Photo Credit- Team Navarashtra तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार
मुंबई: महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांचे निकास उद्या जाहीर होणार आहे. पण निकालात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 25 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पण त्रिशंकू निकाल लागल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहेय. महायुतीला स्पष्ट बहूमत मिळाल्यास सरकार स्थापन होऊ शकते.
दुसरीकडे “आम्हाला बहुमत मिळालं तरी राष्ट्रपती राजवटीचा प्रयत्न होईल. पण तरीही आम्ही सरकार स्थापन करू, सरकार स्थापन करण्यापासून कोणीही आम्हाला रोखू शकत नाही.” असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महायुती की महाविकास आघाडी, वंचितचा पाठिंबा कुणाला? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहे. पण अनेक एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत झाली आहे.अनेक विधानसभेच्या जागांवर अटीतटीची लढत झाली आहे. त्यात अनेक अपक्ष आणि इतर पक्षांंनीही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने हे छोटे पक्ष पक्ष आणि अपक्ष उमेदवारही किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
येत्या काही तासातच निकाल जाहीर होणार असल्याने नेत्यांसह समर्थकांच्या मनातही धाकधूक वाढली आहे.पण पुढचे चार-दिवसही धाकधुकचे असणार आहेत. त्यातच कोणत्याही बहुमताचा आकडा अस्पष्ट आला तर सत्ता स्थापनेसाठी दावा आणि सरकार स्थापनेसाठी केवळ 48 तास शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहेत.
विधानसभा निकालापूर्वीच ‘या’ माजी आमदारासह शरद कोळींवर गुन्हा दाखल
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ 48 तासातच सरकार स्थापन करण्याच आवहान युती आणि आघाडीसमोर असलणा आहे. पण सत्ता स्थापनेसाठी दावा न करता आल्यास राज्यात 2019 प्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे 23 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर फक्त 48 तासात बहूमत सिद्ध कऱण्याचं आव्हान पक्षांपुढे असणारआहे.