरल होत असतात आणि यातील काही निवडक व्हिडिओज लोकांचे लक्ष वेधून घेतात. अलिकडेच सोशल मिडियावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात प्रेमासाठी मुलगी थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्याचे दृष्य दिसून आले. प्रेमासाठी तरुणीने उचलले हे धोकादायक पाऊल आता सर्वांनाच थक्क करत असून याचा व्हिडिओ इंटरनेवर वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात आहे. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
31 Mar 2026 03:40 PM (IST)
‘बिग बॉस मराठी पर्व 6’ हळूहळू तिच्या शेवटच्य वलनाकडे लय घेत आहे. पण हे वळण अतिशय खडतर होत चालले आहे कारण बिग बॉसच्या घराच्या इतिहासात अगदी Rare घडणारी गोष्ट म्हणजे धक्काबुक्की करत अरेरावी करणे ही पुन्हा एकदा घडली आहे. कालच्या Episode मध्ये विशाल आणि राकेशमध्ये धक्काबुक्कीचे भांडण झाल्याचे दिसून आले. घरातील सर्व सदस्यांनी त्या दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून दोघे सावरेना. शेवटी, बिग बॉसने विशाल यांना घराच्या आत आणि राकेश यांना गार्डन एरियामध्ये नेण्यास सांगितले, दोघे शांत होताच Nomination टास्क पुन्हा सुरु करण्यात आला. या मुद्द्यावरून, राकेशच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.
31 Mar 2026 03:30 PM (IST)
मुंबई : मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत असून, ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
31 Mar 2026 03:21 PM (IST)
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाने इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून हॉटेलवर नेत तिच्यावर शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणात विशेष म्हणजे आरोपी मुलाने दुसऱ्या मुलीचे ओळखपत्रावरून हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. हे प्रकरण नागपूर शहरातील आहे.
31 Mar 2026 03:10 PM (IST)
पिंपरी : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे. या तीनही तालुक्यांतील प्रमुख पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासाठी ६७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी उभारी मिळणार आहे. मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष यांनी या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. रस्ते विकास, पार्किंग, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थांवर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांनी दिली.
31 Mar 2026 02:50 PM (IST)
भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध स्कीम आणत असतात. नुकताच भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki आपल्या ग्राहकांसाठी सोयीचा विचार करुन एक नवीन सेवा सुरु करत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा मार्ग सोयीचा होणार आहे. ही सेवा म्हणजे ‘QuickStop’ होय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कारकडे आपण लक्षच देत नाही. वेळोवेळी सर्विसिंग करणं शक्य होत नाही. तारखा पुढे मागे होतात त्याचा परिणाम आपल्या कारवर होतो. हीच अडचण ओळखून कंपनीनी ही खास सेवा लाँच केली आहे. पण नेमकी काय आहे ही सेवा सविस्तर समजून घेऊयात.
31 Mar 2026 02:45 PM (IST)
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचे वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग एका चार वर्षांचा निष्पाप चिमुरड्यावर काढल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या त्या चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक आहे. मिरा रोडच्या वॉकहार्ट रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने संताप व्यक्त करत आहे.
31 Mar 2026 02:40 PM (IST)
ठाणे : ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले कळवा उपनगर आज गंभीर मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे. विशेषतः वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येथे होत असलेल्या वारंवार वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वीजपुरवठा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी उकाड्याची तीव्रता जाणवत असताना, कळव्यातील अनेक भागांमध्ये तासन्तास वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
31 Mar 2026 02:30 PM (IST)
मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरा रोड परिसरात कार्यरत असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे दरमहा ठराविक रक्कम (हप्ता) देण्याची मागणी केल्याप्रकरणी काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि त्यांच्या सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 Mar 2026 02:25 PM (IST)
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याची अनेक नवे धक्कादायक प्रकरणे समोर येत आहे. आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपली असून त्याला कोर्टामध्ये हजर केले जाईल, अशोक खरातने शेकडो महिलांवर अत्याचार केले असून हे प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयानक असल्याची टीका राजकीय वर्तुळातून केली जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये आणखी अनेक नेत्यांची नावे येण्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केली आहे.
31 Mar 2026 02:15 PM (IST)
ब्रिटिश काळापासून सुरू असलेली नेरळ-माथेरान नेरळ ‘मिनी ट्रेन आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी समजली जाते. या ट्रेनची संख्या गेल्या दोन वर्षापासून कायम असल्याने पर्यटकांना ‘मिनी ट्रेन’ मधून प्रवास करता येत नाही. त्याचवेळी या मार्गावर पूर्वी चार ते पाच गाड्या चालवल्या जायच्या. आता मात्र मिनी ट्रेनच्या दोनच फेऱ्या नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर सुरू आहेत. दरम्यान, शाळांना सुट्टया पडल्यानंतर माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होत असतो. त्यामुळे पुढील दोन अडीच महिने नेरळ-माथेरान नेरळ मार्गावर अधिकच्या फेऱ्या व्हाव्यात, अशी मागणी पर्यटक आणि माथेरान मधील व्यावसायिक करीत आहेत.
31 Mar 2026 02:10 PM (IST)
‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमुळे प्रसिद्धी मिळवलेली सौंदर्या शर्मा सध्या तिच्या नृत्यकौशल्यामुळे चर्चेत आहे. ती नुकतीच हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये दिसली, जिथे तिने आपल्या नृत्यकौशल्याने स्टेज गाजवला. तिला हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि अभिनेत्रीने आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली. कॉन्सर्टमधील प्रेक्षकांना तिचा डान्स खूप आवडला, पण तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. आणि नेटकरी सोशल मीडियावर संतापले आहेत.
31 Mar 2026 02:00 PM (IST)
टेक कंपनी लावाने भारतीय बाजारात आज 31 मार्च रोजी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट किंमतीत उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनचे नाव Lava Bold N2 Pro 4G असं आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये अनेक खास आणि अपग्रेड फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. लावाच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. Bold N2 Pro 4G च्या रिअरमध्ये 50 मेगापिक्सेलचा AI प्राइमरी कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन Lava Bold N2 Pro 4G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.
31 Mar 2026 01:55 PM (IST)
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर सिंगचा चित्रपट एकापाठोपाठ एक बॉक्स ऑफिस विक्रम मोडत आहे. नुकताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या कमाईच्या आकड्यांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाच्या कमाईसोबतच, लोक चित्रपटाची कथा आणि ॲक्शन दृश्यांबद्दलही बोलताना दिसत आहेत. सामान्य लोकांसोबतच, बॉलीवूड कलाकारही ‘धुरंधर २’ चे कौतुक करताना दिसले आहेत. दरम्यान, अनुपम खेर यांचे एक वक्तव्य समोर आले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
31 Mar 2026 01:50 PM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपासून आता ‘गुणपत्रक’ आणि ‘प्रमाणपत्र’ ही दोन स्वतंत्र कागदपत्रे न देता, ती दोन्ही एकत्रित स्वरूपात एकाच प्रतीवर दिली जाणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
31 Mar 2026 01:45 PM (IST)
बिग बॉस मराठीचा सीझन ६ शेवटच्या टप्प्यात आला आहे. सहाव्या सीझनमध्ये सध्या सतत भांडण, राडे पाहायला मिळत आहेत. याच आठवड्यात राकेश आणि विशालमध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांचे भांडण इतके वाढले की हे दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. यानंतर बिग बॉसने या दोघांनाही शिक्षाही सुनावली. या दोघांमध्ये कोण बरोबर आहे यावर प्रेक्षकांनी त्यांची मते मांडली होती. या सगळ्यात नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दिसत आहे की घरात आणखी एक मोठे भांडण होणार आहे. यात राखी सावंत आणि राकेश बापटचे कडाक्याचे भांडण होत असल्याचे दिसत आहे.
31 Mar 2026 01:35 PM (IST)
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालंदा येथील शीतळा देवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत किमान आठ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर मंगळवारी शीतळा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने गर्दी आणखी वाढली होती. अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे लोक पळून जाऊ लागले मात्र यामुळे अनेक महिला चिरडून मरण पावल्या आहेत.
31 Mar 2026 01:25 PM (IST)
शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार दगडू सकपाळांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे निवेदन पक्षाने जारी केले आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे.
31 Mar 2026 01:15 PM (IST)
भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या मत्स्य निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये 3 हजार 684 कोटी असणारी ही निर्यात आता दुप्पट झाली असून, निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ होऊन ती वार्षिक2.27 लाख मेट्रिक टन वर पोहोचली आहे.राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय हा जागतिक मागणीचा मोठा हिस्सा पूर्ण करत असून मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
31 Mar 2026 01:06 PM (IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे वाढत्या किमतींमुळे आता लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे Hero MotoCorp ने भारतात एक नवीन अनोखं ‘इनोव्हेशन’ आणलं आहे. Hero Surge S32 असे या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव आहे. हे देशातील पहिली 2-in-1 इलेक्ट्रिक गाडी असणार आहे. ही गाडी गरजेनुसार स्कूटर आणि कधी रिक्षा अशा दोन्ही स्वरूपात बदलता येणार आहे. यामुळे तुम्ही एकाच गाडीचा वापर वैयक्तिक कामासाठी आणि व्यावसायिक कमाईसाठी म्हणजे मालवाहतूक किंवा प्रवासी स्वरुपासाठी करू शकता. आणि या अनोख्या स्कीमला सरकारनेही ग्रीन सिग्नल दाखवला आहे.
31 Mar 2026 01:00 PM (IST)
“तीर्थंकर” म्हणजे असा महान आत्मा जो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन इतरांना देखील मुक्तीचा मार्ग दाखवतो. त्यांनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अस्तेय या पंचमहाव्रतांचा उपदेश केला.
31 Mar 2026 12:50 PM (IST)
शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयाने राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत दुहेरी यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला.
31 Mar 2026 12:45 PM (IST)
वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझवरुन दिलेल्या इशाऱ्यानंतर २४ तासांत इराणविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या इस्फाहन शहरावर भयंकर हल्ला झाला असून याचा एक व्हिडिओ देखील ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे.
31 Mar 2026 12:40 PM (IST)
आज फ्रान्सची आणि जगाची शान मानला जाणारा सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळ आयफेल टॉवरचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी ३१ मार्च १८८९ मध्ये या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे हा दिवस आयफेल टॉवर डे म्हणून साजरा केला जाता. आयफेल टॉवर हा आज केवळ फ्रान्सच नाही, तर संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र बिंदू आहे. एकेकाळी या टॉवरला कुरुप मानले जायचे, पण आज या टॉवरला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. आज आपण या आयफेल टॉवरची काही रंजक अशी तथ्ये जाणून घेणार आहोत.
31 Mar 2026 12:35 PM (IST)
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील (Ashok Kharat Case) दोन नवी प्रकरणे समोर येत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशोक खरातने शेकडो महिलांवर अत्याचार केले आहेत. याच खरातच्या भक्त असलेल्या रुपाली चाकणकर देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांना राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी चाकणकर या एसआयटी चौकशीला सामोरे जाणे टाळत आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
31 Mar 2026 12:30 PM (IST)
महिलांची फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे. तसतसा त्याच्या काळ्या आणि धक्कादायक कारामाने उघडकीस येत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा अशोक खरात तब्बल पाच लाख रुपये फी घ्यायचा. इतकेच नव्हे तर त्याची आलीशान जीवनशैली आणि लोकांची फसवणूकीचे अनेक प्रकारही या तपासात समोर आले आहेत.
31 Mar 2026 12:30 PM (IST)
मैदानी कुस्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बकुट’ (कसाटा) डावामुळे वादंग निर्माण झाला आहे. मूळतः प्रतिस्पर्ध्याचा तोल बिघडवण्यासाठी आणि नियंत्रणासाठी वापरला जाणारा हा डाव केला जातो.अलिकडे कानाजवळ जोरात केलेल्या चुकीच्या प्रहारामुळे पैलवान मैदानात हातघाईवर येण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. कुस्ती क्षेत्रात बकुट डावाबद्दल नियम स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.
31 Mar 2026 12:25 PM (IST)
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर केली आहे. २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाची आणि वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शीतल मारुती कुंडले आणि मारुती कुंडले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. हत्या केल्यांनतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.
31 Mar 2026 12:20 PM (IST)
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड नगरपालिकेने सोमवारी व्यापक मोहीम राबवत कृष्णा नाका ते बसस्थानक या गजबजलेल्या पट्ट्यात धडक कारवाई केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखंड सुरू होती. या आठ तासांच्या कारवाईत तब्बल ३५ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला.
31 Mar 2026 12:10 PM (IST)
राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हुक्का फ्लेवरचा कच्चा माल हा खाद्यपदार्थ असल्याचा दावा करत ठाणे आणि पुणे येथे केलेली कारवाई आता स्वतः विभागासाठीच एक डोकेदुखी ठरली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी हस्तक्षेप करून जप्त केलेला माल सोडण्याकरीता सहमती दर्शवणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करावे लागल्याची माहिती आता समोर आली आहे.
31 Mar 2026 11:50 AM (IST)
राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हुक्का फ्लेवरचा कच्चा माल हा खाद्यपदार्थ असल्याचा दावा करत ठाणे आणि पुणे येथे केलेली कारवाई आता स्वतः विभागासाठीच एक डोकेदुखी ठरली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी हस्तक्षेप करून जप्त केलेला माल सोडण्याकरीता सहमती दर्शवणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करावे लागल्याची माहिती आता समोर आली आहे.
31 Mar 2026 11:40 AM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधाच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुसाईडनोट सापडली आहे.
31 Mar 2026 11:30 AM (IST)
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची आज जयंती. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि समाजातील रूढी-परंपरांना आव्हान दिले. लहान वयातच विवाह झाल्यानंतरही त्यांच्या पती गोपाळराव जोशी यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्या काळात महिलांना शिक्षण घेणेही कठीण असताना त्यांनी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. अमेरिकेतील ‘वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेंसिल्वेनिया’ येथून त्यांनी डॉक्टर पदवी मिळवली.
31 Mar 2026 11:20 AM (IST)
गेल्या एक महिन्यापासून मध्यपूर्वेत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा अद्याप सोडला नसल्याचे अमेरिका देखील संतप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. तसेच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील इराणला कडक शब्दात सुनावले आहे.
31 Mar 2026 11:10 AM (IST)
सध्याच्या डिजीटल काळात आपण आपले फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाच्या फाईल्स आपल्या स्मार्टफोनमध्ये सुरक्षितरित्या स्टोअर करून ठेवतो. मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये स्टोअर केलेल्या या फाईल्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुमच्या लॅपटॉप आणि फोनमधील संपूर्ण डेटा अचानक गायब झाला तर? जर हार्ड ड्राईव्ह खराब झाले, फोन हरवला, सिस्टिम क्रॅश झाली तर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांवरील उपाय म्हणजे बॅकअप. जर तुम्ही आधीच सर्व फोटो, व्हिडीओ आणि फाईल्सचे बॅकअप घेतले असेल तर ही समस्या तुम्हाला भेडसावणार नाही.
31 Mar 2026 11:00 AM (IST)
रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट केवळ कमाईचे नवीन टप्पेच गाठत नाही, तर एक-एक करून मागील बॉक्स ऑफिस विक्रमही मोडीत काढत आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी आणि अगदी ६०० कोटींची कमाई केली आणि आता त्याची कमाई वेगाने वाढत आहे. हा चित्रपट आता ९०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे, आणि तो हा टप्पा कधी गाठेल? हा एक प्रश्नच आहे. पण त्याआधी, या चित्रपटाची एकूण कमाई आपण जाणून घेणार आहोत, तसेच या चित्रपटाने ‘KGF 2’ ला देखील मागे टाकले आहे.
31 Mar 2026 10:48 AM (IST)
नालासोपारा: नालासोपारा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. एका निर्जनस्थळी पोत्यात शीर नसलेला मृतदेह आदळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह पेल्हार पोलीस ठाणे परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ आणि प्रभात ओएट्रोल पंपानजीक अंबा पाडा येथील वस्तीचा भाग असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले.






