Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra to World Breaking News:  आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

  • By anuradha sagar
Updated On: Apr 24, 2026 | 05:57 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे जाणार विधान परिषदेवर?

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून, उद्धव ठाकरे लढणार असतील, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, लढणार नसतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांना समन्वयाने चर्चा करावी लागेल. तसेच राज्यसभेच्या पुढील जागांबाबतही आताच स्पष्टता आवश्यक असल्याचे नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचा अनुभव राज्य आणि परिषदेला उपयोगी ठरेल, असे त्या म्हणाल्या.

The liveblog has ended.
  • 24 Apr 2026 04:30 PM (IST)

    24 Apr 2026 04:30 PM (IST)

    Honda Cars : अरे देवा आता हे काय नवीन?

    जपानी कार कंपनी होंडा २०२६ च्या अखेरपर्यंत दक्षिण कोरियामधील आपला व्यवसाय बंद करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडाने २०२६ च्या अखेरपर्यंत दक्षिण कोरियामधील विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे. होंडाने सुमारे २३ वर्षांपूर्वी कोरियन बाजारपेठेत प्रवेश केला होता आणि तेव्हापासून ती एक प्रमुख कार कंपनी म्हणून कार्यरत आहे. होंडाने म्हटले आहे की, बदलती बाजारपेठेची परिस्थिती आणि विनिमय दराच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 24 Apr 2026 04:21 PM (IST)

    24 Apr 2026 04:21 PM (IST)

    Akshay Kelkar : अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक! दिले परखड मत

    महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ 1 मे रोजी नवा निर्णय राज्यभराAkshay Kelkar, Akshay Kelkar Father, Marathi Language Compulsion on Auto Drivers, अक्षय केळकर, अक्षय केळकर वडील, ऑटो चालकांवर मराठी भाषेची सक्ती,त लागू करणार आहेत. राज्यभरातील सगळ्या रिक्षाचालकांना त्यांचे Permit वैध ठेवण्यासाठी त्यांना मराठी अवगत असणे आवश्यक आहे. ज्या रिक्षाचालकाला मराठी जमत नाही त्याचे permit रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील परप्रांतीय रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तसेच त्यांची मुजोरी या थराला पोहचली आहे की मराठीचे हक्काचे घर असणाऱ्या महाराष्ट्रात मराठी विरोधात त्यांनी संप पुकारला आहे. एकूण 15 लाख गैरमराठी रिक्षाचालक 4 मे रोजी संपावर जाणार आहेत. परप्रांतीयांची ही मुजोरी पाहून मराठी सिनेसृष्टीचे मराठी कलाकार चांगलेच चिताळले आहेत.

  • 24 Apr 2026 03:50 PM (IST)

    24 Apr 2026 03:50 PM (IST)

    पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत झळकणार स्नेहल शिदम, ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती; कथेत नवा ट्विस्ट

    इन्स्पेक्टर मंजू’ या ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री स्नेहल शिदम एका वेगळ्या आणि आकर्षक अंदाजात दिसत असून तिची एन्ट्री मालिकेत नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे.

  • 24 Apr 2026 03:40 PM (IST)

    24 Apr 2026 03:40 PM (IST)

    IPL 2026 च्या Playoff मध्ये कशी पोहचू शकते मुंबई इंडियन्सची टीम, कसे आहे समीकरण

    आयपीएल २०२६ च्या ३३ व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सकडून १०३ धावांनी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा हा पाचवा पराभव होता. मुंबईने या हंगामात एकूण सात सामने खेळले असून, त्यापैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. लीगचे निम्मेच सामने खेळून झाल्यामुळे, आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणे अनिश्चित होत आहे. 

     

  • 24 Apr 2026 03:35 PM (IST)

    24 Apr 2026 03:35 PM (IST)

    खाजगी शाळांत एनसीईआरटी पुस्तके! महागड्या पुस्तकावर बंदी; एनएचआरसीचा ३० दिवसांचा वेळ

    खाजगी शाळांमध्ये महागडी पुस्तके विक्री करून पालकांकडून अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याच्या प्रकारावर आता कठोर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. आयोगाने स्पष्ट निर्देश दिले असून, या प्रकरणावर ३० दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

  • 24 Apr 2026 03:30 PM (IST)

    24 Apr 2026 03:30 PM (IST)

    जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    देशाच्या आगामी जनगणनेचे बिगुल वाजले असून, सेलू तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील ९४ गावांमध्ये येत्या १६ मे पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांना १ मे पासून मोबाईलद्वारे स्वतःची माहिती स्वतःच भरण्याची (स्व-गणना) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • 24 Apr 2026 03:20 PM (IST)

    24 Apr 2026 03:20 PM (IST)

    मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल

    संभाजीनगर शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या निर्धारातून महानगरपालिकेने सुरू केलेल्या धडक मोहिमेला गुरुवारी आणखी वेग आला. सलग दुसऱ्या दिवशी मध्यवर्ती भागात कारवाई करत अंगुरीबाग व मोतीकारंजा परिसरातून तब्बल ४६३० आले. या प्रकरणी तीन विक्रेत्यांवर प्रत्येकी किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात २५ हजार दंड ठोठावून एकूण ७५ हजारांची वसुली करण्यात आली.

  • 24 Apr 2026 03:15 PM (IST)

    24 Apr 2026 03:15 PM (IST)

    कोण म्हटलं माकड इराणच्या बाजूने? होर्मुझमोहिमेवर जाणाऱ्या US Navyच्या सैनिकासोबत घडले ‘असे’ विपरीत अन् तो चक्क…

    मध्यपूर्वेतील राजकारण सध्या एका स्फोटक वळणावर आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) युद्धाच्या छायेत असतानाच, एका अतिशय विचित्र घटनेने जगभरातील संरक्षण तज्ज्ञांचे लक्ष वेधले आहे. अमेरिकन नौदलाची ‘माईन स्वीपर’ (सुरुंग शोधक) जहाजे इराणने पेरलेले सुरुंग हटवण्यासाठी मोहिमेवर निघाली होती. मात्र, इराणच्या हल्ल्यापूर्वीच या मोहिमेतील एका महत्त्वाच्या सदस्याला माकडाच्या हल्ल्यामुळे युद्धभूमीतून माघार घ्यावी लागली आहे.

  • 24 Apr 2026 03:10 PM (IST)

    24 Apr 2026 03:10 PM (IST)

    वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष

    मराठवाड्‌यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात वाढत चाललेल्या अंतर्गत संघर्षांची प्रदेश नेतृत्वाने गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील गटबाजी आता उघडपणे समोर आल्याने पक्षश्रेष्ठी चिंतेत असल्याचे सांगितले जाते. (BJP Politics) नांदेडमध्ये संघटनात्मक पातळीवर दोन स्पष्ट गट निर्माण झाल्याची चर्चा असून, एका गटाच्या कार्यक्रमांना दुसरा गट सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने पक्षातील विसंवाद अधिक ठळक झाला आहे.

  • 24 Apr 2026 03:00 PM (IST)

    24 Apr 2026 03:00 PM (IST)

    गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघड; ग्राहकांची सर्रास लूट, नागरिकांना कारवाईची प्रतिक्षा

    सिमेंट नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरात मागील अनेक दिवसापासून ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. कोरपना पुरवठा विभागाकडून दोनदा धाड टाकून एजन्सीची चौकशी केली. संशयीत गॅस एजंसीवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा असा अहवाल १० एप्रिलला तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर मोठे राजकीय वजन असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. कारवाई होत नसल्याने ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेऊन लूट करीत असल्याचे धक्कादायक वास्तव्य औद्योगिक परिसरात आहे.

  • 24 Apr 2026 02:56 PM (IST)

    24 Apr 2026 02:56 PM (IST)

    शेतकऱ्यांनाही मिळणार ‘सरकारी बाबू’सारखी पेन्शन! दरमहा खात्यात तब्बल इतके रुपये

    सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच, शेतकऱ्यांनाही आता वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक निवृत्तीवेतन मिळू शकते. अनेकदा असे दिसून येते की, जसजसे वय वाढते तसतसे शेतकरी शेतीकाम करण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ ठरतात आणि त्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा स्रोत खंडित होतो. याच समस्येचे निवारण करण्यासाठी, केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री किसान मानधन योजना’ सुरू केली आहे; ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आत्मनिर्भर बनवून सक्षम करणे हा आहे.

  • 24 Apr 2026 02:45 PM (IST)

    24 Apr 2026 02:45 PM (IST)

    मोदींच्या एका वाक्याने बायडेनही झाले होते चकित; क्वाड स्थापनेचा थरार आता झाला उघड

    आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे वजन किती वाढले आहे, याची साक्ष देणारा एक मोठा खुलासा अमेरिकेतून झाला आहे. अमेरिकेचे माजी उप परराष्ट्र सचिव कर्ट एम. कॅम्पबेल यांनी हडसन इन्स्टिट्यूटमधील एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले की, ‘क्वाड’ (QUAD) या भारत (India), अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या समावेश असलेल्या शक्तिशाली गटाचे अस्तित्व भारताशिवाय शक्यच नव्हते. या गटाला केवळ भारताने साथ दिली नाही, तर भारतानेच याचे पडद्यामागून नेतृत्व केले आहे.

  • 24 Apr 2026 02:35 PM (IST)

    24 Apr 2026 02:35 PM (IST)

    महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून विक्रमी मतदान पार पडले आहे. पश्चिम बंगालमधून टीएमसीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते सातत्याने सभा आणि रोड शो घेत आहेत.

  • 24 Apr 2026 02:24 PM (IST)

    24 Apr 2026 02:24 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तीन टप्प्यात वाटप

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षासाठी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तीन टप्प्यात वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभरात फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. तर राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्याकडे पक्ष संघटनेची दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

  • 24 Apr 2026 02:15 PM (IST)

    24 Apr 2026 02:15 PM (IST)

    गायकवाडांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही - प्रकाश महाजन

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड प्रकरणावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "संजय गायकवाडची जी ऑडिओ क्लीप फिरतेय, त्याची सत्यता माहिती नाही. पण संजय गायकवाडांच्या वक्तव्याशी आणि विचाराशी पक्षाचा संबंध नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत, पक्ष त्याचे समर्थन करत नाही, असं शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

  • 24 Apr 2026 01:27 PM (IST)

    24 Apr 2026 01:27 PM (IST)

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; शेतकऱ्याने बांध पेटवून देताच, गाडी देखील पेटली

    बीडच्या आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आष्टी तालुक्यातील जामगाव ते हरिनारायण आष्टा या रस्त्यावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले होते. या शेतापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक कार उभी होती. त्या कारपर्यंत ही आग पोहचली. परंतु त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या कारलाही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.

  • 24 Apr 2026 01:20 PM (IST)

    24 Apr 2026 01:20 PM (IST)

    नागपूर हादरलं! सावकाराची संतापजनक मागणी, बापाने थेट का

    नागपूर शहरातील नारा घाट परिसरातील पिवळी नदीच्या पुलाखाली एका पोत्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांची हाव आणि एका मुलीच्या अब्रूवर टाकलेली वाईट नजर, एका तरुणाच्या जीवावर बेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी 40 वर्षीय ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याला ताब्यात घेतले आहे.

  • 24 Apr 2026 01:10 PM (IST)

    24 Apr 2026 01:10 PM (IST)

    ATSची मोठी कारवाई

    उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर्स आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना नोएडातून अटक केली. एटीएसने त्यांच्याकडून 32 बोरचे एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसं, एक चाकू आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

  • 24 Apr 2026 01:02 PM (IST)

    24 Apr 2026 01:02 PM (IST)

    कात्रज घाटात भीषण अपघात, बस-रिक्षाची समोरासमोर धडक

    पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कात्रज घाटात जुन्या बोगद्याजवळ बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२ वर्षे, रा. सुखसागर नगर, बनकर शाळेजवळ, बिबवेवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अपघातात राजेश इंगवले (वय ४८ वर्षे, रा. गोकुळ नगर, कात्रज-कोंढवा रस्ता), दशरथ निरगुडे (वय ४३ वर्षे, रा. अप्पर बिबवेवाडी) आणि शहाजी लक्ष्मण शिवदे (वय ४१ वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

  • 24 Apr 2026 12:48 PM (IST)

    24 Apr 2026 12:48 PM (IST)

    दारूबंदीच्या जावळी तालुक्यात दारूची विक्री जोमात

    सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जावळी तालुक्यातील महिलांनी संपूर्ण जावळी तालुका दारू दुकान मुक्त केला, मात्र या तालुक्यात दारूबंदी असताना देखील दारू जोमात विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अक्षरशा पोलिसांच्या वरदहस्तानेच तालुक्यात ही दारू विक्री होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नवीन पोलीस अधिक्षकांनी जावळी तालुक्यातील अवैध व्यवसायांना लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जावळी तालुक्यात दारूबंदी असताना देखील कुडाळ, करहर, केळघर, मेढा, सायगाव अशा बाजारपेठेंच्या गावांमध्ये राजरोसपणे अवैध दारू विक्री अव्वाच्या सव्वा दरामध्ये विकली जात आहे. गेले दहा वर्षांपासून तेच अवैध व्यावसायिक आजही अवैध दारू विक्री करताना पाहायला मिळत आहेत. मग यांना वरदहस्त नेमका कोणाचा ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

  • 24 Apr 2026 12:36 PM (IST)

    24 Apr 2026 12:36 PM (IST)

    वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका

    मावळ व खेड तालुक्यातील वाढत्या उष्णतेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय गंभीर संकटात सापडला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात झालेल्या तीव्र वाढीचा थेट परिणाम पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर होत असून, उष्माघातामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मावळ तालुक्यातील सुदुंबरे, जांबवडे, जाधववाडी तसेच खेड तालुक्यातील निघोजे, भांबोली, शिंदेवासुली, मरकळ, गोळेगाव, चरोली या परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय चालतो. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता लवकर वाढल्याने कोंबड्यांवर उष्णतेचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, कोंबड्यांचे मृत्यू वाढले असून, जिवंत कोंबड्यांचे वजनही घटत आहे.

  • 24 Apr 2026 12:24 PM (IST)

    24 Apr 2026 12:24 PM (IST)

    ‘राजगड’, ‘घोडगंगा’सह सात साखर कारखान्यांना केंद्राचा झटका

    महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे. यामध्ये पुण्यातील तीन महत्त्वाच्या कारखान्यांचा समावेश असून, कर्ज नाकारल्या गेल्यामुळे या कारखान्यांच्या आगामी गाळप हंगामावर आणि शेतकऱ्यांच्या पेमेंटवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्य सरकारने एकूण १४ कारखान्यांना कर्ज मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली होती. मात्र, तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर बोट ठेवत एनसीडीसी ने केवळ ७ कारखान्यांना मंजुरी दिली, तर उर्वरित ७ प्रस्ताव नामंजूर केले आहेत.

  • 24 Apr 2026 12:12 PM (IST)

    24 Apr 2026 12:12 PM (IST)

    बुकिंग करूनही सिलिंडरचा पत्ता नाही; वितरण व्यवस्था कोलमडली

    विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्या घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांची मोठी 'गॅस'कोंडी झाली असून, बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील नियोजन कोलमडले आहे. मध्यवर्ती पुण्यात परिस्थिती काहीशी नियंत्रणात असली, तरी शहराच्या सीमावर्ती भागांत आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मात्र नागरिक हवालदिल झाले आहेत. पुण्यातील उपनगरे आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागांत गॅस वितरणाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नियमानुसार बुकिंग केल्यानंतर २४ ते ४८ तासांत सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना, अनेक भागांत चक्क ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे."गॅस बुक करून चार दिवस झाले, तरी वितरकाची गाडी दारात येत नाही. एजन्सीला फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळतात. शेवटी हॉटेलमधून जेवण मागवावे लागत आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्राहक अरुण भाबड यांनी व्यक्त केली.

  • 24 Apr 2026 11:57 AM (IST)

    24 Apr 2026 11:57 AM (IST)

    अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्नात

    हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करत असल्याचाही दावा ही त्यांनी केला.

  • 24 Apr 2026 11:49 AM (IST)

    24 Apr 2026 11:49 AM (IST)

    आरएसएस छावणीतील हिंदुत्ववादी सोयीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र

    वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.

  • 24 Apr 2026 11:49 AM (IST)

    24 Apr 2026 11:49 AM (IST)

    'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचं वंचितकडून बुलढाण्यात सामूहिक वाचन

    'शिवाजी कोण होता?' या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत, काल एकनाथ शिंदे पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकालाच अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच अनुषंगाने आज आणि उद्या बुलढाणा वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच उद्या जयस्तंभ चौकात सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमाला हजारो आंबेडकर अनुयायी व शिव प्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन बुलढाणा वंचितचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केलं आहे.

  • 24 Apr 2026 11:48 AM (IST)

    24 Apr 2026 11:48 AM (IST)

    कल्याण डोंबिवलीत 12 तास पाणीपुरवठा बंद,नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्ती कामांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या नियोजित कामांमुळे मंगळवार, 28 एप्रिलला सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत (12 तास) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

  • 24 Apr 2026 11:46 AM (IST)

    24 Apr 2026 11:46 AM (IST)

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; शेतकऱ्याने बांध पेटवून देताच, गाडी देखील पेटली

    बीडच्या आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आष्टी तालुक्यातील जामगाव ते हरिनारायण आष्टा या रस्त्यावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले होते. या शेतापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक कार उभी होती. त्या कारपर्यंत ही आग पोहचली. परंतु त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या कारलाही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.

  • 24 Apr 2026 11:46 AM (IST)

    24 Apr 2026 11:46 AM (IST)

    मराठीचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान

    रिक्षा चालकांना मराठी सक्ती करू नका, या मागणीसाठी 4 मे रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण इथल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देत उप प्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन सादर केले.

  • 24 Apr 2026 10:44 AM (IST)

    24 Apr 2026 10:44 AM (IST)

    अक्षय कुमारआणि विद्या बालन ७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

    अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटात विद्या बालनसोबत पुन्हा एकत्र काम करणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अनीस बाझमी करणार आहेत. या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाने आधीच बरीच उत्सुकता निर्माण केली आहे, विशेषतः जेव्हापासून चित्रपटाची टीम चित्रीकरणासाठी केरळला रवाना झाली आहे. अक्षय आणि विद्या यांनी यापूर्वी ‘हेय बेबी’, ‘भूल भुलैया’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, जे सर्व बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. अक्षयने यापूर्वी सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’मध्ये एकत्र काम केले होते. अक्षय १५ वर्षांनंतर अनीस बाझमीसोबत पुन्हा एकत्र येत आहे; त्यांनी यापूर्वी ‘सिंग इज किंग’, ‘वेलकम’ आणि ‘थँक यू’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.

  • 24 Apr 2026 10:34 AM (IST)

    24 Apr 2026 10:34 AM (IST)

    अमेरिकेतील मॉल ऑफ लुइझियाना फूड कोर्टमध्ये वादाचे रूपांतर थेट गोळीबार

    जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अमेरिकेतील लुइझियाना राज्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ‘मॉल ऑफ लुइझियाना’ (Mall of Louisiana) मध्ये झालेला गोळीबार हा या राज्यातील गन कल्चरचा भीषण चेहरा समोर आणणारा ठरला आहे. फूड कोर्टमध्ये लोक दुपारचे जेवण करत असताना अचानक गोळ्यांचे आवाज घुमले आणि मॉलमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेने अवघ्या अमेरिकेला हादरवून सोडले आहे.

  • 24 Apr 2026 10:24 AM (IST)

    24 Apr 2026 10:24 AM (IST)

    क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

    भारतातील सर्वच लोकांमध्ये आयपीएल 2026 ची क्रेझ आहे. आयपीएलची हीच क्रेझ लक्षात घेऊन गेमिंग कंपनी क्राफ्टनने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम बीजीएमआयमध्ये एक नवीन क्रिकेट लीग ईव्हेंट आणला आहे. गेमर्ससाठी अजूनही हा ईव्हेंट लाईव्ह आहे. या गेमिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेपन स्किन, गन अटॅचमेंट आणि आउटफिट रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्लेअर्सना स्पिन टोकन देखील मिळणार आहे. या सर्व रिवॉर्ड्समुळे प्लेअर्सचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होणार आहे. जर तुम्ही क्रिकेट लव्हर असाल आणि तुम्हाला बीजीएमआय खेळायला आवडत असेल तर हा गेमिंग ईव्हेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. गेमिंग ईव्हेंटबाबत अधिक जाणून घेऊया.

  • 24 Apr 2026 10:14 AM (IST)

    24 Apr 2026 10:14 AM (IST)

    महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे जाणार विधान परिषदेवर? काँग्रेसह राष्ट्रवादीचाही पाठिंबा

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

  • 24 Apr 2026 10:04 AM (IST)

    24 Apr 2026 10:04 AM (IST)

    ”प्रेमासाठी तयार..”, सई ताम्हणकर लग्नबंधनात अडकणार? वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

    अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या मटका किंग या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. जी ६० च्या दशकातील एक आकर्षक कथा आहे. या प्रोजेक्टमध्ये ती ‘बरखा’ हे शक्तिशाली भूमिका साकारत आहे. अलिकडेच तिने अमर उजालाल दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या भूमिकेबद्दल, इंडस्ट्रीतील टाइपकास्टिंगबद्दल, अखिल भारतीय ट्रेंड्सबद्दल, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अभिनयातील बदलत्या काळाबद्दल आणि तिच्या लग्नाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे.

  • 24 Apr 2026 09:50 AM (IST)

    24 Apr 2026 09:50 AM (IST)

    एनसीईआरटीचा मराठा द्वेष कायम; हिंदीपाठोपाठ इंग्रजी पुस्तकातूनही नकाशा गायब

    एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हिंदी आवृत्तीतून हा नकाशा वगळल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनांना केराची टोपली दाखवत आता इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही नकाशा हटवण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी विधानमंडळात केलेल्या दाव्यांना एनसीईआरटीने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे यातून स्पष्ट होत असून, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे राज्य सरकारची केंद्रातील वजनशक्ती आणि भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • 24 Apr 2026 09:40 AM (IST)

    24 Apr 2026 09:40 AM (IST)

    आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी; ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

    दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाचा आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अत्यंत शिवराळ भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. "तुला घरात घुसून मारेन आणि जीभ छाटेन" अशा प्रक्षोभक विधानांची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. या धमकीवजा संभाषणात गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह भाष्य केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

  • 24 Apr 2026 09:35 AM (IST)

    24 Apr 2026 09:35 AM (IST)

    'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद: आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस तक्रार

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादात सापडले आहेत. या शीर्षकाचा आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणावरून आंबी यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली असली, तरी तांत्रिक कारणास्तव पोलिसांनी अद्याप आमदारांवर गुन्हा दाखल केलेला नाही. लोकप्रतिनिधीकडून झालेल्या या अभद्र वर्तणुकीमुळे राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 24 Apr 2026 09:15 AM (IST)

    24 Apr 2026 09:15 AM (IST)

    बुलढाणा पाणीटंचाई: एप्रिलमध्येच जलसाठा ३० टक्क्यांवर, १५ गावांना टँकरचा आधार

    बुलढाणा जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबतच पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले असून ग्रामीण व शहरी भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा केवळ ३० टक्क्यांवर आल्याने प्रशासकीय चिंता वाढली असून मे आणि जूनमध्ये ही स्थिती अधिकच भीषण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने १५ गावांत टँकर सुरू केले असून, ४८ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, खालावलेली पाणीपातळी पाहता आगामी काळ जिल्ह्यासाठी मोठ्या परीक्षेचा ठरणार आहे.

  • 24 Apr 2026 09:07 AM (IST)

    24 Apr 2026 09:07 AM (IST)

    विधान परिषद निवडणूक २०२६: राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी चढाओढ

    बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकीय वारे आता १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीकडे वळले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४० आमदारांचे संख्याबळ असल्याने विजयासाठी आवश्यक २८ मतांचा कोटा पाहता त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या जागेसाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असेल. या पार्श्वभूमीवर, पक्षातील एका निश्चित जागेवर वर्णी लागावी यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Web Title: Maharashtra desh videsh live news 24th april breaking news politics economy live blog marathi breaking news political news economice entertainment ipl 2026 live national news international news middl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…
1

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…

RSS BJP Leaders Fight: आरएसएस स्वयंसेवकाला भाजप नेत्याकडून बेदम मारहाण; मध्यप्रदेशात हायव्होल्टेज राडा
2

RSS BJP Leaders Fight: आरएसएस स्वयंसेवकाला भाजप नेत्याकडून बेदम मारहाण; मध्यप्रदेशात हायव्होल्टेज राडा

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये
3

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

NCP Rajya sabha Candidate: भुजबळांचा पत्ता कट; राष्ट्रवादीकडून बड्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी
4

NCP Rajya sabha Candidate: भुजबळांचा पत्ता कट; राष्ट्रवादीकडून बड्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.