सौजन्य ; iStock
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आंदोलन करून निषेध केल्याप्रकरणी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी या दोघांसह 8 ते 10 महिलांवर तर प्रति आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसचे गणेश डोंगरे यांच्यासह 10 महिलांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Election 2024 : “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार…”, संजय राऊत स्पष्टच बोलले
महाविकास आघाडीतून दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार दिलीप माने यांना पक्षाचा ‘बी’ फॉर्म दिला गेला नाही. यामुळे काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळल्याचे सांगण्यात आले. परंतु मतदानादिवशी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच संतापले. मतदान प्रकिया पार पडल्यानंतर रात्री ८:१५ ते ८:३० च्या दरम्यान माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे व उपनेते शरद कोळी यांनी पत्रकार भवन चौकातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयाजवळ खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी जाऊन प्रति आंदोलन केले. या प्रकरणी गणेश डोंगरे व अन्य १० महिला कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार दोन्ही गटांच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी; मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त