Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा

दिल्ली सरकारने इंधन बचत आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री Rekha Gupta यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याची घोषणा केली.

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 06:14 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

 NCP Executive List & Fund Control:  राष्ट्रवादीची तिजोरी पवार माय-लेकरांच्या हाती 

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. या नव्या रचनेनुसार पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण सूत्रे अध्यक्ष सुनेत्रा पवार, सरचिटणीस पार्थ पवार आणि राष्ट्रीय सचिव जय पवार यांच्याकडे एकवटली असून, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे मुख्य पदाधिकाऱ्यांच्या यादीतून गायब असल्याचे दिसून आले आहे. सुनेत्रा पवार यांनी याला ‘टायपिंगची चूक’ (Clerical Error) असल्याचे सांगत लवकरच दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दोन दिवस उलटूनही नवीन यादी समोर न आल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे. Maharashtra Breaking News

The liveblog has ended.
  • 14 May 2026 06:01 PM (IST)

    14 May 2026 06:01 PM (IST)

    Delhi News: दिल्लीत वारे बदलले! आठवड्यातून २ दिवस वर्क फ्रॉम होम, तर मंत्र्यांना….; मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे मोठे निर्णय

    Delhi Work From News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर, दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ धोरणाची घोषणा केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृतीचे आवाहन केले होते. परिणामी, दिल्लीमध्ये ‘मेरा भारत, मेरा योगदान’ ही मोहीम सुरू केली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वापराबाबत दोन स्तरांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत: सरकारी क्षेत्रात दर आठवड्याला दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ पाळले जातील, तर खाजगी क्षेत्रासाठीही एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, हे निर्णय १५ मे (शुक्रवार) पासून अंमलात येतील आणि ही मोहीम पुढील ९० दिवस सुरू राहील.

  • 14 May 2026 05:50 PM (IST)

    14 May 2026 05:50 PM (IST)

    Kavita Devi: भारताच्या लेकीने रचला इतिहास

    भारतात WWE चे लाखो फॅन्स आहेत. गेल्या काही वर्षांत, अनेक भारतीय कुस्तीपटूंनी WWE रिंगमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्यापैकी एक म्हणजे भारताची पहिली महिला WWE रेसलर कविता देवी. कविता WWE रिंगमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. कविताने देसी स्टाइलमध्ये सलवार सूट घालून अनेक दिग्गज कुस्तीपटूंना पराभूत केले आणि जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याची छाप सोडली.

  • 14 May 2026 05:40 PM (IST)

    14 May 2026 05:40 PM (IST)

    Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…

    Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सर्व राज्य सरकारांनांकडून त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक आर्थिक शिस्त लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी १३ मे रोजी उच्चस्तरीय बैठकीत सरकारी खर्चाला कात्री लावण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारमधील अनेक विभागांमध्ये खर्चात बचत आणि काटकसर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेश दौरे, वाहन वापर, बैठका, खाद्यपदार्थांचा खर्च आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरील खर्च कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • 14 May 2026 05:30 PM (IST)

    14 May 2026 05:30 PM (IST)

    धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला

    पुणे : पुन्हा येरवडा खुल्या कारागृहातून कैद्याने पलायन केल्याचा प्रकार समोर आहे. पुण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील एका शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पलायन केले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना समोर आली आहे.

    याप्रकरणी जनार्दन शंकर अडसुळे (रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात सुभेदार चंद्रकांत सयाजी खांदवे (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी दोन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जर्नादन याच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०१७ मध्ये खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा तो भोगत होता. त्याला येरवडा खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते.

  • 14 May 2026 05:20 PM (IST)

    14 May 2026 05:20 PM (IST)

    मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

    Zee Marathi Upcoming  Serial :  मुलगा असो की मुलगी प्रत्येकासाठी आई सर्वात जवळची असते अगदी हृदयाचा हळवा कप्पा. असं म्हणतात की आईला देखील मैत्रीणीची गरज असते म्हणून देव तिच्या पदरात लेकीला टाकतो. एक स्त्री जेव्हा एक मूल जन्माला घालते त्यावेळी एका आईचा देखील जन्म होतो. याच मायलेकीच्या आयुष्याची प्रेमाची गोष्ट सांगणारी मालिका झी मराठीवर येत आहे. झी मराठीवर सध्य़ा नव्या मालिकांची मांडियाळी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या सनई चौघडे मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे.

  • 14 May 2026 05:11 PM (IST)

    14 May 2026 05:11 PM (IST)

    Delhi News: दिल्लीत वारे बदलले! आठवड्यातून २ दिवस वर्क फ्रॉम होम, तर मंत्र्यांना….

    Delhi Work From News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर, दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ धोरणाची घोषणा केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृतीचे आवाहन केले होते. परिणामी, दिल्लीमध्ये ‘मेरा भारत, मेरा योगदान’ ही मोहीम सुरू केली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वापराबाबत दोन स्तरांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत: सरकारी क्षेत्रात दर आठवड्याला दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ पाळले जातील, तर खाजगी क्षेत्रासाठीही एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, हे निर्णय १५ मे (शुक्रवार) पासून अंमलात येतील आणि ही मोहीम पुढील ९० दिवस सुरू राहील.

  • 14 May 2026 05:10 PM (IST)

    14 May 2026 05:10 PM (IST)

    जंजिरा जेट्टी नंतर आता वॉटर मेट्रो, जाणून घ्या काय आहे प्रकल्प

    मुरुड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुरक्षित जेट्टी आणि लाटरोधक भिंत प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राज्याचे बंदरे विकास मंत्री Nitesh Rane यांनी कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कुठेही कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खात्यातील अखर्चित निधीकडे सर्वप्रथम लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले.

  • 14 May 2026 05:05 PM (IST)

    14 May 2026 05:05 PM (IST)

    नालासोपाऱ्यात आयुक्त येताच रस्ता झाला स्वच्छ, फक्त दौऱ्यासाठी कारवाई!

    नालासोपाऱ्यात आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासन अचानक अॅक्शन मोडमध्ये दिसून आलं. रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली, तर बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांचा दौरा सुरू असताना परिसर स्वच्छ आणि ट्रॅफिकमुक्त दिसत होता. मात्र दौरा संपताच पुन्हा एकदा नालासोपाऱ्यात जुनीच परिस्थिती पाहायला मिळाली. रस्त्यांवर पुन्हा फेरीवाले, वाहतूक कोंडी आणि रिक्षांचा गोंधळ सुरू झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “फक्त VIP दौऱ्यांसाठीच शिस्त का?” असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. नालासोपाऱ्यातील वाहतूक आणि अतिक्रमणाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 14 May 2026 04:55 PM (IST)

    14 May 2026 04:55 PM (IST)

    छत्रपती संभाजी महाराजांना नवदांपत्याचे अभिवादन, ३६९ वृक्ष वाटपातून पर्यावरणाचा संदेश

    लग्नानंतर नवरा-नवरी आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जात नव्या संसाराची सुरुवात करतात. मात्र तुळजापूर येथील एका नवदांपत्याने कुलदैवताच्या दर्शनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत एक वेगळाच आदर्श निर्माण केला. हेही आमचे कुलदैवतच आहेत, असे सांगत आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन या नवदांपत्याने केले. यावेळी नवदांपत्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

  • 14 May 2026 04:50 PM (IST)

    14 May 2026 04:50 PM (IST)

    बीडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद! कुत्र्यांनी चिमुकल्याला फरफटत नेलं

    बीड शहरातीन पंढरी नगरी एका 6 वर्षीय वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी शेजारच्या एका व्यक्तीने त्यांना हुसकून लावल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला. अक्षरशा मोकाट कुत्र्याची टोळी लहान चिमुकल्याला ओढून घेऊन जाताना दिसत आहे पंधरा ते वीस फूट ओढून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेरा कधी झाले आहे..मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्याचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

  • 14 May 2026 04:45 PM (IST)

    14 May 2026 04:45 PM (IST)

    नांदगाव खंडेश्वर रुग्णालय चर्चेत! रुग्णालयात घाणीचं साम्राज्य

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयातील गंभीर गैरव्यवस्था समोर आली आहे. रुग्णालयात डॉक्टर गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी वाढत असून, स्वच्छतेचाही अभाव दिसून येत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

  • 14 May 2026 04:40 PM (IST)

    14 May 2026 04:40 PM (IST)

    लिफ्ट मागून तरुणाला लुटलं; १२ तासांत आरोपी अटकेत

    नागपुरात लिफ्ट देणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं. चाकूचा धाक दाखवत ३० हजारांची लूट करणाऱ्या मुख्य आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली.

  • 14 May 2026 04:35 PM (IST)

    14 May 2026 04:35 PM (IST)

    बीडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद! कुत्र्यांनी चिमुकल्याला फरफटत नेलं

    बीड शहरातीन पंढरी नगरी एका 6 वर्षीय वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी शेजारच्या एका व्यक्तीने त्यांना हुसकून लावल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला. अक्षरशा मोकाट कुत्र्याची टोळी लहान चिमुकल्याला ओढून घेऊन जाताना दिसत आहे पंधरा ते वीस फूट ओढून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेरा कधी झाले आहे..मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्याचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

  • 14 May 2026 04:30 PM (IST)

    14 May 2026 04:30 PM (IST)

    रासायनिक आंब्यांविरोधात प्रशासनाचा बडगा; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

    नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे पिकवल्याच्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईसह परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • 14 May 2026 04:25 PM (IST)

    14 May 2026 04:25 PM (IST)

    वसई-विरारमध्ये पोलीस आयुक्तांच्या दौऱ्यानिमित्त ‘स्वच्छता’ आणि ‘शिस्त’?

    शहरातील ट्रॅफिकची समस्या ही काही नवीन राहिलेली नाही. पण आज वसई-विरारमधील चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. नालासोपारा पूर्व रेल्वे उड्डाणपुलाखाली एरवी चालणंही कठीण असतं. अनधिकृत फेरीवाले आणि चुकीच्या दिशेनं उभ्या असणाऱ्या रिक्षांमुळे या परिसरात नेहमीच ट्रॅफिकचा विळखा असतो. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आज याच रस्त्यांनी जणू मोकळा श्वास घेतला आहे.आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे आणि पूर्ण रस्ता क्लीन करण्यात आला आहे. मात्र, यामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • 14 May 2026 04:20 PM (IST)

    14 May 2026 04:20 PM (IST)

    पावसाळापूर्व कामांवर महापौरांची करडी नजर; विरोधकांचे आरोप निराधा

    आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांवर महापौर नितीन पाटील स्वतः लक्ष ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणी निचरा आणि इतर विकास कामांची दररोज पाहणी करण्यात येणार असून अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्थायी समिती सभेत विविध विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप पूर्णपणे निराधार असून नागरिकांच्या हितासाठी प्रशासन प्रामाणिकपणे काम करत असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 14 May 2026 04:15 PM (IST)

    14 May 2026 04:15 PM (IST)

    करंजाडेतील दुकानाला आग; 28 सिलेंडर जप्त, मोठी दुर्घटना टळली

    करंजाडे वसाहतीतील एका गॅस दुरुस्ती दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली असून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागल्यानंतर घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने दुकानात ठेवण्यात आलेले तब्बल 28 सिलेंडर जप्त केले. यामध्ये 10 भरलेले गॅस सिलेंडर असल्याची माहिती समोर आली आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातील एखाद्या सिलेंडरचा स्फोट झाला असता तर संपूर्ण इमारत दुर्घटनाग्रस्त झाली असती, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने वेळीच कारवाई करत आग आटोक्यात आणली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • 14 May 2026 04:11 PM (IST)

    14 May 2026 04:11 PM (IST)

    मोकळ्या जागेवर साचलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना

    वसई विरार शहरात वाढत्या उष्णतेच्या पाऱ्यामुळे विरार पश्चिमेकडील पालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर साचलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या विळख्यात संपूर्ण परिसर सापडल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोड निर्माण झाले .बाजूलाच म्हाडाच्या शेकडो इमारती असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता ही वर्तवली जात होती मात्र पालिकेच्या मुख्यालयाच्या अगदी बाजूला लागलेल्या आगीकडे अग्निशमन विभागाचे दुर्लक्ष का झाले व आग लागलेल्या परिसरा ठिकाणी पोहोचायला तब्बल एक ते दोन तासाहून अधिक वेळ का लागला हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.

  • 14 May 2026 03:51 PM (IST)

    14 May 2026 03:51 PM (IST)

    धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    पुणे : पुन्हा येरवडा खुल्या कारागृहातून कैद्याने पलायन केल्याचा प्रकार समोर आहे. पुण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील एका शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पलायन केले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना समोर आली आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

     

  • 14 May 2026 03:41 PM (IST)

    14 May 2026 03:41 PM (IST)

    होर्मुझमध्ये गुजरातचे जहाज बुडाले, तटरक्षक दलाकडून १४ कर्मचाऱ्यांची सुटका

    एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातचे एक मालवाहू जहाजा होर्मुझ सामुद्रधुनीत बुडाले असल्याचे सांगितले जात आहेत. हाजी अली असे या जहाजाचे नाव असून हे जहाज १३ मे रोजी ओमानच्या प्रादेशिक जलक्षेत्रातून प्रवास करत होते. यावेळी अचानक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर जहाजावर आग लागली होती. मात्र ओमानच्या तटरक्षक दलांनी तातडीने बचाव कार्य सुरु करत १४ कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले आहे.

  • 14 May 2026 03:36 PM (IST)

    14 May 2026 03:36 PM (IST)

    होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली

    इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली असल्याचे म्हटले आहे. परंतु या जहाजांना इराणशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    दिल्लीत ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांना अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांचा उघडपणे निषेध करण्याचे आवाहन केले.

     

  • 14 May 2026 03:31 PM (IST)

    14 May 2026 03:31 PM (IST)

    UNICEF Report : लेबनॉनमधील तब्बल ७,७०,००० मुले मानसिक तणावात

    एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या हिंचारा आणि विस्थापनाचा लाखो मुलांच्या मानसिकेतवर गंभीर परिणाम होत आहे. सततच्या हिंसाचार, भीती आणि घरे सोडून जाण्याच्या भाग पडलेली सक्तीमुळे अंदाजे ७,७०,००० मुले तीव्र मानसिक तणावात असल्याचे UNICEF ने म्हटले आहे.

    मध्यपूर्वे आणि उत्तर आफ्रिका विभागाचे UNICEF चे संचालक, एडवर्ड बेगबेडर यांनी सांगितले की, परिस्थिती अत्यंत धोकादायत आहे. तातडीने मदत नम मिळाल्यास संकटाच्या जखमा मुलांच्या मनावर अनेक वर्षे राहू शकतात. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि देशाच्या भविष्यावरही परिणा होऊ शकतो.

  • 14 May 2026 03:26 PM (IST)

    14 May 2026 03:26 PM (IST)

    एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’; पहाटे मोठी कारवाई

    छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर प्रशासनाने आपला मोर्चा वळवला आहे. महापालिकेने बुधवारी (१३ मे) पहाटे नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांच्या दोन घरांसह एका कार्यालयावर बुलडोझर चालवून ती अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. वाचा सविस्तर

  • 14 May 2026 03:21 PM (IST)

    14 May 2026 03:21 PM (IST)

    ब्रिक्स बैठकीत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिका इस्रायलवर हल्ला

    नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यांनी अमेरिका इस्रायलवर त्यांच्याविरोधात बेकायदेशीर हल्ले केल्याचा आरोप केला आहे.

  • 14 May 2026 03:16 PM (IST)

    14 May 2026 03:16 PM (IST)

    आगामी निवडणुकांपूर्वी ECI अ‍ॅक्शन मोडमध्ये; 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत SIR चा तिसरा टप्पा सुरू

    भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या नव्या टप्प्यात देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून, मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, तिसऱ्या टप्प्यानंतर केवळ हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्येच विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) लागू राहील. वाचा सविस्तर

  • 14 May 2026 03:11 PM (IST)

    14 May 2026 03:11 PM (IST)

    NEET UG 2026 : थलपथी विजय यांची ‘नीट’ रद्द करण्याची मागणी

    NEET UG 2026 : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशासह अनेक राज्यांत पोहचली आहे. या प्रकरणात एकामागून एक पुरावे समोर येत आहेत. गुरूवारी उशीरा रात्री सीबीआयने आरोपींना जयपूरमधील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आहे. दुसरीकडे सुमारे २३ लाख विद्यार्थी नीट परीक्षेच्या नवीन तारखेची वाट पाहत आहेत. यादरम्यन तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी केंद्र सरकारला वैद्यकीय प्रवेशासाठी असणाऱ्या नीट परीक्षा रद्द करण्यबाबत विनंती केली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी संबंधित राज्यांना १२ वीच्या गुणांच्या आधारावर जागा भरण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

  • 14 May 2026 03:10 PM (IST)

    14 May 2026 03:10 PM (IST)

    Web Series Review : सस्पेन्स… थ्रिल… मनोरंजन! फक्त गुन्हेगार नाही, प्रेक्षकांचे लक्ष कैद करणारा ‘Detective Dhananjay’

    Web Series Review : सध्या मराठी सिनेचाहत्यांना ‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series ने वेड लावले आहे. ही मालिका Marathi मिस्ट्री-थ्रिलर असून ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आली आहे. एकूण 7 भागांमध्ये ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. चंद्रकांत सखाराम चव्हाण म्हणजेच सुप्रसिद्ध लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या रहस्यकथांना आधुनिक तापशैलीची जोड या मालिकेत देण्यात आली आहे. या मालिकेत एक वेगळीच रोमांचक दुनिया उभारण्यात आली आहे. ही सिरीज पाहताना, एक मात्र लक्षात येते की कथानकाची गती थोडी मंदावते, मात्र अभिनेता आदिनाथ कोठारे याचा संयमी अभिनय आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. सस्पेन्स थ्रिलरमध्ये संगीताचं महत्त्व मोठं असतं आणि या सीरिजमध्ये BGM ने ते रहस्य टिकवून ठेवले.

  • 14 May 2026 03:06 PM (IST)

    14 May 2026 03:06 PM (IST)

    सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

    स्टायलिश कपडे घालून रिल बनवण्याची आवड अनेकांना आहे पण यामुळे कुणी आपलं आयुष्य संपवू शकतं यावर तुमचा विश्वास बसेल का? हरियाणात अशी घटना सत्यात घडून आली आहे ज्यात सुनेच्या जीवनशैलीला कंटाळून सासू-सासऱ्यांनी आपलं आयुष्य संपवून टाकलं. सांगितलं जात आहे की, सून लहान कपडे घालून रिल बनवायची जी गोष्ट तिच्या सासू-सासऱ्यांना कधीही पटली नाही. अनेक महिने कुटुंबात यावरुन वाद सुरु होता आणि अखेर कंटाळून दुःखी होऊन सासू सासऱ्यांनी स्वत:लाच संपवण्याचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर

  • 14 May 2026 03:01 PM (IST)

    14 May 2026 03:01 PM (IST)

    Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ

    मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका (US-Israel Iran War) यांच्यातील वाढत्या संघर्षाने सध्या संपूर्ण जगाचा श्वास रोखला आहे. विशेषतः जगाचा ‘एनर्जी गेटवे’ मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने आपली पकड घट्ट केल्यामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर टांगती तलवार होती. अशा परिस्थितीत भारतीय नौदलाच्या मार्गदर्शनाखाली दोन भारतीय एलपीजी जहाजांनी जे धाडस दाखवले, त्याची चर्चा आता जागतिक स्तरावर रंगली आहे. ‘सिमी’ आणि ‘एनव्ही सनशाईन’ या दोन जहाजांनी इराणची नाकेबंदी अक्षरशः भेदून भारताच्या दिशेने कूच केली आहे. वाचा सविस्तर

  • 14 May 2026 02:59 PM (IST)

    14 May 2026 02:59 PM (IST)

    7 कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी, EPFO करणार मोठा बदल

    कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO आपल्या सदस्यांच्या सोयीसाठी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने सातत्याने पावले उचलत आहे. यासोबतच, ATM आणि UPI द्वारे PF रक्कम काढण्या सारख्या सुविधा सेवेत आणणार आहे. सध्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, निवृत्ती निधीशी संबंधित आणखी एक मोठा बदल करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नेमका काय असणार आहे तो बदल?

  • 14 May 2026 02:55 PM (IST)

    14 May 2026 02:55 PM (IST)

    पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकणार? RBI च्या इशाऱ्यानंतर 48 तासांत झाले 3 मोठे निर्णय

    भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून चिंता कायम असताना अघ्या दोन दिवसांत तीन मोठे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सोन्यावरील आयात शुल्क आणि साखर निर्यातीवरील बंदीचा समावेश आहे. याचदरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनेही दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) आणि ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आवाहन आधीच केले आहे.

  • 14 May 2026 02:43 PM (IST)

    14 May 2026 02:43 PM (IST)

    पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करा, फडणवीसांचा बुलेटवरुन प्रवास

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत आज थेट बुलेटवरून प्रवास करत विधानभवन गाठलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात इंधन आणि ऊर्जा बचतीसाठी केलेल्या विशेष आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. गाड्यांचा मोठा लवाजमा आणि सुरक्षा ताफा बाजूला सारत मुख्यमंत्र्यांनी स्वतः बुलेट चालवली. या माध्यमातून त्यांनी जनतेला इंधन बचतीचा मोठा संदेश दिलाय.

  • 14 May 2026 02:35 PM (IST)

    14 May 2026 02:35 PM (IST)

    पुण्यात रात्री तलवारींचा नाच, 100 ते 150 बुलेटस्वारांचा गोंधळ

    पुण्यातील दिवे घाटाखाली रात्रीच्या वेळी टोळक्यानं प्रचंड दहशत माजवली. सुमारे 100 ते 150 बुलेटस्वारांनी सायलेन्सरचे फटाके वाजवत आणि हातात तलवारी-कोयते नाचवत भर रस्त्यात गोंधळ घातलाय. रात्री 12 च्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये तरुण तलवारींसह डान्स करताना दिसत आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • 14 May 2026 02:28 PM (IST)

    14 May 2026 02:28 PM (IST)

    एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक गाडीनं विधानभवनात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत, इलेक्ट्रिक गाडीनं प्रवास केलाय. एकनाथ शिंदे इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक गाडीनं विधानभवनात दाखल झालेय. तसेच ताफ्यातून गाडी कमी केल्या असून, पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी देखील प्रतिसाद द्यावा असंही ते म्हटलेय.

  • 14 May 2026 02:22 PM (IST)

    14 May 2026 02:22 PM (IST)

    Raigad Bridge Collapse:  रायगडमध्ये प्रवासी पूर कोसळला 

    Raigad Bridge Collapse: रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमणोली गावाजवळील प्रवासी पूल क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेल्या हायवा ट्रकमुळे कोसळला आहे. या अपघातात ट्रक पुलासह खाली कोसळला असला, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या पुलामुळे आमणोली, दहिगाव, कोलतरे आणि अनेक आदिवासी वाड्यांचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

  • 14 May 2026 01:55 PM (IST)

    14 May 2026 01:55 PM (IST)

    Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

    सध्या IPL 2026 तुफान चालू आहे आणि रोज नवनवे विक्रम घडताना दिसून येत आहेत. यामध्ये विराट कोहली नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिला आहे आणि यावर्षीचा हंगामही अपवाद नाही. विराट कोहलीची गणना जागतिक क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. विराटने आता अजून एक नवा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे आणि असा विक्रम कऱणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. विराट असा खेळाडू आहे ज्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १४,००० धावांचा टप्पा गाठला आहे, त्याने केवळ ४०९ डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. हा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने टी-२० क्रिकेटमध्ये ४२३ डावांत १४,००० धावा पूर्ण केल्या होत्या.

  • 14 May 2026 01:45 PM (IST)

    14 May 2026 01:45 PM (IST)

    सरकारने केली ‘ब्लॅकआउट’ ची घोषणा, ‘या’ देशात उरला नाही Petrol – Diesel चा एकही थेंब

    जागतिक स्तरावर सुरु असलेल्या संकटांचा परिणाम थेट देशांवर होतं आहे. इंधन आणि वायूचा तुटवडा भासत असल्याने देशामध्ये अंदाधुंदी माजली आहे. क्युबा सध्या इंधनाच्या तीव्र संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, देशातील डिझेल आणि इंधन तेल जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आले आहे. परिणामी, राजधानी हवानामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या परिस्थितीचे वर्णन गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण ऊर्जा संकट असे केले जात आहे. नेमकी काय आहे परिस्थिती ? जाणून घेऊयात.

  • 14 May 2026 01:35 PM (IST)

    14 May 2026 01:35 PM (IST)

    वाहन सुरक्षेसाठी मोठा निर्णय! HSRP नंबर प्लेट आता अनिवार्य

    राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • 14 May 2026 01:25 PM (IST)

    14 May 2026 01:25 PM (IST)

    हमासचा अमानवीय चेहरा! बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ?

    जेरुसलेम/तेस अवीव : पॅलेस्टिनी संघटना हमाचा अत्यंत क्रूर अमानवीय चेहरा समोर आला आहे. एका इस्रायली संगटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, हमासने इस्रायली ओलिसांवर लैंगिक अत्याचार, शारीरिक छळ केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे या अहवालात जाणून घेऊयात.

  • 14 May 2026 01:15 PM (IST)

    14 May 2026 01:15 PM (IST)

    US-China Tension: काय आहे ‘Thucydides Trap’?

    जागतिक राजकारणात जेव्हा दोन महासत्ता समोरासमोर येतात (US and China Relation), तेव्हा बंदुकांच्या गोळ्यांआधी एका शब्दाची चर्चा सर्वात जास्त रंगते, तो शब्द म्हणजे ‘थुसिडायडिस ट्रॅप’ (Thucydides Trap). हा केवळ एक ऐतिहासिक संदर्भ नाही, तर जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन उभे करणारा एक इशारा आहे. मे २०२६ मध्ये जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बीजिंगमध्ये भेटले, तेव्हा पुन्हा एकदा या ‘सापळ्या’ची चर्चा झाली.

  • 14 May 2026 01:05 PM (IST)

    14 May 2026 01:05 PM (IST)

    किती धोकादायक आहे नोरो व्हायरस

    या इन्फेक्शनमुळे शरीरात अचानक उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागतो. हा व्हायरल खास करुन खचाखच भरलेल्या गर्दीमधून आणि बंद जागांमधून अधिक जलद पसरत जातो. यामुळेच हाॅस्पिटल, शाळा, क्रुज शिपसारख्या ठिकाणी याच्या अधिक घटना दिसून येतात. अलिकडेच यासंबंधित एक घटना समोर आली आहे ज्यात कॅरेबियन प्रिंसेस क्रूज शिपवर हा व्हायरल आढळून आला. मुख्य म्हणजे यामुळे तब्बल १०० हून अधिक यात्रेकरु आणि क्रू मेंबर्स आजारी पडले. अमेरिकेच्या आरोग्य संस्था CDC नुसार, जहाजावर उपस्थित असलेल्या हजारो प्रवाशांपैकी मोठ्या संख्येने लोकांनी उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची समस्या जाणवून आल्याची तक्रार केली.

  • 14 May 2026 01:02 PM (IST)

    14 May 2026 01:02 PM (IST)

    रिक्षाप्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

    रिक्षाचालकाने प्रवासी महिलेचे १ लाख ३४ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालकावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३४ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवडमधील सांगवी भागात राहतात. त्या ७ मे रोजी पुणे स्टेशन परिसरातून रिक्षाने बिबवेवाडीकडे निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र चोरून नेले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

  • 14 May 2026 12:49 PM (IST)

    14 May 2026 12:49 PM (IST)

    सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र

    राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देताना भेदभाव केल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाजपला ‘सबका साथ सबका विकास’ची आठवण पत्राद्वारे करून दिली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच यासंदर्भात पत्र दिले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्राच्या माध्यमातून नगरसेवकांना 'समान निधी' देण्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि निधीचे समान वाटप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात विकासकामांसाठी तरतुद करताना नगरसेवकांना निधी देताना भेदभाव करण्यात आला आहे, असा आरोप केला जात हाेता. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. हे पत्र रिमार्क करुन महापालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहे. महापालिकेत भाजपला पाशवी ११९ नगरसेवकांचे बहुमत प्राप्त झाले आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर निधीची उधळण होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना मात्र 'दुजाभाव' सहन करावा लागत असल्याचा आरोप केले जात आहेत. या विरोधात आता स्वतः उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्राच्या माध्यमातून 'समान निधी' देण्याची मागणी केली.

  • 14 May 2026 12:36 PM (IST)

    14 May 2026 12:36 PM (IST)

    सोशल मीडियावरील बदनामीला लागणार लगाम

    सोशल मीडियावरून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय एखाद्या व्यक्तींची बदनामी करण्याच्या वाढत्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या बदनामीला लगाम लावण्यासाठी कडक धोरण स्विकारले आहे. हे रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून पोलिस महासंचालक असणार आहेत. सोशल मीडियावरील बदनामी, दिशाभूल करणारे मजकूर आणि गैरवापर रोखण्यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करणे अथवा स्वतंत्र कायदा तयार करण्याच्या शक्यतेचा अभ्यास ही समिती करणार आहे.

  • 14 May 2026 12:24 PM (IST)

    14 May 2026 12:24 PM (IST)

    ‘NEET’ पेपरफुटीवरुन युवक काँग्रेस आक्रमक

    देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 14 May 2026 12:12 PM (IST)

    14 May 2026 12:12 PM (IST)

    पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल; नाना पटोलेंची टीका

    राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि व्यवस्था विक्रीच्या मार्गावर नेल्या गेल्या असून, सर्व राज्यांवर ताबा मिळवण्याचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर भाजपने देशाचा नकाशा जाहीर करून किती राज्यांमध्ये सत्ता मिळवली याची जाहिरात केली. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल दिली जात आहे. स्वतः ऐशोआरामात राहून जनतेला काटकसरची आवाहन केले जात आहे, अशीही टीका यावेळी पटोले यांनी केली.

  • 14 May 2026 11:59 AM (IST)

    14 May 2026 11:59 AM (IST)

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचं विविध वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. यंदा कुंभमेळ्यासाठी नवे बौध चिन्ह निश्चित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती.

  • 14 May 2026 11:47 AM (IST)

    14 May 2026 11:47 AM (IST)

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

    तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी आहेत.

  • 14 May 2026 11:36 AM (IST)

    14 May 2026 11:36 AM (IST)

    माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतच होणार

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्कामावरून वाद झाला होता. जागा अपुरी असल्याच्या विचाराने दुसरीकडे मुक्काम होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं पालखीचा मुक्काम होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

  • 14 May 2026 11:25 AM (IST)

    14 May 2026 11:25 AM (IST)

    Devendra Fadnavis Bike:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क बुलेट चालवत विधानभवनात दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर, त्याचे पडसाद आता प्रशासकीय स्तरावर उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आज चक्क बुलेट (बुलेट ३५०) चालवत विधानभवन गाठले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांच्यासोबत असलेल्या मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे. 'इंधन वाचवा, देश वाचवा' हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यासाठी फडणवीस यांनी हा पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Maharashtra breaking news updates today 14th may natioanal international crime sports breaking updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Marathi News Live Updates
  • national news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, रविवारी होणारी टीईटी परीक्षा रद्द
1

Top Marathi News Today Live : टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, रविवारी होणारी टीईटी परीक्षा रद्द

EPFO च्या ‘या’ सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता
2

EPFO च्या ‘या’ सेवा पुढील तीन दिवस राहणार बंद; नवीन Claim येणार नाही करता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.